'प्रेमाच्या या ५ स्टेजेस माहीत नसतील, तर जोडपी सुंदर नात्याचा आनंद मिळवणं कठीणच!

प्रेमाच्या या ५ स्टेजेस माहीत नसतील, तर जोडपी सुंदर नात्याचा आनंद मिळवणं कठीणच!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

एका विशिष्ट वयात आल्यानंतर मुलगी असो की मुलगा प्रेमात पडतातच! मग आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करून त्या व्यक्तीने सुद्धा आपले प्रेम स्वीकारले तर तो जग जिंकल्याचा अनुभव असतो.

प्रेमात पडल्यानंतर आपल्या डोळ्यांवर एक गुलाबी चष्मा असतो त्यामुळे आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीच्या सर्व गोष्टी छान-छान, गोड-गोड वाटत असतात.

आपण ह्या व्यक्तीबरोबर पुढचे १०० जन्म सुद्धा काढू शकतो असे वाटते. पण नात्याच्या सुरुवातीची ही हनिमून फेज संपली की, मग जोडीदाराच्या अनेक गोष्टी खटकू लागतात.

 

Sunsets_couple-inmarathi

 

ज्या गोष्टी सुरुवातीला क्युट वाटायच्या त्याच इरिटेटिंग वाटू लागतात. आणि ज्या व्यक्ती बरोबर जन्मोजन्मी एकत्र राहण्याची स्वप्न बघितलेली असतात त्याच व्यक्तीबरोबर काही दिवससुद्धा भांडणाशिवाय जात नाहीत. ही कठीण स्टेज जर तुमच्या नात्याने पार केली तर तुमचे नाते टिकते.

खेदाची गोष्ट अशी की, अनेक जोडपी पेशन्स ठेवून ही स्टेज पार करू शकत नाहीत आणि ह्याच स्टेजला नात्याचा दुर्दैवी अंत होतो.

प्रेमाच्या पाच पायऱ्या असतात व प्रत्येक पायरीवर तुमचे नाते अधिकाधिक घट्ट होत जाते. हे तेव्हाच घडते जेव्हा तुम्ही एकमेकांना समजून घेता, एकमेकांवर विश्वास ठेवता.ज्या जोडप्यांना प्रेमाच्या ह्या पाच पायऱ्या माहीत नसतात ते ह्या सुंदर नात्याचा आनंद मिळवू शकत नाहीत.

१) प्रेमाची पहिली स्टेज- एखादी व्यक्ती आवडणे

ही प्रेमात पडण्याची पहिली पायरी आहे. तुमच्या आवडत्या व्यक्तीला तुम्ही ओळखू लागता. त्या व्यक्तीशी दिवसातून कितीही तास बोलले तरीही ते कमीच वाटतात. त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला खुप आकर्षण वाटते. त्या व्यक्तीच्या स्वभावाची, तिच्या गुणांची तुम्हाला भुरळ पडते.

 

yjhd-inmarathi

 

त्या व्यक्तीच्या सगळ्याच गोष्टी छान वाटतात. तेव्हा तुम्ही “आजकल पांव जमींपर नही पडते मेरे” ह्या भावनेत हवेत तरंगत असता. त्या व्यक्तीच्या सर्वच गोष्टी पटत असल्याने ती व्यक्ती आपली सोलमेट असल्याची खात्री पटते.

परंतु चकाकते ते सर्व सोने नसते. सुरुवातीला सर्व सुंदर असलेले चित्र कायम असेच राहील अशी आपण अपेक्षा करतो.

हे ही वाचा – नात्यात सतत भांडणं होताहेत ? नातं फुलवण्यासाठी या गोष्टी तुम्हाला नक्कीच मदत करतील

२) “कपल” होण्याची पायरी

तुम्हाला ती व्यक्ती मनापासून आवडते, तिच्याशिवाय तुम्हाला जग वाळवंटासारखे भासते आणि “हिच्या / ह्याच्या शिवाय जगणे अशक्य आहे” ह्या भावनेतून तुम्ही समोरच्या व्यक्तीला प्रेमाची कबुली देता.

त्या व्यक्तीच्या मनातसुद्धा तुमच्याविषयी अश्याच भावना असल्या आणि त्याने तुमचे प्रेम स्वीकारले तर तुम्हाला जग जिंकल्याचा आनंद होतो. मग नात्याचा एक सुंदर प्रवास सुरु होतो.

