' “रोल्स रॉयस” कारसाठी लोक इतके वेडे का आहेत ? जाणून घ्या काय खास आहे या गाडीत – InMarathi

“रोल्स रॉयस” कारसाठी लोक इतके वेडे का आहेत ? जाणून घ्या काय खास आहे या गाडीत

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

रोल्स रॉयस कार! गाडीच्या नावातच राजेशाही थाट आहे. ही गाडी घेणं हे जगातील जवळपास प्रत्येक कार प्रेमीचं स्वप्न असतं!

पण ही गाडी घेणं प्रत्येकालाच शक्य होत नाही. आयुष्यभर कष्ट करून पैसे जमवले तरी ही गाडी घेणं सामान्य माणसाला अशक्य आहे. सामान्य माणसाला फक्त स्वप्नातच ही गाडी चालवणं परवडू शकते.

अत्यंत महाग असलेली ही गाडी घेणं म्हणजे खिशाला भलीमोठी कात्री लागणं. ही जगातली सर्वात महागडी गाडी आहे.

 

Rolls Royce with Royal familly InMarathi

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

==

हे ही वाचा : कार खरेदी करायला पैसे नाहीत म्हणून त्याने जुन्या गाडीला Lamborghini च रूप दिलं!

==

तरीही लोक रोल्स रॉयससाठी इतके वेडे का आहेत? आज आपण जाणून घेऊया रोल्स रॉयसबद्दल काही खास गोष्टी.

रोल्स रॉयस ही जगातील सर्वात आरामदायक गाडी आहे. शिवाय या गाडीची कार्यक्षमता सुद्धा उत्तम आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे तुम्ही ह्या गाडीत गियर्स बदलू शकत नाही.

गाडीची यंत्रणा इतकी उत्कृष्ट आहे की, गाडी स्वतःच रडारच्या मदतीने रस्ते ओळखते. आणि जी.पी.एस.च्या मदतीने योग्य माहिती घेऊन रस्त्याच्या हिशोबाने योग्य ते गियर वापरते.

हा सगळा खटाटोप तुमच्याच सुरक्षेततेसाठी आहे.

या गाडीचे रेडीयेटर ग्रिल मशीनच्या साहाय्याने बनत नाही. तर ते चक्क हाताने बनवलेले असते. हे रेडीयेटर ग्रील बनवायला एक संपूर्ण दिवस लागतो व ते पॉलीश होण्यासाठी, जवळपास पाच तास लागतात.

दोन रोल्स रॉयसची रेडीयेटर ग्रील्स एकसारखी असत नाहीत. तरीही त्यांची कार्यक्षमता अगदीच योग्य असते. सध्याची रोल्स रॉयस म्हणजे उत्कृष्ट जर्मन इंजिनियरिंग आणि ब्रिटीश सोफिस्टीकेशन यांचे उत्तम मिश्रण आहे.

 

Rolls-Royce-Phantom-VIII-inmarathi

 

या गाडीतल्या ऍशट्रेमध्ये कधीही सिगरेटचा कचरा दिसणार नाही. कारण हा कचरा आपोआप साफ होतो.

रोल्स रॉयसची ‘फँटम २०१८’ ही स्वयंचलित गाडी आहे. ड्रायव्हिंग नीट जमत नाही किंवा पार्किंग करताना अडचण येते अशा लोकांसाठी ही गाडी अगदीच उत्तम आहे. या गाडीची लेग स्पेस, अर्थात पाय ठेवण्याची जागा अगदी ऐसपैस आहे.

अगदी साडेसहा फूट उंची असलेली व्यक्ती सुद्धा मागच्या सीटवर आरामात ऐसपैस बसू शकते. इतकी लेग स्पेस इतर गाड्यांत बघायला मिळत नाही.

ही गाडी चालवताना तुम्हाला काहीही कष्ट करावे लागत नाहीत. गाडीत बसण्यापासून ते पार्कींग करून गाडीतून उतरेपर्यंत सगळ्या गोष्टी सहज करता याव्या यादृष्टीने गाड्यांची रचना असते.

आरामदायी प्रवासाचा परिपूर्ण अनुभव म्हणजे रोल्स रॉयस! ‘राजेशाही गाडी कुठली?’ असा प्रश्न विचारला, तर बहुसंख्य लोक रोल्स रॉयस हेच उत्तर देतील.

रोल्स रॉयस ही एक हाय परफॉर्मन्स गाडी आहे. या गाडीच्या इंजिनचा अजिबात आवाज होत नाही. ही गाडी सायलेंट, एफर्टलेस आणि क्वाएट म्हणून प्रसिद्ध आहे.

स्पोर्ट्स कार खूप आवाज करत जातात. मात्र त्याहीपेक्षा उत्तम असणारी रोल्स रॉयस अजिबात आवाज करत नाही.

रोल्स रॉयस म्हणजे सर्वोत्तम दर्जा असे समीकरण आहे.

