' ह्या ७ भारतीय “स्टार्स” चे, त्यांना पडद्यामागून घडवणारे अज्ञात गुरु – InMarathi

ह्या ७ भारतीय “स्टार्स” चे, त्यांना पडद्यामागून घडवणारे अज्ञात गुरु

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्या भारतीय संस्कृतीत आपण मातृदेवो भव पितृदेवो भव ह्यानंतर आचार्यदेवो भव असे म्हणतो. म्हणजेच आपल्या आयुष्यात माता पित्यानंतर सर्वोच्च स्थान कोणाला असेल तर ते गुरूला देण्यात आले आहे. गुरूंशिवाय ज्ञान मिळु शकत नाही. गुरू आपले आयुष्य घडवतात. ते आपल्याला चांगल्या वाईटातला फरक ओळखायला शिकवतात.

आपण चुकीच्या मार्गाने जात असू तर प्रसंगी कठोर होऊन आपल्याला शासन करून परत योग्य मार्गावर आणून सोडतात.

म्हणूनच जगात मोठ्या मोठ्या लोकांनी त्यांच्या यशस्वी होण्याचे श्रेय गुरूंना दिले आहे. भारतात आर्य चाणक्य, स्वामी रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद असे अनेक महान गुरू होऊन गेले.

फक्त भारतातच कशाला भारताबाहेर सुद्धा कन्फ्यूशियस, ऍरीस्टोटल, सॉक्रेटिस, जॉन लॉक, ऍन सुलीवान, अल्बर्ट आईन्स्टाईन असे महान गुरू होऊन गेले ज्यांनी जगाला वेगळा दृष्टिकोन दिला.

आपल्यासारख्या सामान्य माणसांना गुरू मिळणे कठीण असते. परंतु आपल्याला चांगले शिक्षक भेटले तर आपल्याही आयुष्याला चांगले वळण लागते. आपण ह्या आपल्या शिक्षकांनाच गुरू मानतो.

 

Sarvepalli_Radhakrishnan-inmarathi
FirstpostHindi.com

 

आजचा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. आजच्या दिवशी आपण आपले आयुष्य घडवणाऱ्या शिक्षक व गुरूंना वंदन करून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करतो. प्राचीन काळाप्रमाणे आजच्या काळातले गुरू सुद्धा अनेक व्यक्ती घडवत आहेत.

त्यातील अनेक लोक आज यशस्वीतेच्या शिखरावर विराजमान आहेत. त्या व्यक्ती सुद्धा त्यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या गुरूंना देतात. आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपण काही प्रसिध्द व्यक्तींच्या गुरूंची ओळख करून घेणार आहोत.

१) डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम :

भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे स्वतः अतिशय उत्तम शिक्षक होते. त्यांना शास्त्रज्ञ पेक्षा शिक्षक म्हटलेलं आवडेल असे ते कायम म्हणत असत. ते सुद्धा त्यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या शिक्षकांना देतात.

ते शाळेत असताना त्यांना मुथु अय्यर नावाचे शिक्षक शिकवत असत. डॉक्टर कलाम हे लहानपणापासून हुषार व मेहनती असल्याने त्यांच्या शिक्षकांचे ते लाडके विद्यार्थी होते.

डॉक्टर कलाम एकदा आजारी असल्यामुळे शाळेत जाऊ शकले नाहीत तेव्हा त्यांचे शिक्षक कलाम शाळेत का आले नाहीत हे बघायला त्यांच्या घरी आले. इतकी अय्यर सरांना त्यांच्या विद्यार्थ्यांची काळजी होती. ह्याच शिक्षकांनी कलमांना चांगल्या हस्ताक्षराचे, व्यायामाचे व चांगल्या सवयींचे महत्व लहानपणीच पटवून दिले.

 

apj abdul kalam-inmarathi
abdulkalam.com

 

कलाम ह्यांच्या शालेय जीवनातील दुसरे शिक्षक श्री शिव सुब्रमण्यम अय्यर हे एकदा वर्गात पक्षी कसे उडतात हे शिकवत असताना जेव्हा कलाम ह्यांना हे कसे घडते, असा प्रश्न पडला तेव्हा ते त्यांना व इतर विद्यार्थ्यांना समुद्रकिनारी घेऊन गेले व पक्षी कसे उडतात. ह्याचे प्रात्याक्षिक दाखवून समजावून सांगितले.

