' सोन्याच्या खाणी असणारा अलास्का, रशियाने अमेरिकेला कवडीमोल भावात का विकला?

सोन्याच्या खाणी असणारा अलास्का, रशियाने अमेरिकेला कवडीमोल भावात का विकला?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

अमेरिका व रशिया हे पारंपरिक शत्रू आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर ह्या दोन देशांमध्ये शीतयुद्ध सुरू झाले. जगावर सत्ता कोणाची चालणार ह्यावरून ह्या दोन्ही देशांमध्ये स्पर्धा आहे.

अमेरिका जवळपास सर्व देशांना आपल्या तालावर नाचवते. ह्याच बलाढ्य अमेरिकेला रशिया अजिबात जुमानत नाही. आंतरराष्ट्रीय राजकारणातले हे दोन मोठे मोहरे आहेत.

असे असले तरी भूतकाळात अमेरिकेने रशियाकडून ७२ लाख डॉलर्सच्या बदल्यात एक अख्खा प्रांतच विकत घेतला आहे.

३० मार्च १८६७ मध्ये रशियाने त्यांचा अलास्का हा प्रांत अमेरिकेला ७२ मिलियन डॉलर्सला विकला. त्यानंतर ५० वर्षातच अमेरिकेने ही ७२ लाख डॉलर्सची तूट अनेक पटींनी भरून काढली.

ह्यासाठी ज्या वाटाघाटी झाल्या, ती मिटिंग रात्रभर चालली. अखेर पहाटे ४ वाजता वॉशिंग्टनमधील रशियाचे राजदूत, एडवर्ड डी स्टोइकेल ह्यांनी अमेरिकेचे सचिव विल्यम सेवर्ड ह्यांच्याबरोबर झालेल्या करारावर स्वाक्षरी केली.

आणि ह्या कराराद्वारे रशियामधील अतिशय दुर्गम भागात असलेला तसेच अतिशय कमी लोकसंख्या असलेला अलास्का नावाचा प्रांत अमेरिकेने विकत घेतला.

अलास्का हा प्रांत अमेरिकेच्या टेक्सासपेक्षा दुप्पट मोठा आहे. परंतु हा प्रांत अतिशय दुर्गम भागात आहे. असे असले तरी अमेरिकेने हा प्रांत आजच्या किमतीत बघायचे झाल्यास तब्बल १२५ मिलियन डॉलर्सला का बरं विकत घेतला असेल?

अनेक लोकांना असे वाटते की, अमेरिकेने अलास्कावर अनधिकृत कब्जा केला किंवा तो प्रांत रशियाकडून जबरदस्तीने घेतला. परंतु असे घडलेले नाही. हा एक अधिकृत करार होता.

 

alaska-inmarathi

 

एकोणिसाव्या शतकात रशियन अलास्का हे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे केंद्र होते. तेव्हाची राजधानी Novoarkhangelsk (जी आता सिटका म्हणून ओळखली जाते) येथे चायनीज चहा, कापड तसेच बर्फाचा व्यापार होत असे.

फ्रीजचा शोध लागण्याआधी अमेरिकेतील दक्षिणेकडील राज्यांना बर्फाची गरज भासत असे.

तेव्हा येथे व्यापारासाठी बोटी तसेच कारखाने बांधले गेले. कोळश्यासाठी खाणी खोदण्यात आल्या. तसेच ह्या परिसरात सोन्याच्या खाणी आहेत हे सुद्धा लोकांना माहीत होते.

१७८४ पासूनच रशियन लोकांनी अलास्कामध्ये जाऊन राहणे सुरू केले. तेथे त्यांनी पोस्ट ऑफिसेस तसेच त्यांचे ईस्टर्न ऑर्थोडोक्स चर्चेस बांधण्यास सुरुवात केली. त्यांनी हे सगळे अलास्काच्या समुद्रकिनारी भागात बांधणे सुरू केले. रशियन व्यापारी अलास्कामध्ये वॉलरस ह्या प्राण्याच्या आयव्हरी (हस्तिदंती) व सी ऑटरच्या मूल्यवान फर साठी येत असत.

वॉलरस आयव्हरीलाही हस्तिदंताप्रमाणे मोठी किंमत होती. येथील स्थानिक लोक ह्या दोन गोष्टी विकत असत.

