स्टीम इंजिन ते बुलेट ट्रेन – तुमच्या बाईक सारखे रेल्वेला गियर्स असतात का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

रेल्वे ही गतिमान प्रवासाचे साधन म्हणून ओळखली जाते. औद्योगिक क्रांतीमध्ये रेल्वेचा प्रमुख वाटा आहे. आताच्या फास्ट जगात आरामदायक तसेच जलद प्रवासाचे साधन म्हणून जवळपास सगळेच लोक रेल्वेला पसंती देतात.

भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या रेल्वेसेवांपैकी एक आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच रेल्वेचे आकर्षण वाटते. रेल्वेची सुरुवात वाफेच्या इंजिनापासून झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत रेल्वे मध्ये अनेक बदल व सुधारणा झाल्या आहेत.

old train inmarathi

ट्रेनच्या इंजिनची यंत्रणा पुढीलप्रमाणे चालते. रेल्वेचे इंजिन शक्तीचे रूपांतर गतीमध्ये करते.

गती मिळवण्यासाठी रेल्वेची चाके फिरणे आवश्यक असते. ही चाके फिरण्यासाठी शक्तीची आवश्यकता असते.

पूर्वी जेव्हा वाफेवरची इंजिने असायची तेव्हा हे शक्तीचे रूपांतर गतीमध्ये करण्यासाठी ट्रेनला गियर दिलेले असत.तसेच काही ट्रेनमध्ये साईड रॉड दिलेले असत.

ह्या रॉडमुळे चाके फिरत असत.जुन्या वाफेच्या इंजिनांमध्ये बॉईलर मधल्या वाफेने रॉड ढकलले जात असत आणि रॉड ढकलल्या गेले की चाके फिरत असत. अशी जुन्या इंजिनाची यंत्रणा होती.

१७७० च्या दशकात जेम्स वॅटने पहिले वाफेचे इंजिन तयार केले होते. परंतु त्याने ह्याचे पेटंट कोणालाही दिले नाही .त्याला त्याच्या शोधाद्वारे कोणाचाही आर्थिक फायदा करून देण्याची इच्छा नव्हती.

१८०० मध्ये वॅटचे पेटंट संपले व अनेकांनी स्टीम लोकोमोटिव्ह तयार करण्याचे प्रयत्न सुरू केले.

 

train gear-inmarathi02
britannica.com

 

रिचर्ड ट्रेवीथीक ह्याने वॅट नंतर पहिल्यांदा हाय प्रेशर स्टीम इंजिन तयार केले होते.त्याचे पहिले डिझाईन यशस्वी ठरले नाही तरीही त्याने प्रयत्न सोडले नाहीत.त्याने त्याच्या डिजाईनमध्ये अनेक बदल केले व लंडनच्या टॉरिंगटन स्क्वेअरमध्ये त्याने “कॅच मी हु कॅन” हा मेकशिफ्ट ट्रेन ट्रॅक सेट यशस्वी पणे चालवून दाखवला होता.

त्यानंतर इंग्लिश इंजिनियर मॅथ्यू मरे ह्याने पहिले मुविंग स्टीम लोकोमोटिव्ह १८०४ मध्ये तयार केले. १८१२ मध्ये त्याने ट्वीन सिलेंडर Salamanca हे लोकोमोटिव्ह बनवले. परंतु त्याचीही ट्रेन ट्रॅक वर चालली नाही. तो मान आहे जॉर्ज स्टीफनसनचा!

जगातील पहिले वाफेचे इंजिन १९१४ मध्ये यशस्वीपणे धावले. हे इंजिन जॉर्ज स्टीफनसन ह्या इंग्लिश इंजिनियरने डिझाइन केले होते. हे डिझाईन रिचर्ड ट्रेविथीक ने १९०४ मध्ये जे डिजाईन तयार केलेले होते त्यावरच आधारलेले होते.

1914 old train inmarathi

स्टीफनसन ह्याने तयार केलेले लोकोमोटिव्ह ४५ mph ह्या गतीने स्टॉकटन ते डार्लिंगटनदरम्यान धावले व ह्यात ३० माणसे बसली होती. स्टीफनसन ह्याने ट्यूब प्रेशराईज्ड बॉईलर ही यंत्रणा वापरून वाफेचे इंजिन तयार केले होते.

अनेक लोकांना नेहमी पडणारा प्रश्न म्हणजे जसे जवळपास सर्वच वाहनांना गियर्स असतात तसेच रेल्वेला सुद्धा गियर्स असतात का?

तर ह्याचे उत्तर आहे रेल्वेला टिपिकल गाड्यांसारखे शिफ्टिंग गियर असणारे गियर बॉक्स नसतात. रेल्वेला बेसिक दोन प्रकारचे गियर्स असतात.

हे गियर्स रेल्वेच्या चाकांच्या एक्सलला जोडलेले असतात. हे दोन प्रकारचे गियर्स म्हणजे मेन गियर आणि पिनियन गियर होय. हे पिनियन गियर ट्रॅक्शन मोटरला जोडलेले असतात तर मेन गियर हे मुख्य चाकाला जोडलेले असतात.

 

 

इलेक्ट्रिक मोटर्सना गियरची आवश्यकता नसते कारण त्यांचा टॉर्क शक्तिशाली असतो किंवा कधी कधी इलेक्ट्रिक लोकोमोटरला एक सिंगल गियर दिलेला असतो. डिझेल वॅगन्सनाही गियर्स असतात.

