कीड लागून धान्य खराब होतंय, एकदा ह्या युक्त्या करून बघाच!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

धान्य म्हणजे आपली लक्ष्मी. शेतकऱ्याला कापणीनंतर सगळे धान्य बाजारात विकेपर्यंत किंवा त्याला चांगली मागणी येईपर्यंत ते व्यवस्थित साठवून ठेवावे लागते. गृहिणींना देखील धान्याची वर्गवारी करून ते काही महिने किंवा वर्षभरही पुरेल आशा रीतीने सांभाळून साठवावे लागते.

आता महिनोंमहिने साठवणूक केली म्हणजे अळ्या, किडे, उंदीर आणि असंख्य जीवांची चांदी होते.

सहकुटुंब धान्य फस्त करायला हे किडे सरसावतात. कीड लागलेला शेतकऱ्याचा माल खपूच शकत नाही.

 

waste grain inmarathi

 

आणि घरातील धान्यालाही कीड लागल्यास ते फेकून च द्यावे लागते.

ह्या धान्याच्या साठवणुकीसाठी पणजी, आज्जी, आई ह्यांच्या लहानपणापासून चे घरगुती नुस्खे आजमावले जातात. आपणही कीड लागू नये म्हणून खाशी काळजी घेतो.

घरातील धान्य साठवताना आपण साठवणुकीची डबे कोरडे करून घेतो. त्याला पाण्याचा थेंबही स्पर्शू देत नाही. त्यात धान्य भरताना वाळलेली कडुनिंबाची पाने टाकणे, बोरिक पावडर लावणे असे प्रयोग देखील करतो.

पण पावसाळ्यात दमट हवामानात काही सांगता येत नाही. मुंबई सारख्या शहरात तर धान्यानीच फ्रीज भरून जातो. तेही महिनाभर पुरेल इतकेच कसे बसे साठवता येते.

 

farming-inmarathi
agrowon.com

 

काही किलोच्या ह्या धान्यासाठी आपल्याला एवढी काळजी घ्यावी लागते. शेतमाल तर कित्येक टन चा असतो. तो साठवायला शेतकऱ्याला खूपच काळजी घ्यावी लागत असेल.

शेतमालाला/धान्याला किडे, उंदीर आणि पक्षीच काय तर धान्य चोरांपासूनही भीती असते. न जाणो कधी कोणी पोतीच्या पोती उचलून गायब करेल.

त्यासाठी शेतकऱ्यांना जास्तीची खबरदारी घ्यावीच लागते. पावसाळ्यातही खूप काळजीपूर्वक धान्य जपावे लागते.

धान्याला कीड लागू नये, ते कोरडे राहावे आणि खाण्यास योग्य राहावे ह्यासाठी बऱ्याच क्लृप्त्या आपण वापरू शकतो.

बघूया तर काही पारंपरिक पद्धती ज्यातून शेतमाल किंवा कापणी नंतर चे धान्य कसे साठवून ठेवले जाते.

कमी कालावधीची साठवणूक :

१. धान्य कणसासहित वाळवणे :

शेतातील धान्याची कणसे कापून त्याच्या मोळ्या बांधून सूर्य प्रकाशात वाळवणे. नंतर बाजारात विके पर्यंत ह्या मोळ्या अशाच कोणत्याही प्रक्रियेशिवाय घरात वरती खुंटीला किंवा दोऱ्यांवर अडकवून ठेवणे.

 

sundrying-inmarathi
knowledgebank.irri.org

 

पण अशा पद्धती अगदीच थोडक्या वेळासाठी करणे योग्य आहे. करण घराबाहेर जास्त काळ धान्य राहिल्यास पक्षी ते खाऊन जातील किंवा ते चोरीला ही जाण्याची शक्यता असते.

पावसाळ्यात ते घरात जास्ती वेळ ठेवणेही किडे अळ्यांना आमंत्रण देण्यासारखेच आहे.

 

२. धान्य पोत्यांवर पसरवून साठवणे :

शेतातील कंपनी नंतर कणासापासून वेगळे केलेले धान्य पोत्यांवर किंवा ताडपत्रीवर ढीग लावून साठवले जातात. उन्हाळ्यात त्याला सूर्यप्रकाशामुळे उन्हं देखील मिळतात.