त्यांच्या ह्या शिकवण्याने कलाम ह्यांच्या मनात तेव्हाच फ्लाईट सायन्सचा अभ्यास करण्याची प्रेरणा निर्माण झाली व रामेश्वरम् च्या समुद्रकिनारी ह्या महान रॉकेट सायंटिस्टच्या अभ्यासाला सुरुवात झाली.

ह्याच प्रेरणेने कलाम ह्यांनी पुढे कॉलेजमध्ये फिजिक्सचा अभ्यास केला व ते पुढे एरोनॉटिकल इंजिनियर झाले. कलाम त्यांचे गणिताचे प्रोफेसर अयंगर सर तसेच त्यांचे MIT मधील डिझाईनिंग शिकवणारे प्रोफेसर श्रीनिवासन ह्यांनाही त्यांच्या आयुष्यात मानाचे स्थान व त्यांच्या ज्ञानाचे व यशाचे श्रेय देत असत.

)अटल बिहारी वाजपेयी :

भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी हे डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी व पंडित दीनदयाळ उपाध्याय ह्यांना आपले राजनैतिक गुरू मानत असत. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी ह्यांनी जनसंघाची स्थापना केली.त्यांच्याच हाताखाली वाजपेयी ह्यांनी सुरुवातीला राजकारणाचे धडे गिरवले.

 

shivprasad-mukharjee-inmarathi
liveaaryaavart.com

 

ते त्यांच्या राजकारणात येण्याचे श्रेय डॉ. मुखर्जी ह्यांना देतात. १९५३ साली श्यामाप्रसाद मुखर्जी जम्मू काश्मीर येथे लागू झालेल्या परमिट सिस्टीमचा विरोध करण्यासाठी गेले होते. तेव्हा वाजपेयी पत्रकारिता करत होते व ह्या कामासाठी ते ही जम्मू काश्मीर ला गेले होते.

काश्मीर मध्ये नजरकैदेत असताना डॉ मुखर्जी ह्यांचे निधन झाले.

त्यांच्या निधनाने वाजपेयी खूप व्यथित झाले आणि आपल्या गुरूंचे म्हणजेच डॉ मुखर्जी ह्यांचे अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी पत्रकारिता सोडून अटलजी राजकारणात आले.

३) लता मंगेशकर :

गानकोकीळा लता मंगेशकर ह्यांचे गुरू हे त्यांचे वडीलच म्हणजे पंडित दीनानाथ मंगेशकर हे होते. त्यांनीच लतादीदींना संगीताचे ज्ञान दिले. पंडित दीनानाथ मंगेशकर हे नावाजलेले शास्त्रीय गायक व संगीत रंगभूमीचे कलाकार होते.

वयाच्या पाचव्या वर्षापासूनच लतादीदींनी वडिलांबरोबर संगीत नाटकांत काम करण्यास सुरवात केली.

 

lata-mangeshkar-inmarathi
rediff.com

 

त्या केवळ तेरा वर्षाच्या असताना पंडित दीनानाथ मंगेशकर ह्यांचे निधन झाले.इतक्या कमी कालावधीत पंडित दीनानाथ मंगेशकरांनी एक महान गायिका घडवली.

वडिलांच्या मृत्यूनंतर लतादीदींनी उस्ताद अमान अली खान ह्यांच्या कडे शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले तसेच गुलाम हैदर ह्यांनी सुद्धा लतादीदींना सुरुवातीच्या काळात मार्गदर्शन केले.लतादीदी गुलाम हैदर ह्यांना त्यांचे गॉडफादर मानतात.

४)सचिन तेंडुलकर :

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ह्याचे गुरू रमाकांत आचरेकर सर आहेत हे अनेक जणांना ठाऊक आहेच. सचिनने मुंबई मधील शारदाश्रम विद्यामंदिर ह्या शाळेत क्रिकेटचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर ह्यांच्याकडून क्रिकेटचे धडे घेतले.

