' मानवी शुक्राणू वर्षानुवर्षे साठवून ठेवता येतात! ही आहे त्याची रंजक प्रक्रिया – InMarathi

मानवी शुक्राणू वर्षानुवर्षे साठवून ठेवता येतात! ही आहे त्याची रंजक प्रक्रिया

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

काही वर्षांपुर्वी प्रदर्शित झालेल्या ‘विकी डोनर’ चित्रपटाचा चांगलाच गाजावाजा झाला होता. अर्थात त्याचे एकमेव कारण होते ते म्हणजे चित्रपटाचा विषय.

अनेकांनी बोल्ड विषय म्हणून नाक मुरडलं तर ब-याचश्या प्रेक्षकांनी संवेदनशील विषय उत्तमरितीने हाताळल्याबद्दल पाठही थोपटली, मात्र चित्रपटाची वाढती लोकप्रियता पाहिल्यानंतर अशा विषयांची समाजाला असलेली गरज अधोरेखित झाली.

मात्र टिका करण्यापेक्षा त्या विषयाबाबत गांभीर्याने विचार केला तर त्याचं महत्व लक्षात येतं.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आहारापासून नातेसंबंधांपर्यंत सगळ्याच बाबतीत झालेल्या बदलांमुळे अनेक दाम्पत्यांना अपत्यप्राप्तीसाठी डॉक्टरांचा धावा करावा लागतो.

+-

relationship inmarathi '
eharmony.com

लग्नानंतर ठराविक काळापर्यंतचे नियोजन आखले जात असले तरी त्यानंतर मात्र आतुरनेते गुड न्युजची वाट पाहिली जाते, मात्र ही प्रक्रिया लांबली तर मात्र काळजी वाढते.

अर्थात त्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असले तरी त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे.

सायन्स चा विद्यार्थी असो वा नसो.. मुले कशी होतात ह्याची प्रक्रिया सगळ्यांनाच आयुष्याच्या एका टप्प्यावर आल्यावर कळते.. कॉलेजातल्या पाठ्य पुस्तकातील धड्यातून असो, मित्रमैत्रिणीं कडून, आई वडिलांकडून असो किंवा पुस्तकं व्हिडीओ च्या माध्यमातून असो..

मुले कशी होतात ह्या बाबत कोणीच फार काळ अज्ञानी राहत नाही. गंमत म्हणजे ह्या विषयीचं कुतूहल तर अगदी लहानपणापासूनच असतं..

पण मोठे झाल्यावर कळतं की देवाघरुन करकोचा बाळाला आपल्या कपड्यात गुंडाळून दारा बाहेर ठेवत नसतो किंवा हॉस्पिटल मध्ये जाऊन आईनी बाळाला सिलेक्ट करून आणलेलं नसतं..

पुरुषाचे शुक्राणू म्हणजेच मेल स्पर्म हजारोंच्या संख्येने स्त्रीबीजाला (फिमेल एग) भेटायला धावतात. त्यातील एकच शुक्राणू स्त्रीबीजाला किंवा अंडाणू ला फलित करण्यास पुरेसा असतो. शुक्राणूने स्त्रीबीजाला फलित केल्यावर गर्भधारणा होते. पुढे नऊ महिन्यांनी संतानप्राप्ती होते.

जोडप्यांना मूल हवं असल्यास त्याला वयाचं बंधन आहेच. मुलगी आणि मुलगा वयात आल्यापासून ते मूल जन्माला घालण्यास योग्य होतात.

 

sperm_egg_illustration.inmarathi

स्त्रियांना साधारण पणे वयाच्या पंचेचाळिशी पर्यंत fertility (मूल होण्याची क्षमता) प्राप्त असते. पुरुषांना अजून काही वर्षे fertility (प्रजनन क्षमता) प्राप्त असते.

शरिरातील ताकद ऐन तारुण्यात जेवढी असते, ती कालांतराने कमी होते. तशीच प्रजननक्षमता देखील कमी होत राहते. शुक्राणू आणि स्त्री बीजांडे हळू हळू अशक्त किंवा नष्ट होत असतात.

वयाच्या पस्तिशी-चाळीशी नंतर मुले जन्माला घालणे अवघड ठरू शकते. शुक्राणू आणि स्त्रीबीजाची गुणवत्ता वयोमानानुसार कमी झालेली असते. मुलांमध्ये व्यंग असणे, काही गोष्टींची कमतरता असणे, गर्भ पडणे, खूप प्रयत्न करूनही मूलच न होणे असे काही धोके उद्भवू शकतात.

कदाचित म्हणून आपल्याकडे मोठी माणसे लग्न झालेल्या जोडप्याच्या हात धुवून मागे लागलेले दिसतात. आपल्या घरात असे व्यंग असलेले लेकरू जन्म घेऊ नये म्हणून सगळे वेळच्या वेळी होऊन जाऊ देत ह्या साठी बुजुर्ग मंडळी लवकर पाळणा हलू द्या म्हणून नव वरवधूच्या मागे तगादा लावताना दिसतात..!

 

Urmila-Adinath-Kothare-Baby-inmarathi

पण जर प्रजनन क्षमता अति उत्तम असलेल्या वयातील सशक्त शुक्राणू आणि स्त्रीबीजे साठवून ठेवता आली तर..??

होय.. हे शुक्राणू आणि स्त्रीबीजे शीतप्रक्रियेद्वारे साठवून ठेवता येतात आणि जेव्हा ह्यांची गरज असते तेव्हा ते परत ‘शीत’प्रकृतीतून परत सामान्य तापमानाला आणून वापरता येतात.

