' महागुरू सचिन, नव्या व्हिडीओमुळे ट्रोल: त्यांचं त्यावरील उत्तर वाचलंत का? – InMarathi

महागुरू सचिन, नव्या व्हिडीओमुळे ट्रोल: त्यांचं त्यावरील उत्तर वाचलंत का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

महागुरू या नावाने ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते त्यांच्यावर चित्रित झालेल्या एका व्हिडीओ गाण्यामुळे. सोशल मिडीयावर सचिन यांना ट्रोल केले जाण्याची ही पहिली वेळ नाही.

मागे एकदा माझा कट्ट्यावर झालेल्या मुलाखतीत त्यांनी दिलेली उत्तरे ऐकूनही लोकांनी त्यांना ट्रोल केले होते.

पण यावेळी प्रकार काहीसा वेगळा आहे.

काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या त्यांच्या “आमची मुंबई” नावाच्या रिव्हर अन्थेममुळे पुन्हा एकदा सचिन पिळगावकर यांना लोकांनी ट्रोल केले.

 

sachin-pilgaonkar-inmarathi
indiatoday.com

या गाण्यावर अनेकांनी आक्षेप नोंदवतांना पिळगावकर यांना धारेवर धरले आहे. मुंबईच्या जीवनावर असलेले हे गाणे स्वतः पिळगावकर यांनी गायले आहे. गाण्याचे शब्द, संगीत आणि नृत्य हे अतिशय तृतीय दर्जाचे असल्याने गाणे ट्रोल होणे साहजिकच होते.

 

shala-inmarathi
Facebook

या गाण्याची शब्दरचना ही मोहम्मद अकील अन्साली यांचे असून व्हिडिओचे दिग्दर्शन आणि नृत्य दिग्दर्शन डीसी द्रविडने केली आहे तर निर्मिती मन्नत फिल्मसने केली आहे.

मुंबईचे मुंबई स्पिरीट सेलिब्रेट करण्यासाठी हे गाणं बनवण्यात आल्याचा दावा निर्माते आणि दिग्दर्शकांनी केला असला तरी सोशल मीडियातील अनेकांनी या गाण्याचा मिश्कील पद्धतीने नेहमीच्या स्टाईलने गाण्याचा समाचार घेतला आहे.

 

sachin-inmarathi
Facebook

पण या सगळ्या प्रकारानंतर सचिन पिळगावकर यांनी स्वतः आपल्या फेसबुकवरून एक पोस्ट टाकत त्या गाण्याचे समर्थन केले आहे.. ते म्हणतात,

नमस्कार मित्रांनो!

नुकताच social media वर release झालेला माझा एक video बर्याच चर्चेचा विषय झाला. काहिंना हसू आलं काहींना मात्र रडू आलं. ज्यांना माझ्या विषायीच्या प्रेमापोटी असं रडू आलं, त्यांना मी नक्कीच उत्तर देणं लागतो.

एवढंच सांगेन की तुम्हाला जसं वाईट वाटलं, तसं मलाही वाटलं. परंतु, विश्वास ठेवा, मी हा व्हिडियो एकाही रुपयाच्या लालसेमुळे किंवा दुसर्या कुठल्याही प्रलोभना मुळे केला नव्हता.

आम्ही कलाकार मंडळी बर्याचदा फार त्रास न घेता, जाता जाता कुणा मित्राची मदत होत असेल तर करत असतो. कधी कुणाच्या दुकानाचं उद्घाटन कर, तर कधी एखाद्या ध्वनिफितिचं अनावरण कर…वगैरे…

काही वर्षांपूर्वी एका अशाच मझ्या costume designer मित्राला मदत करण्याच्या उद्देश्याने हे गाणं माझ्यावर shoot केलं गेलं.

 

song-inmarathi
youtube.com

सेट वर गेल्यावर काही क्षणातच मला होत असेलली गडबड कळाली. परंतु, स्वत: दिग्दर्शक असल्यामुळे दुसर्याच्या कामात दखल देणे हे आजवर कधीच जमले नाही.

स्वत: निर्माताही असल्यामुळे आयत्या वेळी सेट सोडून गेल्यास होणार्या नुकसाना बद्दलही माहिती होती, म्हणून तेही करवलं नाही. काही प्रसंगं मी करणार नाही असंही सांगीतलं, जे दुसर्यावर करण्यात आले.

पुढे जेव्हा जेव्हा तो मित्र भेटला आणि व्हिडियो रिलिज होऊ शकत नसल्या बद्दल नाराज दिसला, तेव्हा मनाच्या कोपर्यात होत असलेल्या आनंदामुळे खूप अपराधिपणाची भावनाही वाटली.. पण, ती आता संपलीये!! कारण, हा व्हिडियो शेवटी रिलिज झालाय.. 😀! होनी को कौन टाल सकता है?

 

आज मी कायदेशीर रित्या किंवा कायद्या आडून हा व्हिडियो नक्कीच काढून टाकायला लावू शकतो. परंतु, मी तसं करणार नाही.

कारण, माझ्या मित्राचा किंवा आताच्या निर्मात्यांचा .. कुणाचाही ‘हेतू’ काही वाईट करण्याचा नव्हता, ह्याची मला खात्री आहे. मग, केवळ आपली आवड त्यांच्यावर लादण्या इतकी लोकशाहिची गळचेपी मी कशी करु?

सरते शेवटी एवढंच सांगेन.. की चूक असती तर माफी मागून “पुन्हा करणार नाही” म्हटलं असतं.

पण, एखाद-दुसर्या अशा कटू अनुभवामुळे मित्रांसाठी चांगुलपणा दाखवायची ‘चूक’ करणे मी नक्कीच थांबवणार नाही. मग, तुम्ही आणि मी काय करु शकतो? एवढंच.. की अशा परिस्थितीत मी पुन्हा पडू नये म्हणून देवाजवळ प्रार्थना!!

तेवढी तुम्ही (माझे हीतचिंतक) नक्की कराल याची मला खात्री आहे.

आपला
सचिन पिळगांवकर

===

महागुरुनंनी एवढे स्पष्टीकरण देऊनही शांत बसतील ते मराठी प्रेक्षक कसले?

या गाण्यावर एकाहून एक भन्नाट प्रतिक्रिया लोकांनी दिल्या. एकाने लिहिले की,

सचिन साहेब पैशाची टंचाई असेल तर सांगा आम्ही निधी गोळा करतो… पण प्लीज परत असा अत्याचार करू नका…

 

song-inmarathi
youtube.com

तर एकाने लिहिलं की,

इतकं दलिंदर गाणं यापूर्वी कधीच बघितलं नव्हतं. सचिन पिळगावकरने आयुष्यभर कमावलेली सगळी इज्जत अब्रू घालवली, अरे भोजपुरी गाणी पण याच्यापेक्षा भारी असतात रे.

सचिन पिळगांवकरच्या असल्या वागण्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीला आलेला सुवर्णकाळ जाऊन परत तांब्या-पितळ्याचे दिवस येतील असे एका कमेंट कर्त्याने लिहिले आहे. पण काही असो, महागुरूंनी या आलेल्या व्हीडीओ कर कळकळीने दिलेले स्पष्टीकरण विचारात घेणे गरजेचे आहे!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?