आचरेकर सरांनी आजवर सचिन तेंडुलकर, अजित आगरकर,संजय बांगर, प्रवीण आमरे, विनोद कांबळी हे आणि इतर अनेक चांगले क्रिकेटपटू घडवले आहेत.

 

sachin-tendulkar-ramakant-achrekar-inmarathi
dnaindia.com

 

सचिन कायम त्याच्या उत्तम खेळाचे श्रेय आचरेकर सरांना देतो.

५) मिल्खा सिंग :

फ्लायिंग सिख अशी ख्याती मिळवणारे तसेच भारताला कॉमनवेल्थ खेळात सुवर्णपदक मिळवून देणारे धावपटू मिल्खा सिंग हे त्यांचे कोच गुरुदेव सिंग ह्यांना त्यांचे प्रेरणास्थान मानतात.

लष्करात नोकरी मिळाल्यानंतर मिल्खा सिंग ह्यांनी गुरुदेव सिंग ह्यांच्याकडून प्रशिक्षण घेतले.

 

milkha-singh-inmarathi
defencelover.in

 

आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतांना त्यांना रणवीर सिंग ह्यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी मिल्खा सिंग ह्यांच्या खेळावर खूप मेहनत घेतली व मिल्खा सिंग ह्यांनीही त्यांच्या गुरूंना सुवर्णपदकाच्या रूपात गुरुदक्षिणा दिली.

६) महेंद्रसिंग धोनी :

क्रिकेटच्या आधी आपला कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी हा फुटबॉल खेळायचा. त्यात तो गोलकीपर होता. त्याचा खेळ बघून त्याच्या शाळेतील शिक्षक केशव बॅनर्जी सरांनी त्याला फुटबॉल सोडून क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला व त्याला शाळेच्या क्रिकेट टीम मध्ये घेतले.

 

ms dhoni-inmarathi
indiatimes.com

 

बॅनर्जी सरांनी धोनीला यष्टीरक्षणावर लक्ष केंद्रित करायला सांगितले. बॅनर्जी सरांबरोबरच चंचल भट्टाचार्य हे सुद्धा धोनीच्या शाळेचे क्रिकेट कोच होते. दोघांनी मिळून धोनीला क्रिकेटचे धडे दिले. महेंद्रसिंग धोनी हा हिरा पारखण्याचे श्रेय त्याच्या ह्या दोन गुरूंना जाते.

 

 

७) पी व्ही सिंधू :

ऑलिम्पिक खेळात रौप्य पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू पी व्ही सिंधू ही भारताची स्टार बॅडमिंटनपटू आहे. सिंधूचे आई वडील व्हॉलीबॉल खेळाडू आहेत परंतु तिने पी गोपीचंद ह्यांचा खेळ बघून लहानपणीच बॅडमिंटनपटू होण्याचे ठरवले होते.

तिने पुलेला गोपीचंद ह्यांच्या गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेणे सुरू केले.

 

sindhu-inmarathi
techfactslive.com

 

पुलेला गोपीचंद गेली अनेक वर्षे अनेक गुणी खेळाडूंना बॅडमिंटनचे धडे देऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करण्यात मार्गदर्शन करत आहेत. सिंधू तिच्या खेळाचे श्रेय तिच्या गुरूंना म्हणजेच पी गोपीचंद ह्यांना देते.

गोपीचंद ह्यांनी कष्ट करून ही अकॅडमी उभी केली आहे. ते आउट ऑफ द वे जाऊन भारतासाठी उत्तम खेळाडू घडवत आहेत.

असे हे महान गुरू व त्यांचे यशस्वी शिष्य आहेत. माणसाला योग्य गुरू लाभला तर माणूस शून्यातुन स्वर्ग उभा करू शकतो ह्याची अनेक उदाहरणे आपल्याला माहीत आहेत.

आजच्या ह्या शिक्षकदिनी ह्या सर्व कर्तव्यकठोर, शिष्यांचे गुण जोखून त्यांना मार्ग दाखवणाऱ्या, विद्यार्थ्यांवर /शिष्यांवर अमाप माया करणाऱ्या , पाठीवर हात ठेवून लढ म्हणणाऱ्या सर्व शिक्षकांना, गुरूंना सादर प्रणाम!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?