' पैसा कमवायला फार काही नको, तुमच्यामध्ये हवे हे फक्त १२ गुण!

पैसा कमवायला फार काही नको, तुमच्यामध्ये हवे हे फक्त १२ गुण!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भर रस्त्यावर लाल सिग्नल लागल्यावर बरेचदा आपल्याला एक दृश्य दिसतं. पायी चालणारा सायकल वरून चालणाऱ्या कडे बघतो आणि विचार करत असतो ह्याने मी माझा वेळ वाचवू शकलो असतो. सायकल वरून जाणारा स्कुटर वरून जाणाऱ्याकडे पाहतो. त्याला असे वाटते थोडे पैसे अजून असते तर मीही असा ऐटीत कामावर गेलो असतो.

स्कुटर वाल्याला वाटते १२५ CC ची चकाचक रेसर बाईक असती तर मैत्रीणीला मजेत फिरवता आले असते.

 

bike car inmarathi

 

रेसर बाईक वाल्याच्या बाजूला एक हॅच बॅक कार असते, ती बघून त्याला वाटते ह्या बाईकमुळे जी पाठदुखी चालू झालीये ती निदान कारमध्ये बसून कमी झाली असती.

एक कार तरी घ्यायला हवी. त्या हॅच बॅक कारच्या मालकाच्या नजरेत लॅविष XUV भरलीये आणि ह्या XUV वाल्याला स्वतःचे प्रायव्हेट जेटच हवंय..

प्रत्येकाला आपल्या आता असलेल्या परिस्थितीतून निघून एक पाऊल पुढे टाकायचे आहे.

जेवढे तुमचे शिक्षण असते त्याप्रमाणे तुमचे स्टेटस बनते. पण पैसे कमवायला शिक्षणंच हवे असेही नाही. जगातील किती मोठे मोठे उद्योगपती स्कुल ड्रॉपआऊट्स आहेत.

सुरुवात तर होऊन जाऊद्या, पैसा हातात आला की, पुढची स्वप्न पहा. हळू हळू ती सत्यातही उतरवा. थोडक्यात काय तर श्रीमंत होणे सगळ्यांचेच स्वप्न असते.

तसे श्रीमंत होणे फार काही अवघड नाही. तुमच्याकडे काही गुण असतील तर पैसा आपोआप तुमच्या घरची वाट धरतो.

जास्ती नाही, खालच्या १३ क्वॉलिटीज तुमच्या आहेत का ते पडताळुन पहा बरं..!!

हवं तर एक कागद आणि पेन घ्या आणि स्वतःमध्ये खाली दिलेल्या गुणांमधील असलेल्या गुणांना १ ते ५ पैकी नंबर द्या. म्हणजे आपल्याला अजून कुठे पोहचावे लागणार आहे, ह्याची कल्पना येऊ शकते.

१. शिस्त (Discipline)

लहानपणापासून शिकवला जाणार सद्गुण म्हणजे शिस्त. शिस्त ही शाळेत, घरात आणि सार्वजनिक ठिकाणांवर पाळण्यात यावी ह्याची अपेक्षा असते. ज्याला स्वतःची किंवा दुसऱ्यांसाठी कोणत्याही गोष्टी शिस्तीने करायची सवय असल्यास तो कधीच मागे पडू शकणार नाही.

जसे शरीर स्वास्थ्यासाठी व्यायामशाळेत (जिममध्ये) जात असल्यास त्यात खंड पडू न देता कायम रोज जावे. सगळे व्यायाम प्रकार शिस्तीने करावेत.

आणि हे एक दोन दिवस किंवा एक दोन महिन्यांच्या काम नसून कायमची शरीराला लागणारी शिस्त आहे हे समजून आनंदाने करावे.

 

Discipline-inmarathi

अंगात शिस्त नसलेली माणसे आयुष्यात फार काही मोठे काम करू शकत नाहीत. फार तर क्विक मनी मिळवून थोडे फार पैसे जमवू शकतील. पण दूरगामी दृष्टी नसल्याने पुढे काय? हा प्रश्न त्यांच्या समोर कायम उपस्थित राहतो.

