'टोरंट: चित्रपट, टीव्ही सिरीज डाऊनलोड करणारा हा जादूचा दिवा कसा काम करतो?

टोरंट: चित्रपट, टीव्ही सिरीज डाऊनलोड करणारा हा जादूचा दिवा कसा काम करतो?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

चित्रपट आणि इंग्रजी मालिका ह्यांचं आकर्षण गेल्या काही वर्षात वाढत आहे, विशेषतः तरुण वयोगटातील लोकांमध्ये Binge Watching चं प्रमाण मागच्या काही वर्षात वाढल्याच दिसून येतं. Binge Watching म्हणजे की,

एखाद्या मालिकेचे अथवा टीव्हीवरील कार्यक्रमाचे भाग लागोपाठ पाहणे अशी सोप्या शब्दात आपण मांडणी करू शकतो.

गेल्या वर्षीच्या Netflix ने केलेल्या सर्वेक्षणानुसार भारत Binge watching मध्ये जगात मेक्सिको पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आहे, ह्याहून भारतातला चित्रपट, टीव्ही सीरीजचं आकर्षण ह्यांचा अंदाज घेणं अत्यंत सोपं आहे.

पण सगळ्यांना Netflix चं शुल्क भरून चित्रपट आणि इतर कार्यक्रमाचा आनंद घेणे शक्य नसतं आणि मग अशावेळी Netflix आणि इतर सशुल्क सुविधांवर पर्याय शोधून काढला जातो त्यापैकीच एक म्हणजे BitTorrent.

 

how-torrent-works-inmarathi02
dailylifegeek.com

Torrent हे नाव बऱ्याच लोकांनी पूर्वी ऐकलं असेल, कुठलाही नवीन चित्रपट प्रदर्शित झाला की, तो Torrent हून लगेच मोफत मिळतो. अशा गप्पा बऱ्याचदा तरुणांमध्ये  ऐकायला मिळतात, पण हे Torrent नेमकं आहे काय, कसे काम करतं हे सगळं समजून घेणे हा पण महत्वाचा भाग आहे.

BitTorrent हा तांत्रिक भाषेत सांगायच झाल्यास एक Protocol असतो, ज्याचा वापर करून इंटरनेटहून आपण आपल्याला हव्या असलेल्या खूप साऱ्या फाइल्स अगदी जलद गतीने आणि कमी इंटरनेट Bandwidth चा वापर करत आपल्या कंप्यूटरवर Download करू शकतो.

इंटरनेट Bandwidth काय?  हा प्रश्न बऱ्याच कंप्यूटर क्षेत्राशी संबंधित नसलेल्या लोकांना पडू शकतो.

इंटरनेट Bandwidth म्हणजे आपल्याकडे असलेल्या इंटरनेट सर्विस प्रोवाईडर कंपनी आपल्याला देत असलेली डाटा स्पीड, म्हणजे सोप्या भाषेत सांगायच झाल्यास एकाच वेळी खूप लोकं आपल्या इंटरनेट कनेक्शनवर अवलंबून असल्यास डाटाची स्पीड कमी होऊन गोष्टींना Download, Upload आणि इतर इंटरनेट वरील काम करायला वेळ लागतो, त्याला Bandwidth कारणीभूत असते.

BitTorrent आपल्याला हव्या असलेल्या वेगवेगळ्या फाइल्सची माहिती एकत्रित करून ती ज्या दुसऱ्या लोकांकडे उपलब्ध आहे, त्यांच्याकडून एकाचवेळी जलद गतीने आपल्याला मिळवून देते आणि त्याबदल्यात आपल्याकडे असलेल्या फाइल्स ज्या दुसऱ्यांना हव्या असल्यास त्यांना वितरित करते.

आपल्याला इंटरनेटहून कुठलीही गोष्ट डाउनलोड करायची असल्यास आपण त्याला शोधून त्यावर क्लिक करून त्याला आपल्याला हव्या त्या ठिकाणी डाउनलोड करतो.

पण त्या फाइल्सला त्याचवेळी बरीच लोकं डाउनलोड करत असल्यास ती फाइल डाउनलोड होण्यासाठी वेळ लागतो आणी बऱ्याचदा त्या फाइलशी सम्बंधित वेबसाइट ओवरलोड झाल्याने बंद पडते, ह्या सगळ्या समस्या BitTorrent अगदी सहज सोडवते.

 

how-torrent-works-inmarathi
fossbytes.com

BitTorrent हे वेब ब्राउझर सारखं असतं, ज्या प्रमाणे ब्राउझरला काम करण्यासाठी वेबसाइटसची गरज असते, त्याप्रमाणे BitTorrent ला काही विशेष Torrent फाइल्सची गरज असते. एखाद्या विशिष्ट फाइलला डाउनलोड करण्याची संख्या वाढल्यास त्याची गती कमी होते, अथवा ती फाइल देणारा एकमेव सोर्स बंद होतो.

पण BitTorrent ह्या उलट डाउनलोड करणाऱ्या प्रत्येक कंप्यूटरचा डाउनलोड सोर्स म्हणून वापर करते, म्हणजे आपल्याला हव्या असलेल्या फाइलचा एखादा भाग ज्या दुसऱ्या कंप्यूटरवर डाउनलोड केला असल्यास तो आपल्याला त्या सोर्सद्वारे मिळतो आणि आपल्या कंप्यूटरमधे असलेल्या संबधित फाइल्सचा भाग आपण दुसऱ्या कंप्यूटरला शेअर करतो.

