ह्या सोप्या टिप्स वापरुन wi-fi राऊटर हॅक होण्यामुळे होणारी इंटरनेट चोरी थांबवा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आजच्या काळात जर सामान्य माणसाला भेडसावणाऱ्या समस्यांपैकी एक समस्या आहे डेटा चोरीची, घरात लावलेलं वायफायला पासवर्ड टाकलेला असून आजूबाजूचे लोक हॅक करतात आणि चकटफू मजा मारतात.

यामुळे बिल भरणाऱ्या सामान्य नागरिकाला मात्र त्रास सहन करावा लागतो. बिचारा त्याचं बिल भरतो आणि मजा कोणी तरी दुसराच घेतो.

मग त्या वायफायच्या मदतीने तो मुव्ही डाउनलोड करण्यापासून ते दिवसभर गेम खेळण्यापर्यंतचे असंख्य उद्योग करतो पण याचं बिल तुमच्या नावावर फाडलं जातं!

 

wifi router inmarathi
99.co

 

बऱ्याचदा तुम्ही टाकलेला पासवर्ड म्हणजे बॉम्ब पासून संरक्षणासाठी दिलेली ढाल सारखा असतो. तो त्याचा मर्यादेपर्यंत रोखू शकतो पण एकदा का तो हॅक झाला मग मात्र तुमचा डेटा, चोरांच्या हाती लागतो.

मग हे चोर तुमच्या डेटाचं “शोषण” करतात.

मग अश्यावेळी स्वतःच्या डेटाचं संरक्षण कसं करायचं आणि वायफायचं संरक्षण करायचा मोठा पेच तुमच्या समोर निर्माण झाला असेल तर काळजी करायचं कारण नाही.

आम्ही तुमच्यासाठी ८ टिप्स घेऊन आलो आहोत, यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या वायफायला हॅक होण्यापासून वाचवू शकतात. तसेच डेटा चोरी थांबवू शकतात.

 

१. WPA2 ला चालू करा :

ही गोष्ट जेव्हा तुम्ही तुमचं वायफाय राउटर विकत घेता त्यावेळी करायची सर्वात बेसिक गोष्ट असते.

हे तुमच्या डेटाला पॉईंट टू पॉईंट एनक्रिप्शन देत असतात. त्याचाच दुसरा प्रकार असतो WPA-PSK जो बऱ्याचदा घरच्या राउटर मध्ये असतो.

 

internet data-inmarathi
tp-link.com

 

ज्यांच्याकडे जुने राऊटर्स असतात त्यांचाकडे WEP अर्थात Wired Equivalent Privacy Security ही सेक्युरिटी असते. ह्या सेक्युरिटी अत्यंत बेसिक सेक्युरिटीज आहेत. ज्या केल्या पाहिजेत.

 

२. एक शक्तिशाली SSID नेटवर्क नामकरण करा :

 

internet data-inmarathi01
profandroid.com

 

कधीच तुमच्या राऊटरचं डिफॉल्ट नाव अर्थात D Link आणि netgear चा वापर करू नका.

हॅकर्स कडे एक उपकरण असतं ज्याचं नाव असतं रेनबो टेबल ज्याचा मदतीने ते तुमच्या नेटवर्क मध्ये प्रवेश करू शकतात त्यांना फक्त तुमच्या SSID ची गरज असते त्यामुळे ते चेंज करायला विसरू नका.

 

३. स्ट्रॉंग पासवर्डचा वापर करा :

 

internet data-inmarathi02
lifehacker.com

 

अर्थातच पासवर्ड्स हॅक करणं हॅकर्ससाठी कठीण काम नसलं तरी बऱ्याचदा तुम्ही तुमच्या पासवर्डचा तर्क लावून लोक फसव्या पद्धतीने वायफायचा आस्वाद घेत असतात.