 

Wheat-inmarathi
momsghar.com

 

पण हे धान्य अगदीच २-३ दिवसांच्या साठवणुकीसाठी असे ठेवणे ठीक आहे. नाहीतर गायी म्हशी देखील ते खाऊन फस्त करतील. हे असे साठवलेले धान्य त्वरित बाजारात नेऊन विकणे उत्तम.

 

३. लाकडी/सिमेंटचे चौथरे बांधून वळवणूक :

जरा जास्ती दिवस धान्याची वळवणूक आणि साठवणूक करायची असल्यास लाकडाचे किंवा सिमेंटचे कायम स्वरूपी चौथरे बांधले जातात.
हे चौथरे जमिनीपासून जरा १-२ फुटाच्या उंचीवर बांधतात..

मोठमोठ्या साठवणुकीच्या खोल्या उपलब्ध असतील तर दमट हवामानात ह्या उपयोगाला येतात.

कधी कधी ह्या खोल्याना नुसतेच छप्पर असून भिंती बांधल्या जात नाहीत.

 

Rice-Paddy-Production-inmarathi
agrifarming.in

 

ह्या चौथऱ्यांवर पोत्यात घालून धान्य साठवले जाते.. पोत्यांचे ढिगारे रचले जातात. तेथील चौथऱ्या खाली निखारे पेटवून धान्यातील ओलसरपणा दूर करता येतो.

भारतासहीत बाहेरील अनेक देशात अशा प्रकारे धान्याची साठवणूक केलेली दिसून येते. ह्या साठवणुकीतल्या चौथऱ्यांची लांबी रुंदी भरपूर असते. जेणे करून जास्तीत जास्त धान्य साठवले जाऊ शकेल.

 

मोठ्या कालावधीची साठवणूक :

१. नैसर्गिक साधनांनी बनवलेल्या कणग्या : 

बऱ्याच देशात आणि भारतात जेव्हा धान्याची साठवणूक मोठया कालावधी साठी करावी लागते तेव्हा ते धान्य हवेतल्या ओळसरपणामुळे कुजनार नाही ह्याची खास काळजी घ्यावी लागते.

हे धान्य कोरड्या परिसरात आणि हवा लागेल आशा पद्धतीने साठवले जाते. त्यासाठी लाकडे, बांबू, काट्याकुट्या ह्यांच्या साहाय्याने मोठाल्या कणग्या बनवल्या जातात.

वातावरणामुळे लाकडे काट्याकुट्या लवकर सडू शकतात म्हणून ३ एक वर्षात ह्या कणग्या काढून नवीन बनवाव्या लागतात.

पण बांबूच्या कणग्या १२ ते १५ वर्ष चांगल्या साथ देतात.

 

food-storage-methods-inmaratthi
iskconvarnasrama.com

 

ह्या लाकडी कणग्या पण चौथऱ्यांसारख्याच ठेवल्या जातात. त्यांना जमिनीपासून थोडे वर उचलले जाते. जेणे करून धान्यातील ओलावा कमी करण्यासाठी, ह्यांच्या खाली देखील विस्तव/निखारे ठेवता येऊ शकतील. वरती छप्पर देखील असते पण ते पूर्ण बंद नसते.

कणगीच्या आत शेतकऱ्याला उतरता येईल अशा प्रकारे ते छप्पर जर उंचीवर लावलेले असते.

 

२. छोट्या मातीच्या कणग्या :

कमी धान्याच्या साठवणुकी साठी लहान लहान मातीच्या कणग्या बनवल्या जातात. त्याच्या आतील बाजू शेणाने सारवलेली असू शकते.

ह्याची तोंड निमुळते असते आणि झाकण म्हणून वाईन बॉटल चा कॉर्क ज्या लाकडाचा असतो त्या प्रकारचे लाकूड किंवा शेणाची गोलाकार झाकणे वापरतात.

वरून कापड दाबून ते झाकण घट्ट बसवण्यात येते.

 

food-storage-methods-inmaratthi01
magictoursblog.blogspot.com

 

 

तीळ, डाळी, कडधान्य किंवा तत्सम छोटी धान्ये ज्यांच्या मध्ये १२% किंवा त्याहून कमी ओलसरपणा असतो ती धान्ये कमी प्रमाणात साठवण्यास ह्या कणग्या उपयोगाला येतात.

 

३. चिनी मातीचे भांडे/ जार :

हे जर चिनीमतीच्या लोणच्याच्या बरण्यांप्रमाणे असतात. ह्यांचे तोंडही निमुळते असते. ह्यां भांड्यांना तडा जाऊ नये म्हणून सूर्यप्रकाशात ठेवून चालत नाही.

