' …म्हणून नोबेल विजेते सी.वी. रमण करायचे नेहरूंचा जाहीरपणे दुस्वास – वाचा – InMarathi

…म्हणून नोबेल विजेते सी.वी. रमण करायचे नेहरूंचा जाहीरपणे दुस्वास – वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

इतिहासाची पाने जितकी चाळत जातो तितक्या नवनवीन गोष्टी रोज उलगडत राहतात.

इतिहासातील व्यक्तिमत्वे आणि त्यांचे आपापसातील मैत्री, मतभेद, दूरावे आणि शत्रुत्व हे काहीवेळेस आपल्याला माहीत नसतात.

कोण्या इतिहासकाराकडून एखादे व्यक्तिमत्व अभ्यासले गेल्यास त्याचे सगळे पैलू हळूहळू इतरांना माहिती होतात.

भौतिक शास्त्राचे गाढे अभ्यासक होऊन गेलेले चंद्रशेखर वेंकट रमण म्हणजेच सी. वी. रमण आपल्या सगळ्यांच्याच परीचयाचे आहेत.

१९३० च्या सुमारास सायन्स विभागातील नोबेल पारितोषिक विजेते असलेले रमण हे पहिले आशियाई व्यक्ती होते. ते सुद्धा वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी.

 

c-v-raman-inmarathi

 

इतके मोठे यश असूनही त्यांचा शास्त्रज्ञ म्हणून कार्यकाल अगदीच थोडका होता. फक्त १३ वर्ष शास्त्रज्ञ म्हणून काम करून ते रिटायर्ड झाले.

ते १९१७ पर्यंत इंडियन असोसिएशन फॉर कल्टीवेशन ऑफ सायन्स मध्ये रिसर्च विभागात होते. त्यानंतर ते कलकत्ता युनिव्हर्सिटी मध्ये भौतिक शास्त्राचे शिक्षक म्हणून रुजू झाले.

स्क्रोल या वेबसाईट वरील लेखक ‘कपिल सुब्रमनीयन’ ह्यांच्या माहितीनुसार,

जेव्हा रमण १९३२ मध्ये, कलकत्त्यावरून बंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये ‘डायरेक्टर’ ह्या नवीन मिळालेल्या पदावर रुजू होण्यास निघाले त्यावेळी त्यांच्यावर निनावी पत्राद्वारे काही आरोप करण्यात आले.

 

cv raman inmarathhi

 

त्या पत्रानुसार,

रमण हे कलकत्यातील कॉलेज मध्ये शिक्षक असूनही, दक्षिणेतील लोकांना इतर कोणाही व्यक्तींपेक्षा मुख्यत्वे बंगाली माणसांपेक्षा जास्ती महत्व देत असत.

महेंद्रलाल सरकार प्रोफेसरशीप साठी त्यांनी के एस कृष्णन ची केलेली नियुक्ती पण वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. ‘रमण इफेक्ट’ हा जगप्रसिद्ध प्रयोग हे ह्याच दोघांचे मिळून केलेले संशोधन होते.

भौतिकशास्त्रात खूप संधी मिळणारे शहर असे ब्रीद कलकत्ता मिळवू पाहत होते आणि प्रोफेसरशीपसाठी आपल्या नावाचा विचार व्हावा ह्यासाठी अलाहाबादचे मेघनाद साहा प्रयत्नशील होते.

पण तरीही के एस कृष्णनची त्या कामावर वर्णी लागली. कपिल सुब्रमनियन म्हणतात की,

हा वाद निवतो ना निवतो तो पर्यंत रमण पुन्हा एका नवीन वादात अडकले. इंडियन असोसिएशन फॉर कल्टीवेशन ऑफ सायन्स मधील सभासदांची संख्या रोखण्याचे रमण ह्यांचे प्रयत्न बातमी पत्रातच प्रसिद्ध झाले.

 

cv-raman-professor-inmarathi

 

बंगाली माणसांचा राग तर त्यांच्यावर होताच पण ह्या प्रसंगानंतर त्यांच्यावर खूप लोकांचा रोष ओढवला गेला. श्यामा प्रसाद मुखर्जींनी तर पुढच्या वार्षिक मीटिंग मध्ये रमण ह्यांचेच सभासदत्व आणि सेक्रेटरी चे पद काढून घेतले.

रमण ह्यांच्यावर पुस्तक लिहीणाऱ्या लेखिका उमा परमेस्वरन म्हणतात,

“ज्या क्षेत्रावर त्यांनी स्वतःचा मालकी हक्क गाजवला त्यांनी रमणना पूर्णपणे बेदखल केले.”

अशाप्रकारे पुढेही बरीच वर्षे श्यामा प्रसाद मुखर्जी आणि रमण ह्यांच्या मध्ये वादविवाद चालत राहिले. सतत एकमेकांवर कुरघोडी करत राहिल्याने त्यांचे संबंध खूपच कडू राहिले.

रमण ह्यांना मुखर्जींमुळे बऱ्याचदा अपमान सहन करावे लागले.अर्थात त्यात रमणजींचा आडमुठेपणाही आड येत असे.

 

shyama prasad mukherjee inmarathi

 

बंगलोर मधील डायरेक्टर ह्या पदाचा अपमानकारक राजीनामा देखील द्यायची त्यांच्यावर वेळ आली होती. त्यांच्या क्षेत्रातील इतर बंगाली माणसे तर सतत त्यांच्यावर खार खाऊन असत.

स्वातंत्र्यपूर्व काळातच सी वी रमण यांची प्रसिद्ध शास्त्रज्ञ म्हणून कारकीर्द घडली होती. नंतर १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान झाले.