त्यामुळे स्वतःला शिस्त लावून घेणे ह्याला पर्याय नाही.

पैसे कमवायला शिस्त लावून घ्यायची म्हणजे नक्की काय?

तर आधी तुम्हाला काय करायचे आहे ते नक्की करा, त्यानंतर त्यातील कोणत्या गोष्टी पहिल्या करायच्या आहेत आणि नंतर कोणत्या गोष्टी त्याची उजळणी करा.

एखादा व्यवसाय सुरू केला असल्यास प्रत्येक गोष्टीवर सतत नजर असू द्या.

कोणतेही काम करताना गाफील कधीच राहू नका. नोकरी किंवा व्यवसायात एखादी गोष्ट अनावधानाने चुकलेच तर स्वतः जबाबदारी घ्या.

हे जरी सोप्पे वाटत असले तरी दिसते तितके सोप्पे नाही. तुमच्या आयुष्याला शिस्तच नसेल तर हे एक महा कठीण काम आहे. जर तुम्हाला स्वतःला शिस्त लावून घ्यायची असेल तर आधी सोप्प्या गोष्टी अंगवळणी पडून घ्या जसे

===

हे ही वाचा करिअरमधील अपयश टाळण्यासाठी, “ह्या १०” प्रश्नांवर विचार करायलाच हवा!

===

 • रात्री कधीही झोपा पण सकाळी ५ किंवा ६ च्या ठोक्यालाच उठायचं.
 • आपलं अंथरूण आपणच नीट करायचं.

नेमाने अजून एक दोन गोष्टी करायला सुरुवात करा आणि त्या किमान महिनाभर तरी नेटाने खंड न पडता झाल्या पाहिजेत. तर नक्कीच तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायातील मोठमोठ्या जबाबदाऱ्या ‘शिस्तीने’ पार पाडता येतील.

मंत्र पहिला – शिस्त तिथे लक्ष्मी..!!

२. भावनांची कदर आणि नियंत्रण (Emotional Quotient – EQ)

आपण ज्यांच्या सोबत काम करत आहोत त्यांच्या भावनांची जाणीव ठेवणे ही खूप मोठी गोष्ट आहे. आपल्या हाताखालील माणसांना आपण कसे वागवतो ह्यावर आपली यशस्विता अवलंबून आहे.

मोठी पुस्तके वाचून वर्गात पहिला येऊन कोणीही बुद्धीने हुशार होऊ शकतो, ज्याचा IQ खूप चांगला आहे असे आपण म्हणतो.

पण ह्याचा EQ चांगला असतो, म्हणजेच ज्याला दुसऱ्यांच्या वागण्यामागचे कारण समजून घेता येते तो व्यवहारात वरचढ ठरतो.

 

Emotional-intelligence-inmarathi

ह्याच्या सोबत स्वतःच्या भावना पण जपणे आणि नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. आपण रागाच्या, लोभाच्या किंवा दुःखाच्या भरात आपण स्वतःवरच नियंत्रण तर गमावत नाही ना हे बघणे योग्य ठरते. नाहीतर आपल्याकडून असंख्य चुका होऊ शकतात.

त्याच टाळण्यासाठी स्वतःवर लक्ष द्या आणि इतरांच्याही भावना समजून घ्या.

मंत्र दुसरा – जिथे भावनांची कदर तिथे लक्ष्मी..!!

३. स्वयंप्रेरीत असणे (Self Motivated)

सगळ्या गोष्टी तैनात असल्या आणि स्वतःची कसलीच इच्छा नसेल तर माणूस काहीही करू शकत नाही. पण स्वयंप्रेरणेने माणूस डोंगर सुद्धा हलवू शकतो.

 

Self Motivated-inmarathi

व्यवहारात आलेल्या थोडक्याश्या अपयशाने खचून जाणे आणि हातावर हात धरून बसने हे पैसा गमावण्याचे लक्षण आहे. स्वतःला सतत प्रेरित करत राहिले पाहिजे.

