चिनी स्त्रियांची त्वचा, वय ओळखू येणार नाही, इतकी सुंदर आणि नितळ कशी काय? रहस्य जाणून घ्या…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

मुलगी वयात आल्यावर तिला वेध लागतात ते सुंदर दिसण्याचे. त्वचा गोरी असो वा सावळी ती सुंदर असली पाहिजे. नितळ असली पाहिजे. काही जणींची त्वचा नैसर्गिक रित्या सुंदर असते. पण काहींना त्वचेशी निगडित बऱ्याच समस्या असतात..

रासायनिक क्रिम किंवा लोशन लावून मात्र आपण त्वचेला हानी पोचवू शकतो. जाहिरातींच्या मागे लागून किती प्रकारची सौंदर्य प्रसाधन आणली जातात.. वर्षानुवर्षे ती वापरून देखील हवा तसा परिणाम साधता येत नाही.

परिणामी त्वचा खराबही हाऊ लागते. त्वचा काळवंडणे, त्यावर फोड येणे, डाग उठणे अशा गोष्टी कायमस्वरूपी राहून जातात. कित्येक स्किन स्पेशालिस्ट केले आणि पाण्यासारखा पैसे ओतला तरी नेहमीच त्वचा सुंदर होईल ह्याची हमी नसते.

पार्लर मध्ये जाऊन फेशियल, स्किन ट्रीटमेंट घेतल्याने तात्पुरता फरक वाटतो. पण पुन्हा काही तासात ‘जैसे थे’..!

अशा वेळी त्वचा नितळ ठेवण्याकरता बऱ्याच स्त्रिया नानाविध घरगुती उपाय करत राहतात. त्यांचा चांगला परिणामही त्वचेवर होतो. घरगुती उपाय कमी खर्चाचे आणि फारसे दुष्परिणाम न करणारे असतात.

 

dry-skin-in-winter-marathipizza

 

भारताला तर आयुर्वेदाची देणगीच मिळालेली आहे. पण भारताचा शेजारी असलेल्या चीन देशातील स्त्रिया देखील खूप सुंदर आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर ना कधी फोड दिसतात ना डाग. अत्यंत नितळ त्वचा असल्याने तेथील स्त्रियांचे वयोमान देखील ओळखू येत नाही. तिथल्या लहान मुलीं देखील सुंदर त्वचा राखण्याबद्दल सजग असलेल्या दिसतात.

कोणत्या प्रकारची प्रसाधंनं वापरून ह्या स्त्रिया वर्षानु वर्षे त्वचा तरुण राखत असतील?

चिनी स्त्रिया त्वचेला विना सुरकुत्यांची आणि नितळ कशी राखतात आणि त्यासाठी काय काय वापरतात ते आपण पाहू.

१. तांदुळाचे पाणी :

हात सडीचे किंवा कमी पॉलिश केलेले तांदूळ पाण्यात भिजवून ठेवावेत. नंतर तांदूळ उपसून उरलेले ते पांढरे पाणी त्वचेसाठी वरदान ठरते. कापसाच्या बोळ्याने ते पाणी चेहऱ्याला आणि मानला लावले तर ते आत पर्यंत मुरून चेहऱ्यावर सुरकुत्या येण्यास मज्जाव करतात.

 

ricewaterskintoner-inmarathi
talkofnaija.com

एकसारखा स्किनटोन कायम राहण्यासाठी ह्या पाण्याचा उपयोग होतो. सूर्य प्रकाशामुळे होणाऱ्या हानीला देखील हे पाणी रोखू शकते. हे तांदूळ भिजवून ठेवलेले पाणी 3-4 दिवस फ्रीज मध्ये ठेऊन देखील वापरता येते.

२. मूग डाळीचा पॅक :

चेहऱ्यावरील फोड म्हणजे ऍक्ने घालवण्याचा उत्तम उपाय म्हणजे मूग डाळीचा चेहऱ्यावर पॅक लावणे.. मूग डाळ त्वचेसाठी फायदेशीर आहे.

 

beautiful-skin-inmarathi
boldsky.com

हा पॅक बनवण्यासाठी आपल्याला मूग मिक्सरवर वाटून घ्यावे लागतात. बारीक पीठ झाल्यावर त्यात थोडे पाणी मिसळून चेहऱ्यावर लावता येईल अशी सैलसर पेस्ट बनवून घ्यावी. चेहऱ्याला ही पेस्ट नवीन अर्ध्या तासाने धुवून टाकावी. चेहऱ्यावरील फोड जाण्यास ह्याने खूप मदत होते.

३. ग्रीन टी :

त्वचेवरून वय कळते. वयाच्या आधीच त्वचा म्हातारी दिसू लागली तर आपणही लवकर म्हातारे दिसू लागतो. ह्याला स्किन ऐजिंग म्हणतात. ते टाळण्यासाठी ग्रीन टी उपयुक्त ठरतो.