तुम्ही एकमेकांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवायची संधी शोधता. सगळं जग सुंदर भासतं. एकमेकांबरोबर प्रत्येक क्षण एन्जॉय करता. त्याचे/तिचे रुसवेफुगवे सुध्दा क्युट वाटतात आणि तिने/ त्याने रुसवा सोडावा म्हणून तुम्ही काहीही करायला तयार असता.

एकमेकांना न दुखावण्याची पुरेपूर काळजी घेता. हे करताना तुम्ही केवळ त्याला/तिला आवडते म्हणून तुमच्या मनाविरुद्ध अनेक गोष्टी सहज करता.

कोणीतरी आपल्यावर प्रेम करतंय ,आपली काळजी घेतंय ,आपले हट्ट व लाड पुरवतंय ही भावनाच किती सुखावह असते नाही का? प्रेमाच्या ह्या पायरीत तुम्ही ही भावना पुरेपूर अनुभवून आनंदी असता.

हे ही वाचा – या ११ गोष्टींमध्ये समजूतदारपणा दाखवलात, तर संसार नक्कीच सुखाचा होईल…

३) मतभेद

प्रेमात पडणारे किंवा ह्याविषयी लिहिणारे, बोलणारे लोक ह्या मतभेदांच्या स्टेजविषयी फार बोलत नाहीत. दुर्दैवाने ही नात्याची सर्वात कठीण पायरी आहे व हीच पायरी पार करणे अनेकांना जमत नाही. ह्याच पायरीवर येऊन अनेक नाती तुटतात.

सुरुवातीला सर्व सुंदर असलेलं चित्र, तुम्हाला स्वर्गाप्रमाणे भासलेलं जग थोड्याच काळात नरकाप्रमाणे वाटू लागते. कारण लहानसहान कारणांमुळे भांडणे, मतभेद होऊ लागतात. त्याच्या/तिच्या सवयी ज्या आधी क्युट वाटत असतात त्याच गोष्टींचा आपल्याला राग येऊ लागतो.

अगदी चायनीज खायचे की इटालियन, इंग्लिश सिनेमा बघायचा की मराठी, चहा की कॉफी ह्या क्षुल्लक गोष्टींपासून ते तू माझा फोन का नाही उचलला? माझ्या मेसेजला रिप्लाय का नाही केला? इतक्या वेळ कुणाशी चॅट करत होतीस/होतास? ह्या मुलीशी/ त्या मुलाशी का बोललीस /बोललास? ह्या कारणांमुळे टोकाची भांडणं होऊ लागतात.

 

kalki-koechlin-znmd-inmarathi

 

नात्यामध्ये कधी त्याने तर कधी तिने अशी दोघांनीही आलटून पालटून पडती बाजू घेऊन मतभेद मिटवून परत सगळं नॉर्मल करण्याचा प्रयत्न केला तर ठीक.

नाहीतर ह्याच स्टेज मध्ये “आता मी आणखी सहन करू शकत नाही” अशी भावना निर्माण होऊन कुठून ह्याच्या/हिच्या प्रेमात पडलो आणि आयुष्यातली सर्वात मोठी चूक केली असा विचार मनात येऊ लागतो.

ह्याच वेळी जागे होऊन, पेशन्स ठेवून नातं संभाळण्यासाठी प्रयत्न करायचे असतात.

हे प्रयत्न बाहेरच्या कोणी मित्राने, बहिणीने, भावाने करून उपयोगाचे नसतात तर ज्याचे त्यानेच करायचे असतात. प्रत्येक नाते वेगळे असते, दोन व्यक्तींचे स्वभाव, गुण-दोष, सवयी, आवडीनिवडी, घरचे वातावरण ह्यात फरक असतो.

हेच लक्षात घेऊन समोरच्याला आहे तसे स्वीकारणे आवश्यक असते. मी म्हणतो म्हणून हे कर नाहीतर मी समजेन तुझं माझ्यावर प्रेम नाही किंवा हा माझ्यासाठी इतकेही करू शकत नाही, ह्याचे माझ्यावर प्रेमच नाही असा इगोइस्टिक विचार नात्यासाठी हानिकारक असतो.