नेहरू सरकारने रमण ह्यांना काँग्रेसच्या प्लांनिंग कमिटीचे सदस्यत्व देऊ केले.पण शिक्षक आणि शास्त्रज्ञ ह्याच्या पलीकडे जाण्याची त्यांची अजिबात इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी हे सदस्यत्व नाकारले.

तरीही भारत सरकार ने त्यांना ‘नॅशनल प्रोफेसर’ ही पदवी बहाल केली. ह्याचा फायदा रमण ना असा झाला की आयुष्यभर त्यांना पेन्शन सदृश पगार मिळणार होता.

कारण तसेही रमण १९४८ साली आय आय एस सी’ मधून निवृत्त होणारच होते.

हे ही वाचा – “मोदी सरकार विज्ञान-तंत्रज्ञान संस्थांच्या निधीत कपात करत आहे” – हा प्रचार किती खरा आहे? वाचा!

पण भारत सरकारची ही बाब रमण ना फार काही रुचली नाही. त्यांनी पंडित नेहरूंच्या ह्या कृत्याचे कौतुकही केले नाही आणि त्याबद्दल धन्यवादही दिले नाहीत.

रमण च्या प्रयोगशाळेत एकदा नेहरू आले असता त्यांना रमण यांनी एक गमतीशीर प्रयोगातून पितळ हे सोने आहे असे भासवले.

ह्यावर नेहरू खूप आश्चर्यचकित झाले आणि त्यांना तो प्रयोग आवडला. पण रमण यांनी ‘प्रत्येक चमकणारी वस्तू ही सोने नसते’ अशा शब्दात नेहरुंना सुनावले.

 

neharu-and-raman-inmarathi

 

रमण यांनी नेहरूंचा दूस्वास करण्यामागे काही कारणे होती.

नेहरूंनी ट्रोम्बे मधील आण्विक संशोधन केंद्र आणि इंडस्ट्रियल रिसर्च प्रयोगशाळांना खूप पैसा देऊ केला. ह्याच्या उलट विद्यापीठातील संशोधन केंद्रांना अगदीच चणे फुटण्याच्या किमतीचा निधी पारित केला.

ह्याचा रमण ह्यांनी कडाडून विरोध केला. त्यांचे म्हणणे असे होते की मोठमोठ्या संशोधन कार्यशाळा इतके पैसे देऊनही खूप काही अचाट किंवा अफाट करून दाखवणार नाहीयेत.

१९५० च्या दशकात कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे फोफावणाऱ्या सरकार अनुदानित प्रयोगशाळा चे वर्णन रमण ह्यांनी ‘नेहरू भटनागर इफेक्ट’ असे केले आणि आपली नापसंती दर्शविली.

शांतिस्वरूप भटनागर हे देखील रमण ह्यांच्या विरोधात असणारे मुखर्जींप्रमाणेच एक शास्त्रज्ञ होते.

रमण ह्यांना समजून चुकले होते की, विद्यापीठांना कमी निधी देणे आणि खाजगी प्रयोगशाळा उभारण्यामागे नेहरूंसोबत भटनागर ह्यांचाही हात आहे.

ह्या प्रसंगानंतर नेहरू आणि रमण हांच्यातही कायम मतभेद झाले. किंबहुना ते वाढतच गेले. सतत काहीना काही गोष्टीतून ते नेहरूंना विरोध करत राहिले.

 

neharu-cvraman-inmarathi

 

रमण ह्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेला सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाला नापसंती दिली. ते अनुदान स्वीकारणे बंद केले.

कारण अनुदान घ्याच म्हणजे वर्षाच्या शेवटी आपल्या खर्चाचे आणि इतर गोष्टींचे सगळे हिशोब सरकार ला दाखवणे क्रमप्राप्त होते. जे रमण ह्यांना मान्य नव्हते.

त्यांना कोणतीच बांधिलकी किंवा कोणाचाच वचक स्वतः वर नको होता.

कपिल सुब्रमनियन पुढे लिहितात,

सी वी रमण ह्यांचा, त्यांच्या मृत्यूपूर्वी म्हणजे १९७० च्या आसपास त्यांच्या स्वभावातील विक्षिप्तपणा अजूनही वाढला होता.

 

cv raman inmarathi 2

 

अमेरिकेने अपोलो ११ हे यान यशस्वीरीत्या चंद्रावर पाठवले होते. ह्या बाबतीत रमण ह्यांचे काय मत आहे हे विचारण्यात आले होते. त्यावर कौतुकाचा वर्षाव अपेक्षित होता.

पण लाखो पैसे खर्च करून केलेल्या अभियानाचे त्यांना काडीचेही कौतुक नव्हते.

त्यांनी ह्याला देखील आपली नेहमीचीच नापसंतीची पताका फडकवली. इतके पैसे कशाला खर्च केलेत असल्या अभियानावर? हा त्यांचा सवाल होता.

त्यांचे म्हणणे कायम असेच पडले की गरिबीतून आलेल्यानाच पैशाचे मोल कळते.. नेहरूंना उद्देशून ते म्हणाले की श्रीमंत पैशाचा फक्त अपव्ययच करू शकतात..

नोबेल विजेते आणि खूप मोठे शास्त्रज्ञ असूनही रमण ह्यांच्या वाटेला इतरांचा दुस्वास आला आणि त्यांनीही नेहरूंसकट सगळ्यांचा दुस्वास केला..!!

हे ही वाचा – विज्ञान-अभियांत्रिकी क्षेत्रात महिला कमी असण्याच्या या कारणांची तुम्ही कल्पनाही केली नसेल!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?