' नक्षल समर्थकांची देशव्यापी “चळवळ” – InMarathi

नक्षल समर्थकांची देशव्यापी “चळवळ”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – प्रसाद देशपांडे 

===

मागे देशभरात शहरी नक्षलवादाशी संबंधित मोठं धाडसत्र राबविण्यात आलं. भीमा-कोरेगाव पासून सुरु झालेलं प्रकरण हळुहळु गंभीर वळण घेत अशा एका वळणावर येऊन ठेपलं की जिथे कदाचित शेवटचं युद्ध खेळावं लागेल आणि हा घाव बसला तर पुढे कदाचित नक्षली हिंसाचार हा कधीही डोकं वर काढणार नाही.

युद्ध म्हटल्यावर डोळ्यासमोर फारफार तर महाभारताचं युद्ध येईल जे १८ दिवसात संपलं होतं. पण जर आपण ह्या दिवास्वप्नात जगत असू तर तो दुर्दैवी गैरसमजच म्हणावा लागेल.

शहरी नक्षलवाद हा विषय तसाही किचकट विषय आहे जो सहज समजत नाही. त्याला कारणही तशीच आहेत.

आपल्याकडे एक प्रचलित वाक्य आहे

“कुठला कायदा मोडला आहे का त्याने, मग ती व्यक्ती दोषी कशी??”

अर्थात मुद्दा अचुक आहे, कायदा मोडला नाही म्हणजे तो गुन्हेगार नाही हे उत्तर एखाद्या व्यक्तीची दिशाभूल करायला उत्तम आहे. गौतम नवलखा, सुधा भारद्वाज, वरावर राव, अरुण, वरनॉन गोन्साल्विस ही सगळी तर चळवळीची माणसं, इतिहास संशोधन, मानवाधिकार, गरीब शोषितांचा लढा हे त्यांचं कार्यक्षेत्र.

 

urban-maoist-inmarathi
thequint.com

 

त्यांनी कधीही भीमा कोरेगाव मध्ये पायही ठेवला नाही, एल्गार परिषदेत ते कधी उपस्थित देखील राहिले नाही मग हे सगळं स्पष्ट असतांना तुषार दामगुडेना प्रश्न विचारणारा राजदीप सरदेसाई खरा आणि लॉजिकल का वाटू शकत नाही? बुद्धिभ्रम हे त्याचं ब्रह्मास्त्रच नाही का? पुरोगामित्वाचा किंवा बुद्धिवादाचं झूल पांघरलं तर राजदीप नक्कीच तर्कसंगत वाटेल.

अडाणी आणि अल्पमती सामान्य माणसाला जो ह्या बुद्धिवाद्यांपेक्षा जास्त व्यवहार चतुर असतो त्याला काही तथ्य, तर्कसंगती दिसणं तर सोडाच पण राजदीप, सागरिका, कविता कृष्णन, तीस्ता, वरदाराजन, वागळे, अरुंधती रॉय, प्रशांत भूषण सारख्या हुच्च पुरोगामी मंडळींचा फाटणारा बुरखा आणि कोळसे पाटील, कॉ प्रकाश ह्यासारख्या जातीयवादी लोकांचा खरा विद्रुप चेहराच दिसेल.

डाव्यांची आणि पुरोगामी मंडळींची लोकशाहीची संकल्पना (?) ही मोठी मजेशीर असते.

म्हणजे सनातनचे लोक पकडले गेले की तपास संस्था ह्या सरकारच्या ताब्यात नसतात, सुरक्षा यंत्रणा, पोलिस हे निष्पक्ष असतात, पण शहरी नक्षलवादाशी संबंधित कुणी सापडलं तर मात्र लगेच आविष्कार स्वातंत्र्याची गळचेपी होते, मानवाधिकार हनन होतं.

हळुहळु त्याचं जळजळीत रूपांतर होतं आणि मग शिव्यांची लाखोली, असंबद्ध बोलणं, सतत आरडाओरडा करणं, माझा मुडदा पडेल असं म्हणणं, आजूबाजूचे लोक आपल्यालाच संपवायला टपले आहेत असं वाटु लागणं हे सगळं Psychological trauma ची लक्षणं आहेत.

 

 

Abraham Maslow नावाचा एक खूप मोठा अमेरिकन मनोविकारतज्ञ होऊन गेला, त्याचे Hierarchy of needs, psychological health च्या थिअरी आजही प्रमाण मानल्या जातात. ब्रुकलीन महाविद्यालयात प्राध्यापक असतांना त्याने The Dynamics of psychological security-insecurity नावाचा पेपर लिहिला होता.

काही दिवसांपूर्वी सहज एका रेफरन्ससाठी तो पुन्हा चाळला. त्यातले बरेचसे सिद्धांत शहरी नक्षलींशी मिळतात.