 

green tea-inmarathi
brewfull.com

ग्रीन टी मध्ये अँटी ऑक्सिडेंटस असतात. ज्याने शरीर आतून साफ राहते. जर शरीर आतून साफ असेल तर वरून त्वचा आपसूकच नितळ राहते.

ह्यात अँटी ऍजिंग तत्व असल्याने त्याचा उपयोग त्वचेसाठी होतो. ग्रीन टी शरीराचा मेटॅबॉलिझम रेट वाढवून स्थूलता कमी करण्यासही मदत करतो. चिनी स्त्रिया ग्रीन टी चा वापर रोजच्या रोज करत असतात.

४. पुदिन्याची पाने :

पुदिना शरीराला थंडावा देण्यासाठी रोजच्या जेवणात असला पाहिजे हे आपल्याला माहीतच आहे. पण तो चेहऱ्याची त्वचा उजळण्यासाठी देखील उपयुक्त असतो.

 

beautiful-skin-inmarathi01
india.com

पुदिन्याच्या पानांची पेस्ट बनवून ती चेहऱ्यावर आणि मानेवर लावल्यास रंग उजळण्यास आणि त्वचा चमकदार राखण्यास मदत होते.

५. बॉडी मसाज :

 

body-massage-inmarathi
whatsonxiamen.com

शरीर सुदृढ असल्यास त्वचा देखील नितळ आणि तजेलदार राहते. शरीराचा आणि चेहऱ्याचा मसाज त्वचेचा तजेला वाढवण्यास मदत करतो. प्रेशर पॉईंट्स दाबले गेल्याने त्वचेला नवी ऊर्जा मिळते आणि त्वचा तरुण राखली जाते.

६. अंड्याचा पांढरा भाग :

चिनी स्त्रियांची त्वचा अत्यंत मुलायम असते त्यामागचे कारण आहे अंड्याचा पांढरा भाग. अंडे हे नैसर्गिक कंडिशनर आहे. त्वचा मऊ मुलायम ठेवण्यास अंड्यातील पांढऱ्या भागाचा उपयोग केला जातो.

 

beautiful-skin-inmarathi02
infovirales.com.ar

पांढऱ्या भागाचा फेस एक बनवून काही वेळाने धुतल्यास परिणाम लगेच दिसून येतील. हे अँटी एजिंग पण आहे.

७. हळद :

हळद हा अत्यंत गुणी आयुर्वेदिक घटक आहे हे आपण जाणतोच. त्वचेचा तजेला आणि निखार राखण्यासाठी हळद कामी येते. तिचा पॅक बनवून चेहऱ्यावर लावल्याने खूप फायदे मिळतात.

 

beautiful-skin-inmarathi02
darklipstips.com

चिनी स्त्रिया हळदीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात. हळदीने चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि काळे डाग गायब होतात.

८. इतर उपयुक्त टिप्स :

वरील गोष्टी केल्याने तुम्हाला देखील चिनी स्त्रियांसारखी नितळ आणि तजेलदार त्वचा असलेला चेहरा नक्कीच लाभेल पण त्या साठी आणखी काही सूचना आहेत त्यांचे पालन करणे आवश्यक आहे.

वरील प्रयोग त्वचेवर करताना आधी त्याची टेस्ट करायला हवी. हातावर किंवा पायावर तो पदार्थ लावून आपल्याला ऍलर्जी तर होत नाहीये ना हे बघणे जरुरीचे आहे. नाहीतर चेहरा खराब होऊ शकतो.

 

good food-inmarathi04
healthnews.co.ug

आहार उत्तम राखला पाहिजे. आहार उत्तम राखल्यास ते त्वचेवर देखील दिसून येते. मश्रुम आणि सोयाचा आपल्या आहारात समावेश केल्यास त्याचा फायचा त्वचेसाठी होतो. आहाराच्या आणि झोपण्याच्या वेळ देखील पाळाव्यात.

भरपूर पाणी आणि ज्यूस पिणे देखील उत्तम. ते शरीराला हायड्रेटेड ठेवते आणि त्वचेला नितळ..!

ब्युटी पार्लर ला जाऊन मधून अधून फेशियल करणे आणि स्पा घेणे सुद्धा उपयुक्तच ठरते.

तर अशा प्रकारे आपल्या त्वचेचे लाड पुरवून तिला सुंदर करण्यासाठी सज्ज व्हा..!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “चिनी स्त्रियांची त्वचा, वय ओळखू येणार नाही, इतकी सुंदर आणि नितळ कशी काय? रहस्य जाणून घ्या…

  • December 15, 2018 at 4:53 pm
    Permalink

    good

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?