' जगभरात विविध रंगात साजरी होणारी कृष्ण जन्माष्टमीची ही रुपं पाहून तुमच्याही डोळ्यांचं पारणं फिटेल – InMarathi

जगभरात विविध रंगात साजरी होणारी कृष्ण जन्माष्टमीची ही रुपं पाहून तुमच्याही डोळ्यांचं पारणं फिटेल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

गोकुल धाम बिरजका बासी कान्हा नंदकिशोर..! कन्हैय्या, चितचोर, माखनचोर, नंदलाल, कृष्ण, मुरलीधर आणि अगदी रणछोडदास..!! कित्येक नावांनी जाणला जाणारा आपल्या सगळ्यांचा लाडका कान्हा.

या बाळकृष्णाचा आज जन्मदिवस.. म्हणजेच गोकुळाष्टमी किंवा कृष्णजन्माष्टमी.. भारतातील एक महत्वाचा उत्सव..

कृष्णांबद्दल काय सांगावे आणि किती सांगावे..?! त्याच्या जीवनातील प्रत्येक पान हे आपल्या सारख्यांच्या आयुष्यात एक जीवनावश्यक बोध शिकवणारे आहे.

कंसाच्या कोठडीतून जन्म घेऊन यादवांना उपदेश करेपर्यंतचे कृष्णाचे जीवन आपल्यासाठी अध्यात्माचा एक खजिना आहे. भागवद्गीतेला आपण पूजतो, त्या ही पेक्षा त्यातील संदेश घेऊन वागलो तर आपल्या जन्माचे सार्थकच मानतो..

 

krishna basuri InMararhi

 

आपण जीवन जगताना सुखद दुःखद प्रसंगांना सामोरे जातो. पण कृष्णाच्या जीवनातील प्रसंग हे साधे सुधे नसून सगळ्या कृष्णलीला होत्या.

गोपिकांचा सखा कृष्ण, अर्जुनाचा सारथी कृष्ण, द्रौपदी चा भाऊ कृष्ण, सुदम्याचा परममित्र कृष्ण, द्वारकेचा महाराणा कृष्ण, राधेशी एकरूप कृष्ण, गोकुळवासीयांचा आधार कृष्ण.. अपरंपार लीला, त्यातून सगळ्यांना हवीहवीशी वाटणारी लीला म्हणजे यशोदेच्या नटखट कान्हाची लीला..

 

krishna radha 5 InMarathi

 

बाळकृष्ण हे रूप सगळ्यांना भावेल असेच आहे. गोड निळा सावळा बालक, त्याच्या अंगावर सुंदर दागिने, हातात मुरली आणि डोक्यावर मयुरपंख.. लोभस, गोजिरवाणे रूप.

 

bal krishna InMarathi

 

अशा कान्हाला सगळ्यात आवडते ते म्हणजे लोणी. गोकुळात कोण्याच्याही घरी जाऊन लोण्यावर ताव मारणे म्हणजे जणू काही कृष्णाला जन्मापासून मिळालेला प्रेमळ अधिकार. कोणी गोपिका रागे भरू लागल्या तरी गोंडस कान्हाला असे किती रागावणार?

यशोदेला मुखातून ब्रह्मांडाचे दर्शन देणे असो किंवा गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलून, गोकुळ वासीयांना पावसापासून वाचवून इंद्राचे गर्व हरण असो.. पुतनेचा वध असो वा कालिया मर्दन एकनेक गोष्ट ऐकताना, पाहताना मन तल्लीन होऊन जाते.

ते गोजिरवाणे बाल रूप पाहून मनाचे समाधान कधीही होत नाही.. सतत त्या बालरूपाचे दर्शन घडवले असे वाटतच राहते.

 

shri-krishna-marathipizza
onlineprasad.com

 

ह्या कृष्णाचा जन्मदिन म्हणजे जन्माष्टमी साजरी करणे म्हणजे आपल्या मनातील प्रेम, भक्ती त्या नारायणापाशी व्यक्त करणे.

वासुदेव आणि देवकीच्या पोटी जन्मलेला आणि नंद आणि यशोदेच्या वाढवलेला तो कान्हा. त्याच्या जन्माची कथाही तितकीच अद्भुत.

देवकीचे आठवे बाळ जे कंसाला मारून टाकायचे असते असा तो कृष्ण जन्माला येतो आणि कोठडीचे दरवाजे उघडतात. वासुदेव त्या लहानग्याला पाटीत ठेवून उफळलेल्या यमुनेच्या पत्रातून गोकुळास निघतो.

त्या बालकाच्या पदस्पर्शाने ती उफाळलेली यमुना देखील शांत होते आणि वसुदेवाला वाट करून देते. पुढे त्या बालकाच्या लीला आपणास माहीतच आहेत.

 

bal krishna 1 InMarathi

 

कृष्ण हा रात्री जन्माला म्हणून जन्माष्टमी ही रात्रीच साजरी करतात. बाराच्या ठोक्याला कोणी गोपाळ घ्या कोणी गोविंद घ्या असा गजर ऐकू येतो. सुंदर सुवासिक फुलांनी सजवलेल्या पाळण्यात बालकृष्णाची मूर्ती विराजमान होते. त्याआधी कान्हाला दही, मध, तुपाचा अभिषेक होतो.. त्याच्या आवडीचे लोणी, पंचामृत असे नैवेद्य कृष्णार्पण होतात..