Self Actualization चं ध्येय गाठायला आधी माणसाच्या इतर प्राथमिक गरजा जसं की अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, सेक्स इत्यादी गोष्टी शमल्या की तो एकेक पायरी चढतो आणि मग शेवटची पायरी असते ती Self Actualization ची.

अर्थात आयुष्याच्या उत्तरार्धात Maslow ने स्वतः मांडलेल्या थियरीत काही बदल केले खरे, आजचं वैद्यकीय मनोविज्ञान त्याला कदाचित सप्रमाण मानत नाही पण निदान लॉजिकली एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे आणि तो म्हणजे Self Actualization चं नकळत psychological trauma मध्ये कसं परिवर्तन व्हायला काय ट्रिगर लागत असेल?

ते ट्रिगर लक्षात आले की नक्षलवादाची मनोवैज्ञानिक पार्श्वभुमी समजते, आणि ती समजली की त्याचे after shocks कळतात.

सध्या ह्या शहरी नक्षलवाद्यांच्या अटकेनंतर ज्या प्रतिक्रिया वर उल्लेखलेल्या बुद्धिवाद्यांकडून आणि काही न उल्लेख केलेल्या बुद्धिवाद्यांकडून आल्या आहेत त्या after shocks ची अगदी उपयुक्त उदाहरणे आहेत.

त्या psychological trauma चा केंद्रबिंदु हा

“The Responses are normal reactions to abnormal events”

हा मानसशात्रीय गाभा होता. समजायला किचकट आहे. पण विचार करा लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स मधुन पदवी शिक्षण घेतलेला कोबाड गांधी, किंवा त्याची उच्चशिक्षित पत्नी अनुराधा गांधी हे दाम्पत्य, DU (दिल्ली युनिव्हर्सिटी) ची प्राध्यापिका नंदिनी सुंदर भौतिक सुखांचा त्याग करून Maslow च्या Esteem श्रेणी वरून Self Actualization वर येतात तेंव्हा हा प्रश्न सामान्य लोकांना पडत नसेल की नेमकी सगळी नक्षलसमर्थक, आणि नक्षलवादाच्या मागची चालणारी डोकी ही बुद्धिवादी कशी आहेत?

 

vara-vara-rao-inmarathi
dnaindia.com

 

आदिवासींच्या हक्कांच्या लढ्याआडुन मुळात आदिवासी नसलेल्या ह्या लोकांचं आदिवासींशी काय कनेक्शन असावं? तुम्हा-आम्हा सामान्य लोकांनाच कशाला बस्तर, दंडकारण्य मधील हरीराम सारख्या काही शरण आलेल्या नक्षलवाद्यांना देखील हाच प्रश्न पडला होता.

अर्थात हा प्रश्न पडलेले नक्षलवादी कमीच दिसतील, कारण ते दिसायला शरण आलेले कितीसे पूर्व नक्षलवादी ह्या नक्षली टोळक्यानी जिवंत ठेवले आहेत?

माओवादी, नक्षलवादी, किंवा शहरी नक्षलवाद समर्थक ह्यांच्याशी जे युद्ध होतंय ते पारंपरिक शस्त्रास्त्रांनी खेळणं सोपी आहे, पण हे मनोवैज्ञानिक युद्ध आहे त्यामुळे ते बंदुकांनी खेळता येत नाही त्याला त्यांच्याच शस्त्राने खेळावं लागतं, बुद्धिवादाच्या आणि त्यांच्या बॅटल फिल्डवर ते लढणे इतकं सोपी नाही.

या अटकेचे पडसाद किती तीव्र उमटले? १२ तासांच्या आत महाराष्ट्र पोलिसांना मानवाधिकार आयोगाची नोटिस आली.

रोमिला थापर, प्रशांत भूषण सारखे लोक १५ ज्येष्ठ वकिलांचा ताफा घेऊन सर्वोच्च न्यायालयात पोहचले दिल्ली उच्च न्यायालयात, पुणे न्यायालयात अशा वेगवेगळ्या ठिकाणी ह्या अटकासत्रांविरुद्ध आक्षेप नोंदविले गेले. त्याचवेळी माध्यमांमधील ह्यांचे हस्तक जागृत झाले, इकडे कोळसे पाटील सारखे हुच्च जातीयवादी लोक सरसावले, राजदीपने तुषार दामगुडे ह्यांच्यावर दात ओठ खात हल्ला चढविला.

इकडे अल जजीरा, गल्फ न्यूज, साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट, बीबीसी, पाकिस्तानमधील डॉन ह्या सगळ्यांनी चहुबाजूनी हल्ला चढविला. अशा प्रकारच्या हल्ल्यांना आम्ही सायबर संगणकीय भाषेत DOS (Denial Of Service) म्हणतो.