हा व्यापार रशियन अमेरिकन कंपनीद्वारे होत असे. ही कंपनी व्यापाऱ्यांनी सुरू केली होती. ह्या परिसरात आढळणाऱ्या खनिज संपत्तीवर ह्या कंपनीचा कंट्रोल होता. ह्या कंपनीला हे सर्व हक्क रशियन सरकारने दिले होते.

त्या बदल्यात रशियन सरकार ह्या कंपनीकडून भरपूर कर वसूल करत असे. तसेच झारचा ह्या कंपनीत मोठा वाटा होता. ह्या कंपनीने त्या काळात भरपूर नफा कमावला.

 

alaska-inmarathi04.jpg

 

वयोमानानुसार झारने कंपनीतुन निवृत्ती घेतल्यानंतर त्यांच्या जागी कॅप्टन लेफ्टनंट हेजमिस्टर ह्यांनी काम सुरू केले.

त्यांनी स्वतःबरोबर अनेक नौदल अधिकाऱ्यांना ह्या कंपनीत घेतले व असा नियम केला की, कंपनीचे नेतृत्व फक्त नौदल अधिकारीच करू शकतील. ह्यांच्या काळात कंपनीने नफा तर कमावला पण त्यांच्या अनेक निर्णयामुळे कंपनीचे नंतर फार मोठे नुकसान झाले.

कंपनीत नव्याने आलेल्या अधिकाऱ्यांना गलेलठ्ठ पगार मिळू लागले. एक सामान्य अधिकारी सुद्धा दीड हजार रुबल इतका पगार घेत असे. तर मोठे अधिकारी दीड लाख रुबल इतका पगार घेत असत.

ही कंपनी स्थानिक लोकांकडून अर्ध्या किमतीत सी ऑटरचे फर विकत घेत असे. ह्यामुळे झाले असे की, पुढच्या २० वर्षात पैसे कमावण्यासाठी स्थानिक एस्किमो लोकांनी सी ऑटरची मोठ्या प्रमाणात शिकार करून त्यांचे अस्तित्वच धोक्यात आणले.

ह्याने फरच्या व्यापारावर वाईट परिणाम झाला. जे मूल्यवान फर ह्या प्रांताला भरपूर पैसा कमवून देत होते तेच फर बाजारात दिसेनासे झाले. ह्याने स्थानिक लोकांचा व्यापार बंद पडायची वेळ आली. त्यांच्यात असंतोष निर्माण झाला.

स्वतःचे पगार कमी करण्याचा प्रश्नच येत नव्हता. त्यामुळे रेव्हेन्यूसाठी अधिकाऱ्यांनी मग चहा व बर्फाच्या व्यापारावर लक्ष केंद्रित केले. परंतु ह्याचे व्यवस्थापन नीट न जमल्याने कंपनी डबघाईस आली.

ह्यानंतर क्रिमियन युद्ध सुरू झाले. फ्रांस, टर्की व ब्रिटन रशियाविरुद्ध उभे राहिले. सागरी मार्ग सुद्धा त्यांच्या ताब्यात गेले. सोन्याच्या खाणींचेही काम थांबले. ह्या परिस्थितीत अलास्का ताब्यात ठेवणे रशियाला न परवडणारे झाले.

अलास्का ब्रिटिशांच्या ताब्यात जाण्याची परिस्थिती निर्माण झाली. असे झाले असते तर रशियाच्या हाती काहीच लागले नसते. रशिया व ब्रिटन मधील तणाव दिवसेंदिवस वाढत होता. मात्र ह्याच काळात रशियाचे अमेरिकेशी संबंध बरे होते.

 

alaska-inmarathi03

 

१८५० सालानंतर रशियाचा ब्रिटनने क्रिमियन युद्धात पराभव केला. तेव्हा रशियाचे झार अलेक्झांडर दुसरे ह्यांना भीती वाटली की पुढे मागे ह्या युद्धामुळे आपला अलास्कावरील ताबा जाऊन तो भाग ब्रिटनच्या ताब्यात जाईल.

म्हणूनच त्यांनी एक करार करण्याचे ठरवले. त्यांनी अलास्का हा प्रांत अमेरिकेला विकण्याचे ठरवले.

तेव्हाची राजधानी सेंट पिटर्सबर्ग येथील काही अधिकारी १८५९ साली पहिल्यांदा अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना भेटले व त्यांनी अलास्का हा प्रांत विकण्याचे जाहीर केले.

तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेम्स बुचनन होते. परंतु ह्याच काळात यादवी युद्धाला तोंड फुटल्यामुळे हा करार झालाच नाही. सेवार्ड हे अब्राहम लिंकन व अँड्र्यू जॉन्सन ह्यांच्या काळात स्टेट सेक्रेटरी होते. ते हा करार व्हावा ह्या मताचे होते.

त्यांनी त्यांच्यावर संपादकीयांतून उडवल्या जाणाऱ्या खिल्लीवर जाहीर टीका केली. ह्या संपादकीयांमध्ये ह्या कराराला “सेवार्डस आईसबॉक्स”“जॉन्सन्स पोलर बेअर गार्डन” असे संबोधित करून टीका झाली होती. तसेच ह्या कराराला रशियन लोकांचाही विरोध होता.

ह्या प्रांतावर इतकी मेहनत घेतल्या नंतर हा प्रांत असा विकून टाकणे योग्य नाही असे रशियन लोकांचे म्हणणे होते. तरीही हा करार झाला.

हे ही वाचा –

===

 

हा करार यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी झारने स्टोईकेल ह्यांना पंचवीस हजार डॉलर्स इतकी रक्कम बक्षीस म्हणून तसेच वर्षाचे सहा हजार डॉलर्स इतकी पेन्शन दिली होती. त्या काळी ही रक्कम मोठीच होती.

स्टोईकेल ह्यांनी १८६९ पर्यंत रशियन मंत्री म्हणून काम केले व नंतर ते फ्रांसला गेले. १८९२ मध्ये पॅरिस येथे त्यांचे निधन झाले.

 

alaska-inmarathi02

 

मॅसॅच्युसेट्सच्या वॉर्सेस्टर येथील होली क्रॉस कॉलेजमधील इतिहासकार ग्वेन मिलर ह्यांच्या मते वॉशिंग्टन मधील लोकांना सुद्धा हा करार व्हावा असेच वाटत होते.

कारण ह्या कराराने ब्रिटिशांना ह्या भागात येण्यापासून रोखता आले असते. तसेच अमेरिका व चीन ह्यांच्यातील व्यापाराला सुद्धा चालना मिळाली असती. ह्याचा संबंध मॅनिफेस्ट डेस्टिनिशी म्हणजेच अमेरिकेच्या विस्ताराशी होता.

९ एप्रिल रोजी सिनेटने ३७ मतांनी ह्या कराराला मान्यता दिली. ह्या कराराला परराष्ट्र समितीचे सिनेटर चार्ल्स सुमनेर ह्यांनी पाठिंबा दिला. ह्या कराराला मान्यता मिळाल्यानंतर सेवार्ड ह्यांनी कराराला मान्यता देणाऱ्या सिनेटर्सना त्यांच्या घरी मेजवानी दिली.

हा करार पूर्ण होण्यासाठी ज्या पैश्यांची गरज होती तो पैसा देण्यास रिपब्लिकन नेतृत्वाने नकार दिला. अखेर त्यांनाही हार मानावी लागली.

ह्या कराराच्या संदर्भात मतदान घेण्यात आले. करार व्हावा ह्या बाजूने ११३ मते पडली व कराराच्या विरोधात ४८ मते पडली. १४ जुलै १८६८ रोजी अखेर हाऊसने सुद्धा ह्या कराराला मान्यता दिली व रशियाला १ ऑगस्ट रोजी रक्कम हस्तांतरित केली.

१८९६ साली अलास्कामध्ये सोन्याच्या खाणी सापडल्यानंतर तेथील लोकसंख्या वाढली.

१९१२ साली ह्या प्रदेशाला प्रांत म्हणून मान्यता मिळाली. ह्या प्रांतातील काही भाग १९४२ साली दुसऱ्या महायुद्धात काही काळासाठी जपानी लोकांनी काबीज केला होता. नंतर तो अमेरिकेने परत मिळवला.

अखेर ३ जानेवारी १९५९ रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ड्वाइट डी. आयसेनहोव्हर ह्यांनी अलास्का हे अमेरिकेच्या युनियन मधील ४९वे राज्य घोषित केले.

नौदल अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे जर रशियन अमेरिकन कंपनी बंद पडली नसती किंवा युद्धात रशियाचा पराभव झाला नसता तर रशियाला ह्या सोन्याची अंडी देणाऱ्या अलास्काची विक्री करावी लागली नसती.

कदाचित आंतरराष्ट्रीय राजकारणात आज आहे त्यापेक्षा वेगळे चित्र दिसले असते.

===

हे ही वाचा –

===

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?