सुषमा स्वराज यांच्या कर्तव्यनिष्ठतेचा दाखला देणारं आदर्श उदाहरण !

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम   

=== 

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज सध्या किडनीच्या आजाराने ग्रस्त आहेत, परंतु त्यातही त्या आपले कर्तव्य मात्र विसरलेल्या नाहीत. इस्पितळात उपचार घेत असणाऱ्या सुषमा स्वराज इतक्या कठीण प्रसंगी देखील आपल्या देशबांधवाच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या आणि त्यांनी त्याला सर्वतोपरी मदत केली.

सुषमा स्वराज यांना बातमी समजली की दुबईमध्ये अडकलेल्या एका भारतीय व्यक्तीने भारतात परत जाण्यास मिळावे यासाठी तेथील न्यायालयात अर्ज केला होता. गेली दोन वर्षे न्यायालयाच्या चकरा मारत या माणसाने जवळपास १००० किमी चा पायी प्रवास केला होता. ही बातमी ऐकताच आपलं दुखण बाजूला सारीत सुषमा स्वराज यांनी दुबईमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधला आणि त्या भारतीय व्यक्तीबाबतचा रिपोर्ट मागतला. तात्काळ तेथील अधिकाऱ्यांनी सर्व माहिती काढून सुषमा स्वराज यांना पाठवली. माहिती मिळताच सुषमा स्वराज यांनी दुबई प्रशासनाशी संपर्क साधित त्या भारतीय व्यक्तीला भारतात पाठवण्याची विनंती केली. दुबई प्रशासनाने देखील योग्य तो प्रतिसाद देत त्या व्यक्तीला भारतात पाठवण्याची सोय केली आणि दुबईत अडकलेला हा व्यक्ती सुखरूप त्याच्या घरी दाखल झाला. या घटनेची माहिती  सुषमा स्वराज यांनी ट्विटर वरून संपूर्ण देशवासियांना दिली.

sushama-svaraj-helps-indian-man-marathipizza01

स्रोत

नक्की हे प्रकरण काय आहे?

तामिळनाडूमधील सोनापूर गावाचे रहिवाशी सेल्वाराज कामानिमित्त दुबईला होते. काही वर्षांपूर्वी त्यांच्या आईचे निधन झाले. परंतु त्यांना आईच्या अंत्यसंस्काराला जाण्यासाठी त्यांच्या मालकाकडून परवानगी मिळाली नाही. या संदर्भात त्यांनी न्यायालयात दाद मागितली. हा खटला सुमारे दोन वर्षे चालला. त्यात त्यांचा बराच पैसा देखील खर्ची पडला. त्यामुळे न्यायालयात हजार राहण्यासाठी त्याला ५० किमी चालत जावे लागे. सुमारे दोन वर्षे दर तारखेला ते ५० किमी चालत जात असतं. अश्याप्रकारे त्यांनी न्यायालयाच्या फेऱ्या मारीत जवळपास १००० किमीची पायपीट केली होती. पण निकाल लागत नसल्याचे पाहून आता मात्र त्यांची सहनशक्ती संपत आली होती. ही बातमी दुबईमध्ये उघड होताच तेथील प्रसारमाध्यमांनी बातमी उचलून धरली आणि जगभरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली.

sushama-svaraj-helps-indian-man-marathipizza02

स्रोत

जेव्हा ही बातमी आपल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना कळली, तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी त्याच्या सुटकेसाठी आवश्यक प्रयत्न केले आणि त्यांना मायदेशी परत आणले.

ही कर्तव्यनिष्ठता सरकारमधील प्रत्येक मंत्र्याने अंगी बाणली तर नागरिकांचा सरकार वरचा विश्वास अधिकच दृढ होईल हे मात्र नक्की !

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?