काही डिझेल वॅगन्स मध्ये टॉर्क कन्व्हर्टर सह तीन ते चार गियर बॉक्स दिले असतात. काही वॅगन्सना ट्रक सारखे मॅन्युअल क्लच आणि गियर बॉक्स दिलेले असतात. ट्रेन कंडक्टरजवळ क्लच पेडल व गियर लिव्हर असतात.

मालगाडीच्या इंजिनाला १:४:५ ह्या रेशीयोने गियर दिले असतात तर पॅसेंजर ट्रेनला इंजिनाला १:२:५ हा रेशीयो असतो. परंतु रेल्वे इंजिनाला कार किंवा ट्रक सारखे ट्रान्समिशन गियर्स नसतात.

malgadi train inmarathi

ताचे इंजिन हे डिझेल किंवा वीजेवर चालतात. डिझेल इंजिनामध्ये अल्टरनेटर दिलेले असतात ज्यामुळे ट्रॅक्शन मोटर चालते.

अगदी बेसिक लोकोमोटिव्ह मध्ये सहा ट्रॅक्शन मोटर्स व एक अल्टरनेटर दिलेले असते. लोको पायलट त्याच्या केबिन मध्ये असलेल्या लिव्हरने ट्रॅक्शन मोटर मधून पास होणारा करंट कमी जास्त करू शकतो. ह्याने रेल्वेचा वेग कमी जास्त होतो. करंट कमी जास्त करण्यासाठी अल्टरनेटरला फिल्ड कॉईल्स जोडलेल्या असतात.

छोट्या स्वयंचलीत वॅगन्स लहान मार्गांवर पॅसेंजर सुविधा देतात. ह्या वॅगन्सना लोकोमोटिव्ह म्हणजेच इंजिनची गरज नसते कारण ह्या वॅगन मध्येच डिझेल किंवा इलेक्ट्रिक इंजिन असते.

ह्या वॅगन्स मोठ्या ट्राम प्रमाणेच दिसतात व ह्यांना अश्याच आणखी तीन ते चार वॅगन्स जोडलेल्या असतात आणि त्याही रुळांवरच धावतात.

जगातील सर्वात जलद स्टीम लोकोमोटिव्ह A4 ‘Mallard’ ४-६-२ हे होते. ह्याचा वेग १२५ ते १२६ mph इतका होता.

१९९७ च्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड च्या मते फ्रेंच TGV हे एका स्टेशनहुन दुसऱ्या स्टेशनवर सर्वात जलद म्हणजेच २५३ kph ह्या गतीने जाऊ शकते. हे इंजिन ३०० mph ह्या गती पर्यंत पोहोचू शकते.

 

train gear-inmarathi03
finance.yahoo.com

 

परंतु हा रेकॉर्ड जपानी इंजिन लवकरच मोडेल अशी शक्यता आहे. जपानी Shinkansen इंजिन हे हिरोशिमा ते कोकुरा स्टेशन हे अंतर २६१.८ kph ह्या गतीने कापू शकते.

जुने वाफेचे इंजिन ४० mph ह्या गतीने चालत असे. ते त्याही पेक्षा जास्त गतीने जाऊ शकत होते परंतु ट्रॅकच्या मेंटेनन्सचा प्रश्न असल्याने त्यांची गती ४५ mph पेक्षा जास्त ठेवणे शक्य नव्हते. तरीही त्यातल्या त्यात स्टॅनली स्टीमर कार्स ७५ mph इतक्या गतीने जाऊ शकत असत.

जगातील पहिली इलेक्ट्रिक ट्राम लाईन जर्मनीमधील बर्लिनजवळच्या Lichterfelde येथे सुरू झाली. ही ट्राम लाईन Wernet von Siemens ह्यांनी तयार केली होती. सध्याची सर्वात जलद रेल्वे म्हणजे जर्मन बुलेट ट्रेन्स आहेत. ही बुलेट ट्रेन ३०० mph ह्या गतीने जाऊ शकते.

japan bullet train inmarathi

पण ह्या जर्मन ट्रेनला फ्रेंच TGV व जपानी shinkasen रेल्वे तगडी स्पर्धा देत आहेत.

जगातील पहिली बुलेट ट्रेन बनवण्याचा मान जपानला जातो. आताच्या बुलेट ट्रेन आणि Maglev ट्रेनचा वेग विमानाच्या टेक ऑफ स्पीड पेक्षाही जास्त आहे. एप्रिल २०१५ च्या टेस्ट रन मध्ये Maglev ट्रेनचा वेग ६०३ किलोमीटर प्रति तास इतका मोजण्यात आला होता.

रेल्वे इंजिनाचा वाफेचे इंजिन ते जलद बुलेट ट्रेन हा प्रवास थक्क करणारा आहे. टेक्नॉलॉजीच्या प्रगतीमुळे मध्ये दिवसेंदिवस नवे शोध लागत आहेत. भविष्यात ह्यापेक्षाही जलद आणि ऍडव्हान्स्ड ट्रेन येतील आणि आपला प्रवासाचा वेळ वाचेल.

 

bullet-train-india InMararthi

 

इंजिनियर्स जलद,आरामदायक व सुरक्षित लोकोमोटिव्ह तयार करण्याचे सतत प्रयत्न करत आहेत. लवकरच ट्रेन विमानाच्या वेगाने धावू लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “स्टीम इंजिन ते बुलेट ट्रेन – तुमच्या बाईक सारखे रेल्वेला गियर्स असतात का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?