ज्यात ज्या मशीन/सर्व्हरवर किंवा entity वर अटॅक होतो त्याला प्रचंड दबावापुढे गुडघे टेकण्याशिवाय पर्याय उरत नाही. ज्या लोकांशी हे युद्ध करायचं आहे त्यांची तयारी, त्यांचं सामर्थ्य हे काही अनपेक्षित नक्कीच नव्हतं. Psychological Trauma नंतर येणाऱ्या shocks चं प्रमाण वाढलं तर त्याला PTSD ( Post Traumatic Stress Disorder) आजार बळावण्याची शक्यता अधिक असते.

अर्थात पहिल्या अटकसत्रानंतर हे अपेक्षित होतं म्हणा, पण अनपेक्षित हे होतं की ह्या सगळ्यानंतर राजदीप, कोळसे पाटील, वागळे, कविता कृष्णन, अरुंधती रॉय ह्यांच्या चेहऱ्यावर एकप्रकारची अनामिक भीती नक्कीच होती, तो स्ट्रेस जाणवत होता.

ज्याप्रकारे ही समस्त मंडळी संतापाच्या नव्हे तर भीती आणि उद्वेगाच्या भरात तुषार दामगुडे, कॅप्टन स्मिता गायकवाड ह्यांच्यावर तुटून पडली होती त्याला तोड नव्हती.

ही लढाई फक्त तुषार दामगुडे, कॅप्टन स्मिता गायकवाड, अक्षय बिक्कड ह्या लोकांचीच आहे का? किंवा ह्या विषयावर लिहिणाऱ्या भाऊ तोरसेकर, स्वाती तोरसेकर, विनय जोशी, ओंकार दाभाडकर, सौरभ गणपत्ये ह्यांचीच आहे का? सामान्य लोकांनी त्यात पडु नये किंवा हा विषय समजुन घेऊच नये हा काही कायदा नाहीय.

बुद्धिवादी मंडळी बुद्धिभ्रम करणारच पण १२ वर्ष मोदींनी न केलेल्या गुन्ह्याबद्दल गरळ ओकणारी सतत टोचणारी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला बदनाम करणारी, कर्नल पुरोहितांवर साधं आरोपपत्र दाखल न होताही त्यांना गुन्हेगार ठरवून मोकळी होणारी उपटसूंभ दीडशहाणी टोळी आज माझ्यासारख्याच एका सामान्य घरातील तुषारना अटक केलेले लोक शहरी नक्षलवादी आहे ह्याला पुरावा काय हा प्रश्न विचारात असतील तर तो आम्ही ऐकून घेणार आहोत का?

 

 

तुषार ह्यांनी अगदी योग्य उत्तर राजदीपला दिलं की,

“जे काही पुरावे असतील ते कोर्टात मांडू, तुम्हाला उत्तरं द्यायला बांधील नाही, मुळात तुम्ही होताच कोण?”कोण एक राजदीप नावाचा संपादक काय म्हणतो ह्यापेक्षा न्यायालय काय म्हणतं हे जास्त महत्वाचं आहे, कारण त्यालाच न्यायदानाचा हक्क आहे.”

आपण सगळ्यांनीच शहरी नक्षलवाद हा विषय समजुन घेऊयात ना. जो हळू हळू अजुन गडद होत जाईल, अजून एखादं पुरस्कार वापसीचं नाटक रंगू शकतं.

ह्या सगळ्या वातावरणात पक्षभेद विसरून सगळ्यांनी ह्या नक्षलवाद विरुद्ध एकटवण्याची गरज आहे, सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. कारण राष्ट्रीय सुरक्षा आपल्याला कुठल्याही पक्षीय फायदा तोट्यापेक्षा वरच असावी नाही? आणि निदान राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत तरी डिफेन्सिव्ह अप्रोच न बाळगता assertive अप्रोच बाळगुयात का?

माझे पोलिस, माझे सैनिक हे काय करतात, बोलतात हे माझ्यासाठी दहशतवाद्याच्या संरक्षणासाठी मध्यरात्री सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावणाऱ्या बांडगुळांपेक्षा जास्त विश्वासार्ह आहे.

ही शहरी नक्षलवादी मंडळी आपल्या आजुबाजुलाच वावरतात, डोळे आणि कान उघडे ठेवले तर दिसतीलही. शहरी नक्षलवादावर, आणि एकूणच नक्षलवादावर प्रकाश पडण्याची अधिक आवश्यकता आहे. ४०-४५ वर्षांपूर्वी नक्षलबारी पासून सुरु झालेला हा नक्षली हैदोस शेवटची वळवळ करतोय, त्याचं डोकं ठेचायची वेळ आली आहे.

सैन्य-पोलिस हे आपले कामं करतीलच पण ह्या कार्यात आपणही आपला खारीचा वाटा उचलूयात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?