सुख दुःखात कुटुंब आणि जवळचे मित्र साथ देतीलच पण दुसऱ्यापेक्षा स्वतः वर जास्ती विश्वास हवा.

मी काय काय स्वप्न बघितली होती आणि ती पूर्ण करण्यासाठीच मी प्रयत्नशील राहिलं हे स्वतःला सतत बजावले पाहिजे.

स्वयंप्रेरणेने ध्येयाच्या दिशेने एकेक पाऊल पुढे पडत राहीले पाहिजे. ‘थांबला तो संपला’ हे आपणास ठाऊक आहेच..!

मंत्र तिसरा – जिथे स्वयंप्रेरणा तिथे लक्ष्मी..!!

४. अर्जुनासारखी एकाग्रता (Maintaining Focus)

आपले लक्ष सतत आपल्या ध्येयाकडे असणे जरुरीचे आहे. लक्ष्य पूर्ती करताना असंख्य अडचणी येतात. काही आमिष ही वाटेत लागतात. पण आपण आपले फोकस कायम ठेवले पाहिजे.

 

keep-it-in-focus-inmarathi

नसत्या गोष्टीत वेळ वाया घालवणे म्हणजे तिळातिळानी आपली येणारी लक्ष्मी गमावणे. ज्याच्यासाठी कामाला सुरुवात केलीये त्यासाठी आपण आपला योग्य तितका वेळ दिला पाहिजे.

जितका वेळ आपण एखाद्या गोष्टीला देतो त्यातून तितकेच फायदे आपणास मिळतात हे लक्षात ठेवावे.

मंत्र चौथा – जिथे पक्के लक्ष तिथे लक्ष्मी..!!

५. वाचन, सतत शिकत राहा (Reading, Continuous Learning)

पुस्तके ही आपली खरी संपत्ती आहे. जगातील यशस्वी माणसांच्या यशाचे गमक वर्षातून ४०-५० पुस्तके वाचण्यामागे आहे. आपण कारण नसताना व्हीडिओ गेम्स आणि सोशल मीडियावर जितका वेळ खर्च करतो तितका वेळ वाचनास द्यावा.

जे मिळेल ते पुस्तक वाचावे. व्यवसायास उपयुक्त पुस्तके संग्रही ठेवावीत.

 

Reading-inmarathi

एक पुस्तक बऱ्याचदा वाचले गेले तरी त्यातील गूढार्थ नव्याने कळतात. वाचनाने आपली बुद्धी प्रगल्भ होते. त्यामुळे पुस्तक वाचनाचा छंद निर्माण करावा आणि आयुष्यभर जोपासावा.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणूनच गेलेत, ‘वाचाल तर वाचाल’..!

पदवी मिळाली म्हणजे शिक्षण संपले असे नसते. आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रातील घडामोडींकडे लक्ष ठेवावे. नवनवीन तंत्रे विकसित करून घ्यावीत, त्याच्या बद्दल नवीन माहिती मिळवावी.

 

Continuous Learning-inmarathi

===

हे ही वाचा यशाचं सिक्रेट म्हणजे फक्त या “५ गोष्टी”, मात्र तुम्ही दाखवायला हवे सातत्य!

===

आपण आणि आपल्या कर्मचाऱ्यांना सतत अपडेटेड ठेवावे. नवीन प्रयोग आपणही करून बघावे. न जाणो कोणता प्रयोग पैशाचे दालन उघडून देईल..!

मंत्र पाचवा – जिथे पुस्तकांचे वाचन आणि मनन तिथे लक्ष्मी..!!

६ . मेहनतीमधील सातत्य (Play a long Term Game)

यशस्वी होण्याला जिवतोड मेहनत घ्यावी लागते. प्रयत्नात प्रामाणिकपणे सातत्य ठेवावे लागते. आणि हे सगळे काहीश्या काळासाठी नव्हे तर आपल्या लक्ष्यापर्यंत पोहचेतोवर करावे लागते.