पण खरंच का हे शक्य आहे? वयानुरूप शरीराप्रमाणे जशी शुक्राणू आणि स्त्रीबीजाची शक्ती कमी होते तशीच खूप वर्षे साठवणूक आणि शीत प्रक्रिया केल्यावर सुद्धा होत नाही का? अशा अशक्त बीजांतून मूल जन्माला घालायला धोका नाही का?

तर ह्या शंकाच निरसन एक ‘शीत प्रक्रिया करू शकते. तिला म्हणतात ‘क्रायो प्रिझर्वेशन’. ह्या प्रक्रियेत शुक्राणू आणि स्त्री बीजांडे अत्यंत कमी तापमानात साठवून ठेवली जातात. शीतप्रक्रियेत त्या बीजांचे वय वाढत नसते. ते ज्या अवस्थेत थंड केले जातात त्याच अवस्थेत ते पुन्हा आपण मिळवू शकतो.

प्रजनांनास उपयुक्त अशा ह्या टिश्यूना फक्त खूप जास्ती गार केले जाते.ह्यात दोन प्रकारे प्रक्रिया घडतात. एक हळुवार थंड करण्याची आणि दुसरी अतिजलद थंड करण्याची. दोन्हीच्या किमतीही वेगवेगळ्या असू शकतात.

 

हे बीज एक प्रोटेक्टिव्ह सोल्युशन वापरून डिहायड्रेट केले जातात जेणे करून ते बर्फाच्या क्रिस्टल्स मध्ये रूपांतरित होणार नाहीत. असे हे डिहायड्रेट केलेले बीज १९० फॅरेनहाईट तापमानात साठवले जातात.

हे खूप वर्ष असेच साठवले जाऊ शकतात. फक्त वापरायच्या आधी त्यांना सामान्य तापमानात आणावे लागते..

ह्या प्रक्रियेत काही बीजांचे नुकसान होऊ शकते पण एका व्यक्तीकडून खूप जास्ती टिश्यू घेऊन साठवले जात असल्याने त्यातील एखाद् दोन खराब झाल्यास जास्ती अडचण येत नाही.

स्त्रीबीज आणि शुक्राणू असे साठवण्याची गरज का बरं भासली असेल? कोणाला ह्याचा फायदा होऊ शकतो?

अर्थातच एकविसाव्या शतकात मुलांच्या बरोबरीने मुलीही शिकतात. मुलींना लग्न झाल्या झाल्या मूल नको असते. शिक्षण, करीअर, नोकरी सगळ्याच जबाबदाऱ्या पेलताना मूल plan केले जाते. घर-दार, शिक्षणाचा खर्च करू शकण्याइतपत योग्य ती सेविंग्ज झाली की मुलाचा विचार हल्लीची जोडपी करतात.

 

WORKING-MOTHER-inmarathi

अशावेळी वय ही तितकेच पटापट वाढत असतं आणि सोबत प्रजनन क्षमता घटत असते. अशा वेळी ह्या जोडप्यांसाठी क्रायो प्रिझर्वेशन प्रक्रिया उपयुक्त ठरते. ऐन तारुण्यातील त्यांची सशक्त बीजे ते साठवू शकतात आणि फॅमिली प्लॅनिंगनुसार पुन्हा वापरू शकतात.

तसेच मूल न होणाऱ्या जोडप्यांसाठी हे ‘क्रायो प्रिझर्व’ प्रक्रिये द्वारे साठवलेले बीज कामी येते. अर्थात ते दुसऱ्या कोणीतरी बीजदात्याचे असते.

कॅन्सर पेशंट असलेल्यांना देखील हे एक वरदान ठरते. कारण कॅन्सर च्या उपचारादरम्यान घेतल्या जाणाऱ्या केमो थेरपी मुले बीजे, शुक्राणू अशक्त किंवा निकामी होऊ शकतात. त्या आधीच ते शितप्रक्रियेत ठेवून दिल्यास कॅन्सर मधून बरे झाल्यावर पुन्हा ते वापरता येऊ शकतात.

जर हे साध्य करता येत असेल तर जिवंत मानवी शरीर सुद्धा वर्षानुवर्षे शीतप्रक्रिया करून साठवता का येऊ शकत नाही?

ह्या बीजांमध्ये मानवी शरीराच्या मानाने पाण्याचे प्रमाण खूपच कमी असते. त्यामुळे क्रायो प्रिझर्वेशन मध्ये त्यांना जास्ती हानी पोचत नाही. पण मानवी शरीर हे ७०% पाण्याने भरलेले असते. १९० फॅरेनहाईटला शरीर थंड केले गेल्यास त्यातील पाण्याचा बर्फच होतो.

थंड करणे आणि परत सामान्य तापमानाला आणणे ह्यात शरीरातील काही पेशी मृत होऊ शकतात. समजा मेंदूतल्या काही पेशी मेल्या, तर माणुस दगावू शकतो. त्यामुळे जिवंत मानवी शरीरासाठी हा धोका पत्करला जाऊ शकत नाही..

मात्र शुक्राणू आणि स्त्री बीजांडे शीतप्रक्रियेनुसार साठवून, आणि हव्या त्या वेळेत वापरावयास तयार करणे सोप्पे करून, सायन्सने नक्कीच गरजूंची मदत केलीये असे म्हणावे लागेल..!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?