जेणेकरून एकाच डाउनलोडींग सोर्सवर असलेला लोड कमी होण्यास मदत होऊन फाइल्स डाउनलोड होण्याची गती वाढते, ह्यामुळे सगळ्या डाउनलोडर्सच एक नेटवर्क तयार होण्यास मदत होते आणि हे नेटवर्क एकमेकांना हव्या असलेल्या फाइल्स जलद गतीने वितरित करायला सुरवात करते.

बऱ्याचदा असं होतं की, आपल्याला एखादा व्हिडीओ हवा असल्यास त्या फाइलचे वेगवेगळे भाग आपल्याला फाइल डाउनलोड  करण्यासाठी  हवे असतात आणि एखादा भाग मिळत नाही अथवा राहून जातो अशावेळी तो भाग कुठल्या यूझरकडे मिळेल हे शोधण्याची गरज भासते.

अशावेळी BitTorrent एका कंप्यूटरचा Tracker म्हणून वापर करते ज्याचा उपयोग करून ते हवे असलेल्या फाइलचा भाग कुठला यूझर डाउनलोड करत आहे किंवा ती पूर्ण फाइल कुणा

कडे आधी उपलब्ध आहे ह्याचा Track ठेवते, ज्याला पीअर म्हटले जाते. त्यानंतर Tracker कंप्यूटर फाइल हवी असलेल्या कंप्यूटरला पीअर कंप्यूटरशी जोडते.

 

how-torrent-works-inmarathi01
dvdvideosoft.com

एकदा कनेक्शन निर्माण झाले की, आपल्याला हव्या त्या फाइल्स बाकी यूझर्स कडून मिळायला लागतात आणि दुसऱ्या यूझर्सना हव्या असलेल्या फाइल्स आपण शेअर करू शकतो. ह्याहून आपल्याला लक्षात येईल की BitTorrent हे डाउनलोडर्सचा फाइल शेअरिंग सोर्स म्हणून वापर करते आणि जितके जास्त सोर्सेस तितक्या सहज, जलद फाइल डाउनलोडींग होण्यास मदत होते.

BitTorrent हे पीअर टू पीअर प्रक्रियेवर काम करते, त्यामु़ळे तुम्ही डाउनलोड करत असलेली फाइल ही मुख्य सोर्सवर नसते. तुमचा एखादा डाउनलोड सोर्स अचानक निष्क्रिय झाल्यास तुम्ही डाउनलोड करता दुसऱ्या सोर्सवर अवलंबून राहू शकतात आणि फाइल डाउनलोड अर्धवट राहिल्यास ते पूर्ण करू शकतात.

जर डाउनलोड करतांना तुमचं इंटरनेट कनेक्शन तुटल्यास किंवा तुमचा कंप्यूटर बंद झाल्यास तुम्ही पुन्हा जिथे डाउनलोड थांबले होते तिथून पुन्हा सुरू करू शकता त्यासाठी पुन्हा पाहिल्यापासून सुरवात करण्याची गरज नाही.

जर यूझरच्या इंटरनेटची गती हळू असेल तर Torrent जुन्या डाउनलोड पद्धतीचा वापर करून यूझरला फाइल लवकर डाउनलोड होण्यास मदत करते.

तंत्रज्ञान नेहमी फायदा घेऊन येतं असलं, तरी काही समस्याही सोबत आणते BitTorrent चा वापर करत असताना हवी असलेली डाउनलोड अपलोड करण्यात तुमचा इंटरनेटची जास्त Bandwidth खर्च होऊ शकते.

त्यामु़ळे इंटरनेट गती जास्त असणे गरजेचे आहे, त्याशिवाय तुम्ही डाउनलोड करत असलेली Torrent फाइल डाउनलोड करणारी इतर कंप्यूटर्स तुमचा पब्लिक आयपी अॅॅड्रेस पाहू शकतात.

त्यामु़ळे Torrent चा वापर करत असताना सुरक्षेकरता VPN (Virtual Private Network ) चा वापर केल्याचा सल्ला दिला जातो. एकंदरीत BitTorrent चा वापर हा फायदेशीर आहे, पण सोबत सुरक्षेचे प्रश्न निर्माण करणारा आहे.

BitTorrent चा वापर ही चाचेगिरी (Piracy) आहे, असा बऱ्याचदा बोलल्या जातं, पण त्यामधे वापरण्यात आलेली प्रक्रिया आणि त्याची काम करण्याची पद्धत ही कायदेशीर आहे. शेअर करण्यात येणारी माहिती, फाइल्स ह्या कदाचित बेकायदेशीर असू शकतात. तांत्रिक समस्येवर तोडगा काढतच नव तंत्रज्ञान जन्माला येतं.

त्यामु़ळे ह्यामधे अजून नवे बदल येतील आणि ते अधिक सहज असतील अशी आशा बाळगूया आणि तंत्रज्ञानाचा वापर योग्य त्या कामासाठीच करूयात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?