किंबहुना त्याही नंतर सतत मेहनत करणे अपेक्षित आहे…!

 

saina-nehwal-inmarathi

‘Success has no elevators, you have to take staircase..’ ह्या इंग्रजी म्हणी प्रमाणे पुढील १०-१२ वर्षांच्या काळासाठी आपली उद्दिष्ट्ये आखून ठेवावीत.

मंत्र सहावा  – जिथे प्रामाणिक मेहनत तिथे लक्ष्मी..!!

७. आपलं कौशल्य विकण्याची कला (Learn to sell)

विक्रेत्याला आपल्या गोष्टी विकता येणे हे अत्यंत गरजेचे आहे. जर आपल्याला खूप पैसा कमवायचा असेल तर विक्रीची कला अवगत असणे हा एक मोठा फायदा आहे.

(आणि हो, एक अॅप असं पण जे फक्त शेअर करण्याचे आणि इन्स्टॉल करण्याचे पण पैसे देतं! इथे क्लिक करून जाणून घ्या!)

 

Learn to sell-inmarathi

लोकांना वस्तूच्या किमतीपेक्षा तिचा उपयोग मोठा वाटला तर ते पैसे खर्च करायला मागे पुढे पाहत नाहीत. आणि त्यांचे मन वळवणे हे तुमच्या हातात असते. विका आणि कमवा..

मंत्र सातवा  – जिथे विक्री तिथे लक्ष्मी..!!

८. योग्य ती कामं, बाहेरून करवून घ्या (Outsourcing)

आपल्याला पैसे कमवताना वेळही कमावता आली पाहिजे. म्हणजे त्या गोष्टीची आपल्याला कामात गरज आहे. पण आपल्याकडे त्यासाठी पैसे, कामगार, आणि यंत्र सामग्री नसल्यास ते काम एखाद्या एक्स्पर्ट कंपनी कडून करून घ्यावे.

 

Outsourcing-inmarathi
outsourceworkers.com.au

ह्यात आपला वेळ वाचतो आणि आपण आपल्या मुख्य कामांकडे लक्ष देऊ शकतो.

मंत्र आठवा  – जिथे वाचतो वेळ तिथे लक्ष्मी..!!

९ . विपणन कला (Marketing)

ज्या प्रमाणे उत्पादनांची विक्री जरुरी आहे त्याच प्रमाणे त्या वास्तूंचे योग्य मार्केटिंग गरजेचे आहे. आपण स्वतः जर काही वस्तू विकणार नसू तर त्या योग्य त्या विक्रेत्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत.

 

Marketing-inmarathi

त्याची जाहिरात योग्यप्रमाणे करता येणे गरजेचे असते. आपल्या वस्तूंना कुठे जास्ती डिमांड मिळेल ह्याची माहिती घेणे उत्तम. आणि नसल्यास थोडा मार्केटचा अभ्यासही करावा. आपली स्ट्रॅॅटर्जी बनवावी.

योग्य मार्केटिंग करू शकल्यास पैशांचा वाढत ओघ राहील.

मंत्र नववा – जिथे विपणन कला तिथे लक्ष्मी..!!

१० . नवीन बदलांना सामोरे जा: (Learn to adapt changes)

सध्याचे युग हे बदलते आहे. शाळा कॉलेजात वर्ष दोन वर्षात अभ्यासक्रम बदलावे लागत आहेत. कारण असे की, जग खूपच वेगाने प्रगती करत आहे.

आपणही जर १० वर्ष जुन्या यंत्र आणि तंत्राना धरून बसलो तर तिथेच राहू.

 

Learn to adapt changes-inmarathi

आपल्याला पैसे कमावण्याच्या दृष्टीने घडणाऱ्या बदलांकडे डोळस दृष्टीने बघता आले पाहिजे. ते आत्मसात करता आले पाहिजेत.

मंत्र दहावा  – जिथे बदल तिथे लक्ष्मी..!!