ह्यात देखील कडधान्ये, डाळी साठवता येतात आणि ह्याच्या निमुळत्या तोंडावर सपाट फरशी किंवा एखादे झाकण ठेवता येते.

 

food-storage-methods-inmaratthi02
quora.com

 

ह्यात धान्य खूप काळ चांगल्या पद्धतीने टिकते. कीड लागण्याचा संभव नसतो.

 

४. शाडू मातीच्या मोठ्या कणग्या :

काही ‘शे’ किलो ते १० टन इतके धान्य मावण्यास उपयुक्त होतील अशा कणग्या म्हणजे मातीच्या मोठ्या कणग्या. ज्यांची ऊंची आणि रुंदी भरपूर असते. सहसा ह्या वर्तुळाकार असतात.

चौकोनी बनवल्यास त्यांना कोनांमध्ये तडा जाण्याची शक्यता असते म्हणून आकाराने गोलच आणि सिलेंड्रीकल असतात.

 

food-storage-methods-inmaratthi03
scripts.mit.edu

 

ह्या कणग्यांच्या भिंतीची जाडी १५-२० सेंटीमीटर असते. ह्या कणग्या धान्य कोरडे ठेवण्यास मदत करतात. ह्याला आतून कप्पे बनवलेले असू शकतात.

त्या कप्प्यांच्या भिंतींमुळे पडणारे कोन देखील मातीच्या लेपाने गोलाकार करून घेतले जातात. आतील भिंत गुळगुळीत असते.

शाडू मातीने किडे, अळ्या ह्यांना आता अंडी घालण्यास ठार मिळत नाही. ह्या मजबूत असल्याने त्यावर चढून आतील धान्य काढण्यास शेतकऱ्याला सोप्पे जाते..

ह्या कणग्यांवरील झाकण वाळलेल्या गवताचे असू शकते. ते उघडझाप करण्यास सुलभ असते. अशा प्रकारच्या कणग्या आफ्रिकेमध्ये आढळून येतात.

५. जमिनीखालील कणग्या :

भारतातील पूर्वापार चालत आलेल्या धान्य साठवणुकीच्या प्रकारातील हा एक महत्वाचा प्रकार म्हणजे जमिनी खालील कणग्या.

जमिनीखाली भरपूर प्रमाणात धान्य साठवता येईल अशा परकरचे खड्डे कानून त्याला पक्क्या भिंती बनवून त्यावर लाकडी किंवा मातीचे झाकण लावता येते. ह्यात २०० टन धान्य देखील साठवता येते.

जिथे कोरडे हवामान असते, पूर, अतिवृष्टीचा त्रास नसतो अशा प्रभागात हा प्रकार खूप प्रसिद्ध आहे. इतर साठवणुकीच्या साधनांपेक्षा जमिनीखालील कणग्यांच्या जास्ती फायदे आहेत.

 

food-storage-methods-inmaratthi04
youtube.com

 

* किडे अळ्यांपासून कमी धोका असतो.

* ह्या कणग्या बनवण्यास कमी खर्च येतो.

* ह्या जमिनी खाली असल्याने उच्च तापमानाने धान्यावर होणाऱ्या परिणामांचा त्रासही कमी असतो.

* चोरांपासून हे धान्य आरामात जपले जाते.

* धान्यावर सतत लक्ष ठेवावे लागत नाही.

ह्या प्रकारच्या साठवणुकीची काही तोटेही आहेत जसे

* ह्या कणग्या बनवणे खूप कष्टाचे काम आहे.

* ह्याच्या खाली धग ठेवता येत नसल्याने धान्याला ओलावा लागल्यास ते पूर्णपणे खराब होऊ शकते. त्यामुळे धान्याची नासाडी टाळण्यासाठी आर्द्रतेकडे मात्र लक्ष ठेवावे लागते.

* धान्यामध्ये कार्बन डाय ऑक्सईड उत्पन्न होऊ शकतो, त्याला एक प्रकारचा वास येऊ लागतो आणि ह्या कणग्यातील धान्य काढणे जिकिरीचे होऊन बसते.

* वरवरचे धान्य पटकन खराब होऊ शकते.

तर अशा आहेत शेतकऱ्यांच्या धान्य साठवणुकीच्या पद्धती..!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?