' दाऊदला पैसे पुरविणाऱ्या ‘जावेद खनानी’ याची नोटाबंदीच्या निर्णयामुळे आत्महत्या – InMarathi

दाऊदला पैसे पुरविणाऱ्या ‘जावेद खनानी’ याची नोटाबंदीच्या निर्णयामुळे आत्महत्या

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा सर्वात जास्त फटका काळा पैसा साठवणाऱ्यांना तर बसलाच, पण नकली नोटांचं स्कँडल चालविणारे माफिया देखील या निर्णयामुळे पार धुळीला मिळाले आहेत. पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणात नकली नोटा भारतीय बाजारात पसरवल्या जायच्या. या नोटांच्या माध्यमातून अवैध धंदे तसेच हिंसाचार सारख्या कृती घडवून आणल्या जायच्या, सोबतच त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था खीळखिळी करून सोडण्याचा प्रयत्न देखील केला जायचा.

महिन्याभरापूर्वी मोदींनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निणर्याने मात्र अशी काही जादू केली की सारे धंदे एका रात्रीत बंद पडले. भारताच्या वाईटासाठी छापलेल्या नकली नोटा आता मात्र याच पाकड्यांच्या उराशी आल्या आहेत. नोटाबंदीच्या निर्णयामुळे पाकड्यांच्या गोटात काहीच आलबेल नाही हे सिद्ध करणारी एक बातमी नुकतीच बाहेर आली.

कराची मध्ये फेक करन्सी किंग जावेद खनानी याची आत्महत्या

javed-khanani-marathipizza01

स्रोत

खनानी हा कराची मध्ये खनानी अॅण्ड कालिया फॉरेन एक्सचेंज कंपनी चालवायचा. पण या कंपनीच्या आड खंडणी उकळणे, लोकांचे पैसे हडपणे, नकली नोटा छापणे आणि त्या वितरीत करणे तसेच फॉरेन करन्सीमध्ये फेरफार करणे यांसारखे काळे धंदे चालायचे. हवाला रॅकेटमध्ये देखील त्यांचा मोठा हात होता हे सिद्ध झाले आहे.

==============
वाचकांसाठी, ह्या विषयावरील आमचे ५ खास लेख:
नोटांवरील बंदीचे आपल्याला ‘माहित नसलेले’ उत्कृष्ट राजकीय आणि सामाजिक परिणाम!
५००, १००० च्या नोटांवर बंदी: तुम्हाला वाटतंय ते १००% खरं “नाही”!
नोटाबंदीच्या निर्णयानंतर काश्मीरमधील हिंसाचार अचानक कसा थांबला? त्यामागचं कारण काय?
काळा पैसा हा स्विस बँकांमध्येच का ठेवला जातो?
हवे तेवढे पैसे छापून, देश श्रीमंत का होऊ शकत नाही? वाचा!
=
=============

असा हा खनानी दाउद इब्राहीम, लष्कर-ए-तयब्बा आणि हक्कानी ग्रुप सारख्या दहशतवादी प्रवृत्तींना पैसे पुरवायचा. त्याने आपल्या कंपनीमार्फत गेल्या १० वर्षांमध्ये भारतात जवळपास २ लाख करोड रुपयांच्या नकली नोटा पसरवल्या आहेत. ज्यापैकी ४०,००० करोड रुपये हे ५०० आणि १००० च्या नोटांमध्ये आहेत. नोटाबंदीच्या निर्णयामुळे खनानीच्या या नकली पैश्यांना आता काहीच किंमत उरलेली नाही. त्याच तणावाखाली त्याने आत्महत्या केली असल्याचे अंडरवर्ल्ड मध्ये बोलले जात आहे.

javed-khanani-marathipizza02

स्रोत

मोदींनी आपल्या भात्यातून सोडलेला नोटाबंदीच्या निर्णयाचा बाण थेट पाकिस्तानात जाऊन पोचला आहे आणि येत्या काही दिवसांत अजून काही मोठे मासे या बाणामुळे टिपले जातील अशी आशा करण्यास हरकत नाही!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?