११. पैशाचे योग्य नियोजन (Money Management)

पगार आल्या आल्या जर कोणी तो लगेच उडवून टाकून पुढचा महिनाभर रडत बसत असेल तर अशा व्यक्तीकडे कधीच पैसे राहणार नाही.

आपल्याला आपले खूप पैसा कमवायचे लक्ष्य साधायचे असल्यास सुरुवातीला पैशांची उधळपट्टी थांबवणे गरजेचे आहे.

 

Money Management-inmarathi

योग्य ठिकाणी जरूर पैसे खर्चावेत पण नको त्या वस्तू विकत घेऊन उगीच लोकांपुढे प्रदर्शन न मांडणेच योग्य. आपला पैसा कुठे जातो हे जाणून घ्यायचे असल्यास वहीमध्ये हिशोब लिहून ठेवण्याची सवय लावावी.

मंत्र अकरावा – जिथे लक्ष्मीला आदर तिथे लक्ष्मी..!!

१२. योग्य संगत (Join the club of people with quality)

आपण ज्या संगतीत राहतो त्या प्रमाणे आपली जडण घडण होत असते. आपल्या क्षेत्रातील उद्यमशील लोकांमध्ये जर एके उठणे बसणे असल्यास आपल्याला खूप काही शिकायला मिळते.

 

social life-inmarathi

कोणी आपल्या मेन्टरची भूमिकाही निभावू शकतो – ज्याच्या कडून आपल्याला व्यवसायातल्या खाचाखोचा कळण्यास मदत होते.

ती व्यक्ती आधीच त्या रस्त्यावरून गेलेली असल्याने येणाऱ्या अडथळ्यांविषयी आपल्याला सजग करू शकते. जेणे करून आपला श्रीमंत होण्याचा मार्ग सुलभ होऊ शकतो.

मंत्र बारावा – जिथे उत्तम संगत तिथे लक्ष्मी..!!

===

हे ही वाचा ५ वर्षात करोडपती व्हा: या १८ स्टेप्स फॉलो करा आणि जगज्जेत्यांच्या रांगेत बसा

===

ह्या सगळ्या क्वॉलिटीज तुमच्याकडे असतील तर त्याचा पुरेपूर उपयोग करा. आहे त्या परिस्थितीला शरण जाऊ नका. निराश होऊन खचूनही जाऊ नका. तुम्ही नक्कीच एकेक करून श्रीमंतीच्या पायऱ्या चढू शकाल.

वरील गुण तुमच्यात नसल्यास, ते बेधडक अंगीकारा. लक्ष्मी कोणाला नकोय..?

शेवटी ह्या युगात एक गोष्ट मात्र खरी आहे की, “पैसा हे सर्वस्व नाही, पण पैश्यांशिवाय काही चालतही नाही..!”

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

15 thoughts on “पैसा कमवायला फार काही नको, तुमच्यामध्ये हवे हे फक्त १२ गुण!

 • December 6, 2018 at 9:38 pm
  Permalink

  Very Good.Thank you for shearing.

  Reply
 • December 7, 2018 at 6:10 pm
  Permalink

  very important notes.

  Reply
 • December 10, 2018 at 9:45 pm
  Permalink

  Verynice

  Reply
 • December 14, 2018 at 8:50 pm
  Permalink

  खुप

  Reply
 • January 16, 2019 at 12:21 am
  Permalink

  How much money is necessary to be called SRIMANT ?

  *पैसा कितीही कमावला तरी कमीच पडतो*

  वर सांगितलेल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे खरे.
  पण आठवा (८ वा) मुद्दा ….

  मनाला पटत नाही त्या गोष्टी विकणार कशा ?

  नुसता पैसा मिळवुन कोणीही सुखी होऊ शकत नाही म्हणुनच पैसा कमावताना, सुखी राहणे (पैसा मिळो ना मिळो) हे ही महत्वाचे आहे असे वाटते

  Reply
 • March 23, 2019 at 9:42 pm
  Permalink

  खुपचं

  Reply
 • March 26, 2019 at 7:49 pm
  Permalink

  खूप मार्मिक माहिती मिळाली.धन्यवाद !

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?