 

bal krishna 2 InMarathi

 

भजन कीर्तन असे कार्यक्रम सोबतीला असल्याने जगरणाला उधाण येते.. रासलीला आणि कृष्ण नामाचा गाजर वातावरण भरून टाकतो.

 

dahihandi-marathipizza00
youtube.com

 

कृष्णाची जन्मभूमी मथुरा आणि कर्मभूमी वृंदावन येथे खासा सण साजरा होतो. उपवास करणे, गोडधोड पपदार्थ बनवणे, भजन कीर्तन आणि रासलीला करणे हे भारतातील काही प्रांतात (जसे मिझोराम, राजस्थान, गुजरात) जन्माष्टमी साजरी करण्याची प्रतीके आहेत.

महाराष्ट्रातही जोरदार गोकुळाष्टमी साजरी होते. महाराष्ट्र ही कृष्णाची सासुरवाडी आहे म्हणजे रुख्मिणीचे माहेरघर..!!

कान्हाचे आवडते लोणी शिंकाळ्यावर उंचच उंच बांधून तिथवर चढायला गोविंदा पथक माणसांचे थर लावतात. वरती चढणारा आणि दह्याची हंडी फोडणारा कान्हास्वरूप असतो. हंडी फोडल्यास त्यांना बक्षीस ही मिळते.

लहान लहान मुलांना कृष्णारुपात आणि मुलींना राधेच्या रुपात सजवणे ही इथली खासियत..

गुजरात, राजस्थान आणि उत्तरेकडे देखील ह्या उत्सवाला खूप मोठे रूप दिले जाते. रात्री पासून जन्मोत्सव साजरा होतो.. कृष्ण आणि विष्णू मंदिरे सजवली जातात. भजनं आणि रासलीला हा उत्सवाचा मुख्य भाग मानला जातो. कृष्णलीलांवरील कथक नृत्य हे उत्तरेकडे खूपच प्रसिद्ध आहे.

 

janmashtami-inmarathi
india.com

 

पूर्वेकडील राज्यात लहान मुलांना कृष्णरूपात सजवणे, त्यांना कृष्णालीला चे काही भाग नाट्यमय रूपाने करायला देणे असे काही मनोरंजनाचे कार्यक्रम असतात. कृष्ण गीतांवरील नृत्यविष्कारही एक मोठा कार्यक्रम असतो. ओडिशा आणि बंगाल मध्येही खूप उत्साहात सण साजरा होतो.

तिथे दुसऱ्यादिवशी नंदोत्सव देखील असतो. जो कृष्णाच्या यशोदा आणि नंद ह्या मात्यपित्याच्या स्मरणार्थ असतो. ह्या दिवशी तेथील मानसी उपवास सोडतात आणि एकमेकांना मिठाई आणि इतर पदार्थ वाटतात.

 

sweet InMarathi

 

दक्षिणे कडे कृष्णमंदिरात सजावट करतात.. फळे आणि गोड पदार्थांचा नैवेद्य कृष्णाला अर्पण करतात. तांदुळाच्या पिठाच्या अबी फुलांच्या रांगोळ्यानी परिसरास शोभा येते.

आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक येते कृष्ण भाजनांना उधाण येते. उपवास करणे, भगवद्गीता वाचन करणे हे देखील भक्तिभावाने केले जाते.

भारतात सगळीकडेच जन्माष्टमी मोठ्या उत्साहाने साजरा होत असताना भारताबाहेरील देशातही ह्या सणाला सन्मानाने साजरे केले जाते..

इस्कॉन, चिन्मय मिशन आशा संस्थानमुळे भारताबाहेरही कृष्णभक्त आहेत. ते भारतीयच आहेत असे नाही. परदेशातील कित्येक वेगवेगळ्या धर्माच्या माणसांनी हिंदू धर्म स्वीकारून आपले जीवन कृष्णसेवेला अर्पण केले आहे..

 

janmashta-inmarathi
youtube.com

 

इस्कॉन ची मंदिरे जगभर आपणास दिसतील आणि तेथील भक्त ही इंग्रजी हेल असला तरी भावपूर्ण भजन कीर्तन करताना दिसतील. तिथे भगवद्गीतेचे संस्कृत श्लोक पाठही केले जातात आणि जन्मोत्सवात त्यांचे सामूहिक पठण केले जाते.

तेथील कृष्णामंदिरे सजवली जातात आणि रात्री कृष्णाजन्मही साजरा होतो.

तसेच नेपाळ, बांग्लादेश, पाकिस्तान, फिजी देशातील हिंदू देखील मोठ्या भक्तिभावाने कृष्णाष्टमी साजरी करतात.

सण साजरा करण्याची पद्धत जरी सगळी कडे वेगवेगळी असली तरी भाव मात्र एकाच असतो.

ईश्वरासाठी असलेल्या अंतिरीच्या भावामुळे सगळेजण एकत्र येतात आणि ईश्वराला आळवतात. जन्म, उपवास, नैवेद्य, भोजन प्रसाद, नृत्य, भजने, आणि रासलीला हे सगळे ‘कृष्णार्पणमस्तू’ ह्या भावनेने साजरे होते. भारतीय सण खरोखरीच आपल्या आयुष्यात रंग भरतात..!!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?