 

rolls-royce-phantom Interior InMarathi

 

गाडी बनवण्याच्या प्रोसेस प्रक्रियेपासून, ते गाडीत वापरण्यात आलेल्या लेदरपर्यंत सर्व साहित्य हे सर्वोत्तम दर्जाचे असते. लेदरसाठी बावेरियन प्रदेशातील उत्तम प्रतीच्या बैलांची कातडी वापरली जाते.

गाईच्या कातडीवर स्ट्रेच मार्क्स असतात. म्हणून फक्त बैलाचीच कातडी वापरली जाते. प्रदेशात बैलांच्या अंगावर किडे नसतात किंवा किड्यांच्या चावण्याचे व्रण नसतात. म्हणून त्याच बैलांच्या कातडीचा उपयोग करतात.

ज्या बैलांची कातडी वापरतात त्यांचे मांस खाटिकखान्यात विकतात. जेव्हा सीटसाठी लेदर वापरून उरते तेव्हा ते पर्सेस, घड्याळे, वॉलेट्स बनवण्यासाठी वापरण्यात येते. काहीही वाया जाऊ देत नाहीत.

 

rolls-royce-luggage-inmarathi

 

तसेच या गाड्यांचे वुडन फिनिशिंग सुद्धा अगदी उत्तम प्रकारचे असते. या गाडीचे वुडन वर्क करण्यासाठी माणसे शब्दश: भिंग घेऊन काम करतात.

अगदी बारीकशीही त्रुटी राहू नये म्हणून व प्रत्येक लाकडी पार्ट परफेक्ट बसावा यासाठी तपशीलवार काम केले जाते.

हे लोक खूप मेहनत घेऊन काम करतात.

या गाडीसाठी जे लाकूड वापरतात ते एकाच झाडाचे असते व नियंत्रित केलेल्या तापमानात ठेवले जाते. तसेच प्रत्येक पार्टचे फिनिशिंग व्यवस्थित केले जाते.

ह्या गाडीच्या उत्पादन प्रक्रियेत तुम्हाला कुठेही “चलता है” हा विचार दिसणार नाही. रंगकाम करताना एखादा बारीकसा केस देखील आला; तरी गाडीची संपूर्ण बॉडी बदलून पुन्हा सगळी गाडी नव्याने पेंट केली जाते.

या गाड्यांमध्ये सतत नवनव्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. गाडी वापरणाऱ्याला सर्वोत्तम अरामाचा अनुभव कसा देता येईल हाच रोल्स रॉयसचा सतत प्रयत्न असतो. ग्राहकांना सर्वोत्तम अनुभव देणे ही रोल्स रॉयसची खासियत आहे.

 

Rolls-Royce different colors Inmarathi

 

==

हे ही वाचा : गाडीच्या या स्पेशल नंबरसाठी लागलेली बोली थक्क करणारी आहे !

==

तुम्ही तुमच्या गाडीचा रंग स्वत: ठरवू शकता. तुम्हाला तुमच्या कुत्र्याच्या रंगाशी मॅचिंग किंवा तुमच्या लिपस्टिकच्या शेडशी मॅचिंग रंगाची गाडी रोल्स रॉयस देऊ शकते.

 

Rolls Royce lipstick colors INMarathi

 

ही सुविधा फक्त रोल्स रॉयसमध्ये उपलब्ध आहे. बाकी गाड्या काही सेकंदांमध्ये उत्तम वेग पकडू शकतात. मात्र, रोल्स रॉयससारखा अराम इतर गाडीत मिळणार नाही.

रोल्स रॉयसचा फोकस तुम्हाला कंफर्ट, स्टाईल ,शांतता आणि लक्झरी तसेच सर्वोत्तम दर्जा देण्यावर असतो.

गेली शंभर वर्षे ही कंपनी ग्राहकांना राजेशाही थाटाचा अनुभव देत आहे. तो अनुभव देण्यासाठी गाडीत सर्व पार्ट्स उत्तम दर्जाचेच असतात.

म्हणूनच गाड्या फार महाग असतात. परंतु या गाडीची शान काही औरच आहे. आणि ती गाडी चालवणारेच हा सुंदर अनुभव सांगू शकतील.

इतका उत्तम आणि ऐषोरामाचा अनुभव दुसऱ्या कुठल्याच गाडीत मिळत नसावा. म्हणूनच या गाड्या इतक्या महाग असूनदेखील “सस्ती चीजो का शौक” नसलेले लोक कोट्यवधी रुपये देऊन ही गाडी विकत घेतात.

 

rolls-royce-dawn-Inmarathi

 

रोल्स रॉयस! बस नाम ही काफी है! म्हणून तर लोक या गाडीसाठी इतके वेडे आहेत!

==

हे ही वाचा :    हे काका तब्बल १८ वर्षांपासून हॉर्न नं वाजवता गाडी चालवताहेत. पण का? वाचा!

==

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?