“रोल्स रॉयस” कारसाठी लोक इतके वेडे का आहेत?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

रोल्स रॉयस कार! ह्या गाडीच्या नावातच राजेशाही थाट आहे. ही गाडी घेणे म्हणजे जगातील जवळपास प्रत्येक कार प्रेमीचं स्वप्न असतं!

पण ही गाडी घेणे प्रत्येकालाच शक्य होत नाही. आयुष्यभर कष्ट करून पैसे जमवले तरी ही गाडी घेणे सामान्य माणसाला अशक्य आहे. सामान्य माणसाला फक्त स्वप्नातच ही गाडी चालवणे परवडू शकते.

अत्यंत महागडी असलेली ही गाडी घेणे म्हणजे खिशाला भलेमोठे भगदाड पाडणे आहे. ही जगातली सर्वात महागडी गाडी आहे.

 

Rolls Royce with Royal familly InMarathi

 

तरीही लोक रोल्स रॉयससाठी इतके वेडे का आहेत? आज आपण जाणून घेऊया रोल्स रॉयसबद्दल काही खास गोष्टी.

रोल्स रॉयस ही जगातील सर्वात आरामदायक गाडी आहे. तशीच ती फास्ट आहे. शिवाय ह्या गाडीची एफिशियंसी सुद्धा चांगली आहे. रोल्स रॉयसची कुलिंग कॅपॅसिटी ही ३० रेफ्रिजरेटर्स पेक्षा जास्त आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे तुम्ही ह्या गाडीत गियर्स बदलू शकत नाही.

गाडीचे मेकॅनिजम असे डेव्हलप केले आहे की, गाडी स्वतःच रडारच्या मदतीने रस्ते स्कॅन करते. आणि जी.पी.एस.च्या मदतीने डेटा घेऊन रस्त्याच्या हिशोबाने योग्य ते सस्पेन्शन आणि गियर टाकते.

हा सगळा खटाटोप तुमच्याच सुरक्षेततेसाठी आहे.

ह्या गाडीचे रेडीयेटर ग्रील मशीनने नाही तर, हाताने बनवलेले असते. हे रेडीयेटर ग्रील बनवायला एक संपूर्ण दिवस लागतो व ते पॉलीश करायला पाच तास लागतात. हे बनवताना मोजमाप करण्याची यंत्रे वापरली जात नाहीत.

म्हणजेच दोन रोल्स रॉयसची रेडीयेटर ग्रील्स एकसारखी असत नाहीत. तरीही ह्याचे डिटेलिंग अगदी परफेक्ट असते. आताची रोल्स रॉयस म्हणजे उत्कृष्ट जर्मन इंजिनियरिंग व ब्रिटीश सोफिस्टीकेशन ह्याचे उत्तम मिश्रण आहे.

 

Rolls-Royce-Phantom-VIII-inmarathi

 

तुम्हाला ह्या गाडीतल्या ऍशट्रेमध्ये कधीही सिगरेटचा कचरा दिसणार नाही. कारण हा कचरा आपोआप रिकामा होतो.

रोल्स रॉयसची नवी फँटम २०१८ ही सेल्फ ड्रिव्हन गाडी आहे. ज्यांना ड्रायव्हिंग नीट जमत नाही किंवा पार्किंग करताना अडचण येते त्यांच्यासाठी ही गाडी अगदी परफेक्ट आहे. तसेच ह्या गाडीला लेग स्पेस अगदी ऐसपैस आहे.

अगदी साडेसहा फूट उंची असलेली व्यक्ती सुद्धा मागच्या सीटवर आरामात ऐसपैस बसू शकते. इतकी लेग स्पेस इतर गाड्यांत बघायला मिळत नाही.

ही गाडी चालवताना तुम्हाला काहीही कष्ट करावे लागत नाहीत. गाडीत बसण्यापासून ते पार्कींग करून गाडीतून उतरण्यापर्यंत सगळ्या गोष्टी सहज करता याव्या ह्यादृष्टीने ह्या गाड्यांचे डिझाईनिंग करण्यात आले आहे.

 

ही गाडी म्हणजे लक्झरीचा परिपूर्ण अनुभव आहे. राजेशाही गाडी कुठली असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर बहुसंख्य लोक रोल्स रॉयस हेच उत्तर देतील.

रोल्स रॉयस ही एक हाय परफॉर्मन्स गाडी आहे परंतु ह्या गाडीचा अजिबात आवाज होत नाही. ही गाडी सायलेंट, एफर्टलेस आणि क्वाएट म्हणून प्रसिद्ध आहे.

इतर स्पोर्ट्स कार आवाज करत जातात मात्र त्याहीपेक्षा चांगला परफॉर्मन्स देऊन सुद्धा रोल्स रॉयस अजिबात आवाज करत नाही.

रोल्स रॉयस म्हणजे सर्वोत्तम क्वालिटी असे समीकरण आहे.

 

rolls-royce-phantom Interior InMarathi

गाडी बनवण्याच्या प्रोसेस पासून तर गाडीत वापरलेल्या लेदरपर्यंत सर्व साहित्य हे सर्वोत्तम क्वालिटीचे वापरले असते. लेदरसाठी बावेरियन प्रदेशातील उत्तम प्रतीच्या बैलांची कातडी वापरली जाते.