अश्यावेळी तुमचा पासवर्ड हा अत्यंत सुरक्षित असणं गरजेचं आहे. त्यामुळे कोणी त्याला सहजासहजी क्रॅक करू शकणार नाही असा तो ठेवा, फक्त तुम्ही स्वतः विसरू नका.

 

४. राऊटरची फायर वॉल :

 

fire-wall-router-inmarathi
ronseal.info

जर तुमच्या कडे तुमच्या राऊटरसाठी फायर वॉल नसेल तर ती लवकरात लवकर खरेदी करा. ती राऊटरची इनबिल्ट संरक्षण प्रणाली आहे.

जी हॅकर्सला त्रास दायक ठरते. त्यामुळे ते हॅकिंग करू शकत नाही. नवीन राऊटरमध्ये “स्टीलथ मोड”च्या फायर वॉल असतात.

 

५. UPnP बंद करा :

UPnP म्हणजे Universe Plug And Play Protocol ( UPnP) ज्याचा उपयोग आसपासच्या डिव्हायसेस शी कनेक्शन प्रस्थापित करण्यासाठी केला जात असतो.

यामुळे तुमचं राऊटर हॅकर्सचा सहज निशाणा ठरू शकतात. यामुळे DoS अटॅक्स पण होऊ शकतात.

 

UPnP-Port-inmarathi
softpedia.com

 

प्रत्येक राऊटर UPnP Exploitation ला कारणीभूत नसतात पन काळजी घेतलेली कधीही बरीच असते.

 

६. VPN चा वापर करा :

तुमच्या राऊटरसाठीएक व्यक्तिगत VPN सर्व्हिस हा एक चांगला उपाय आहे जर तुम्ही थोडा खर्च करायला तयार असाल. VPN तुमच्या लोकेशन च्या मदतीने काम करते.

ते इतर गोष्टींपासून रक्षण करते इतकंच नव्हे तर स्वतः भवती एक फायर वॉल देखील तयार करते ज्यामुळे तुमच्या नेटवर्कचं संरक्षण होतं

 

vpn-inmarathi.jpg
pcwelt.de

 

तसेच राऊटर च्या रिमोट मॅनेजमेंट पेक्षा VPN चांगला पर्याय आहे. जो एक वेब बेस्ड इंटरफेस हे जगासमोर आणत असतो. प्रायव्हेट इंटरनेट एक्सेस अथवा VPN ह्यानेच तुमच्या डेटाचं रक्षण होणार आहे.

७. लॉग इन फिचर चालू करा :

 

internet data-inmarathi03
trustive.com

 

लॉग इन फिचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या वायफायला लॉग इन करणाऱ्या प्रत्येक डिव्हाईसची माहिती मिळवु शकतात. त्यांचा IP ऍड्रेस वरून त्यांना ब्लॉक पण करू शकतात. तसेच विविध संदिग्ध गतिविधिवर लक्ष ठेवू शकतात.

 

८. सेक्युरिटी सर्व्हिसेसचा वापर करा :

तुम्ही क्लाउड आधारित सेक्युरिटी सर्व्हिसेसचा वापर करून तुमच्या नेटवर्क ट्रॅफिकची तपासणी करू शकतात. फक्त तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिस नेम सर्व्हर शी तुमचं नेटवर्क याकरिता जोडावे लागणार आहे, तुमच्या ISP ची गरज उरणार नाही.

 

internet data-inmarathi04
boingboing.net

 

ह्या सर्व्हिसेस आहेत ज्यांचा मदतीने तुम्ही तुमच्या डेटाचं संरक्षण करू शकतात. तुमच्या नेटवर्क ची ट्रॅफिक संरक्षित करू शकतात.

तरी ह्यातून तुम्ही १००% डिव्हाईसल हॅकिंग पासून संरक्षित करू शकत नाही. परंतु याने त्याला तुम्ही सुरक्षित व थोड्याफार प्रमाणात संरक्षित करू शकता.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?