आपला जोडीदार एक स्वतंत्र व्यक्ती आहे, त्याला त्याच्या आवडीनिवडी, स्वतंत्र मत व विचार आहेत हे स्वीकारणं आवश्यक असतं! नाहीतर नात्याचा अंत होण्यास वेळ लागत नाही.

ही पायरी , प्रेमाच्या प्रवासातील हा खाचखळग्यांचा रस्ता एकमेकांचा हात धरून, एकमेकांवर विश्वास ठेवून तुम्ही पार केलात तर तुमचे नाते ह्या सगळ्यातुन तावून सुलाखून बाहेर पडते आणि अधिक घट्ट होते.

हे ही वाचा – “त्याचं” मन समजून घेण्यासाठी प्रत्येक बायकोला माहित असायलाच हव्यात या गोष्टी!

४) नात्याकडे नव्या दृष्टीने बघणे

सततची भांडणे, मतभेद ह्याने तुम्ही कंटाळता. ज्यांना एकमेकांविषयी फक्त आकर्षण असते ते लोक तिसऱ्या पायरीवरच नाते संपवतात. परंतु ज्यांना समोरची व्यक्ती खरंच मनापासून आवडत असते, तिची काळजी असते ते लोक नाते टिकवण्यासाठी प्रयत्न करतात.

ते एकमेकांना स्पेस देतात. इगो बाजूला ठेवून दुसऱ्या व्यक्तीला त्याच्या सर्व गुणदोषांसह स्वीकारतात. आपण भिन्न स्वभावाच्या, भिन्न मतांच्या, स्वतंत्र व्यक्ती आहोत आणि त्यामुळे आपल्यात सर्वच बाबतीत एकमत होईल असे नाही. त्यामुळे आपण मतभेद टोकाला न्यायचे नाही.

 

ajay-kajol-inmarathi

 

एकमेकांच्या आनंदात आनंद व दुःखात खंबीरपणे आधार देण्याची तयारी असेल तर त्या दोन व्यक्तींना कुठलेही मतभेद वेगळे करू शकत नाहीत.

त्यांचा आपल्या नात्यावर वाईट परिणाम होऊ द्यायचा नाही व म्युच्युअल अंडरस्टँडिंगने हा प्रवास करायचा. एकत्र आहोत ते क्षण आनंदात घालवायचे असा विचार करून जी जोडपी नाते पुढे नेतात ती आयुष्यभर एकमेकांना साथ देऊन आनंदात आयुष्य जगतात.

५) पावर ऑफ टू

तुमचे नाते तावून सुलाखून बाहेर पडल्यावर तुम्ही एकमेकांना अधिक समजून घेता. तुमचे नाते बहरते.

आयुष्यात फक्त फुलांची पायवाट नाही तर खाचखळगे सुद्धा असतात आणि ते दोघांनी मिळून मार्ग काढून पार करायचे असतात. हे तुम्हाला कळल्याने आता तुम्ही एकत्र मिळून जग सुध्दा जिंकू शकता.

 

shabana-javed-inmarathi

दोघांच्या स्ट्रेंथ एकत्र करून त्याचा वापर करून तुम्ही तुमचे आयुष्य अधिक चांगले करायचा प्रयत्न करता. एकमेकांचे वीकनेस काय आहेत हे तुम्हाला माहीत असतात आणि तुम्ही त्यासाठी जोडीदाराला आधार देत असता. म्हणूनच आयुष्याचा प्रत्येक क्षण एकमेकांबरोबर आनंदात घालवायचा हाच तुमचा पुढे आयुष्यभर प्रयत्न असतो.

प्रेमाच्या ह्या पाच पायऱ्या लक्षात ठेवून जोडीदाराला न कंटाळता जे साथ देतात त्यांचेच नाते आयुष्यभर टिकते. ज्यांना हा उनपावसाचा खेळ माहीत नाही , ते लोक सुंदर नात्याचे सुख अनुभवू शकत नाहीत.

हे ही वाचा – लग्नानंतर काही वर्षांनी नवरा बायको एकमेकांसारखे दिसू लागतात, याचं कारण काय?

===

 

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

3 thoughts on “प्रेमाच्या या ५ स्टेजेस माहीत नसतील, तर जोडपी सुंदर नात्याचा आनंद मिळवणं कठीणच!

  • August 21, 2019 at 5:20 pm
    Permalink

    छान

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?