गाईंच्या कातडीवर स्ट्रेच मार्क्स असतात म्हणून फक्त बैलाचीच कातडी वापरली जाते. ह्या प्रदेशात बैलांच्या अंगावर किडे नसतात किंवा किड्यांच्या चावण्याचे व्रण नसतात म्हणून ह्याच बैलांच्या कातडीचा उपयोग करतात.

ज्या बैलांची कातडी वापरतात त्यांचे मांस खाटिकखान्यात विकतात. हे लोक काहीही वाया जाऊ देत नाहीत. जेव्हा सीटसाठी लेदर वापरून उरते तेव्हा ते पर्सेस, घड्याळे, वॉलेट्स बनवण्यासाठी वापरण्यात येते.

 

rolls-royce-luggage-inmarathi
zazuminc.com

तसेच ह्या गाड्यांचे वुडन फिनिशिंग सुद्धा अगदी उत्तम प्रकारचे असते. ह्या गाडीचे वुडन वर्क करण्यासाठी माणसे शब्दश: भिंग घेऊन काम करतात.

अगदी बारीकशीही त्रुटी राहू नये म्हणून व प्रत्येक लाकडी पार्ट परफेक्ट बसावा म्हणून डिटेलिंगवर हे लोक खूप मेहनत घेऊन काम करतात.

हे सगळे काम फॅक्टरीमध्ये केले जाते. कुठलेच काम आउटसोर्स केले जात नाही. ह्या गाडीसाठी जे लाकूड वापरतात ते एकाच झाडाचे असते व नियंत्रित केलेल्या तापमानात ठेवले जाते.तसेच प्रत्येक पार्टचे फिनिशिंग व्यवस्थित केले जाते.

ह्या गाडीच्या मॅनुफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये तुम्हाला कुठेही “चलता है” हा ऍटिट्यूड दिसणार नाही. पेंटिंग करताना जर गाडीवर एखादा बारीकसा केस देखील आला असेल तर ते लोक गाडीची संपूर्ण बॉडी बदलून परत सगळी गाडी नव्याने पेंट करतात.

परफेक्शनची इतका हट्ट ते धरतात.

ह्यांच्या गाड्यांमध्ये सतत नवनव्या आधुनिक टेक्नॉलॉजी येत असतात. गाडी चालवणाऱ्याला अल्टीमेट लक्झरीचा अनुभव कसा देता येईल हाच रोल्स रॉयसचा सतत प्रयत्न असतो.ग्राहकांना पर्सनलाईझ्ड अनुभव देणे ही रोल्स रॉयसची खासियत आहे.

 

Rolls-Royce different colors Inmarathi

तुम्ही तुमच्या गाडीचा रंग आणि कलर कॉम्बीनेशन स्वत: ठरवू शकता. तुम्हाला तुमच्या कुत्र्याच्या रंगाशी मॅचिंग किंवा तुमच्या लिपस्टिकच्या शेडशी मॅचिंग रंगाची गाडी रोल्स रॉयस देऊ शकतात.

 

Rolls Royce lipstick colors INMarathi

ही सुविधा फक्त रोल्स रॉयस देतात. बाकी कंपन्या तुम्हाला सुव्यवस्थित, कार्बन फायबर बिल्ट, एरोडायनॅमिकली एन्हान्स्ड सुपरकार्स देतात. ह्या गाड्या शून्य सेकंदात शून्य ते ६० mph जाऊ शकतात.

रोल्स रॉयसचा फोकस मात्र तुम्हाला कंफर्ट, स्टाईल ,शांतता आणि लक्झरी तसेच सर्वोत्तम क्वालिटी देण्यावर असतो.

गेली शंभर वर्षे ही कंपनी ग्राहकांना राजेशाही थाटाचा अनुभव देत आहे. तो अनुभव देण्यासाठी गाडीत सर्व पार्टस उत्तम क्वालिटीचेच असतात व डिटेलिंगवर प्रचंड मेहनत घेतली जाते. अर्थातच ह्या सुविधा देण्यासाठी त्यांना खर्च येणारच!

म्हणूनच ह्या गाड्या इतक्या महाग असतात. परंतु ह्या गाडीची मजा काही औरच आहे. आणि ती गाडी चालवणारेच हा सुंदर अनुभव सांगू शकतील.

इतका अल्टीमेट लक्झरी एक्स्पेरीयंस दुसऱ्या कुठल्याच गाडीत मिळत नसावा. म्हणूनच ह्या गाड्या इतक्या महाग असून देखील “सस्ती चीजो का शौक” नसलेले लोक कोट्यावधी रुपये देऊन ह्या गाड्या विकत घेतात.

 

rolls-royce-dawn-Inmarathi

 

रोल्स रॉयस! बस नाम ही काफी है! म्हणून तर लोक ह्या गाडीसाठी इतके वेडे आहेत!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on ““रोल्स रॉयस” कारसाठी लोक इतके वेडे का आहेत?

  • January 20, 2019 at 9:52 pm
    Permalink

    nice information in marathi धन्यवाद inमrathi.कॉम

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?