' केरळसाठी धावून आलेल्या मानवतेची १२ उदाहरणं तुम्हाला लढण्याची उमेद देतील – InMarathi

केरळसाठी धावून आलेल्या मानवतेची १२ उदाहरणं तुम्हाला लढण्याची उमेद देतील

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

माणसाला वाटतं तो स्वयंपूर्ण आहे. शास्त्र आणि शस्त्र ह्यांच्या आधारे तो जगात काहीही मिळवू शकतो आणि काहीही घडवू शकतो. पण जेव्हा नियती ठरवते तेव्हा ती ह्याच अहंकारी माणसाला गरीब कोकरू बनवू शकते.

केरळ म्हणजे पृथ्वीवरील सुंदर राज्य. निसर्गाचा अप्रतिम वरदहस्त लाभलेले स्थान. सुंदर हिरवी गार झाडे आणि प्रत्येक घरामागे त्यांचे स्वतःचे ‘बॅक वॉटर’. कोणालाही पुन्हा पुन्हा जाऊन त्या नितांत सुंदर निसर्गाचा अनुभव घ्यावासा वाटेल असे सुंदर केरळ.

त्याला ‘Gods own country’ म्हणजेच देवांचा देश अशी उपाधी मिळालेली आहे.

पण काहीही असो, माणूस स्वतःला कितीही बलवान समजत असो तो निसर्गापुढे नेहमीच हतबल ठरतो. त्याच्या रौद्ररूपापुढे शास्त्र आणि शस्त्रे निकामी ठरतात. कामी येते ती माणुसकी. फक्त माणुसकी..!!

नैऋत्य दिशेकडून येणाऱ्या पावसाची भारतीयांना कायम आतुरता असते. उन्हाळ्याच्या उकड्यानंतर केरळ मध्ये पाऊस दाखल ही बातमी खूपच सुखावह असते. पण ह्या वेळी वरूण राजाची केरळ वर अवकृपा झाली. धोधो कोसळणाऱ्या पावसामुळे केरळ मध्ये पाणी वाढू लागलं.

 

kerala-flood-inmarathi
cricketaddictor.com

समुद्रालागत असलेल्या प्रदेशाला अतिपावसामुळे कायम पूर येण्याचा धोका असतो.

केरळात पावसाची संततधार लागली. सगळीकडे पुराने थैमान घालायला सुरुवात झाली. घराघरात पाणी शिरले. लोकांना आपले घरसंसार टाकून दुसरीकडे स्थलांतर करण्याची वेळ आली. आत्ताची केरळची परिस्थिती खूपच बिकट झाली आहे. ९४ वर्षातील सगळ्यात वाईट महापूर मधून तेथील जनता जात आहे.

चहूकडे गळाभर पाणी आहे. राहायला घर नाहीये, झोपायला कोरडी जमीन नाहीये, खायला अन्न नाहीये. घरातील काही जण पुरात वाहून गेले त्यांचा पत्ताही नाहीये. केरळ वर खरच खूप वाईट वेळ आलीये.

अशा समयी भेदभाव, राग द्वेष बाजूला सारून भरतवासी केरळातील आपल्या बंधुभागिनींच्या मदतीला सरसावलेत. आर्मी चे जवान, स्वयंसेवी संस्था, डीझास्टर मॅनेजमेंट ची माणसे मदतीला धावून गेलेली आहेत.

 

Kerala-flood-inmarathi
theresistancenews.com

केंद्र सरकारची ५०० कोटींची मदत आहेच. इतर राज्येही आपापल्या परीने काही कोटींची मदत केरळला देऊ करत आहेत. पण फक्त पैशाने नाही तर त्यांना सर्वोतोपरी मदतीची गरज आहे. अन्न, कपडे, औषधं, चादरी, जीवनावश्यक वस्तू सगळ्यांचीच गरज आहे.

चोहोकडून मदतीचा वर्षाव होत आहे. कोणी खारीचा वाटा उचलत आहे तर कोणी आपल्या पूर्ण शक्तीने मदत पाठवत आहे.

ScoopWhoop या वेबसाईटने भारतीयांच्या ठायी असलेल्या मानवतेची आणि दिलदारपणाची प्रचीती देणारी काही उदाहरणे प्रसिध्द केली आहेत. ती उदाहरणे इनमराठीच्या वाचकांसाठी देत आहोत.

१. विष्णू कच्छावा


हा एक महाराष्ट्रातील २८ वर्षीय विक्रेता ५० चादरी घेऊन केरळ मध्ये विकण्यास गेला होता. पण केरळातील परिस्थिती पाहून त्याने त्या चादरी ना विकत सरळ तिकडे दान केल्या. अशा भयंकर परिस्थितीत आपल्या धंद्याचा फायदा ना बघत त्याने माणुसकीचे आपले कर्तव्य बजावले.

२. कोकोनट लगून  हॉटेल

अमेरिकेतील सेंट लॉरेल बुलीवर्ड मधील कोकोनट लगून नावाच्या हॉटेल कडूनही मदत येत आहे. त्याचा मालक ‘जो थोतुंगल’ हा केरळ चा असून त्याने ३ दिवसाची आपली कमाई केरळ मधील दुष्काळग्रस्तांना देऊ केली आहे.

 

hotel-inmarathi
scoopwhoop.com

त्याच्या मते इतका वाईट पूर केरळ वासीयांनी कधी पहिला नसावा.

३. राजमणिक्यम आणि एन एस के उमेश


आय ए एस ऑफिसर असलेले राजमणिक्यम आणि एन एस के उमेश हे पूरपरिसरात जाऊन ‘on ground level’ वर मदत करत आहेत. जगभरातून येणारी मदत साठवून ठेवणे, स्वतः ट्रक मधील समान उतरवून ठेवणे अशी कामे देखील ते करत आहेत.

४. रेस्क्यू ऑपरेशन ऑफिसर कन्हैय्या कुमार

रेस्क्यू ऑपरेशन ऑफिसर कन्हैय्या कुमार (जे एन यु वाला नाही) ह्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून एक लहानग्यांच्या जीव वाचवला.

 

NDRf-inmarathi
timesofindia.com

पाणी ओसंडून वाहणाऱ्या पुलावर तापाने फणफणलेला लहान मुलगा अडकला होता त्याला वाचवायला कन्हैय्या कुमार त्या पुराच्या पाण्यात उतरले. त्यांनी शर्थीने त्या मुलाला वाचवून परत आणले.

५. मद्रास इंफॅन्टरी 

मंजली एर्नाकुलम मध्ये ४५ दिवसांच्या ओल्या बाळंतिणीच्या घरात पाणी शिरलेले होते. पाण्याचा ओघ वाढत होता.


अशात मद्रास इंफॅन्टरी च्या जवानांनी त्या बुडत्या बाळ आणि बाळंतिणीचा जीव वाचवला. आता ते दोघे रिलीफ कॅम्प मध्ये सुरक्षित आहेत.

६. सन टीव्ही


तामिळनाडूच्या सन टीव्ही च्या लोकांनी केरळ सरकारला १ कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्त केला आहे.

७. पिण्याचे पाणी फुकट 


कोची शहरात आणि त्याच्या आसपासच्या गावात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा एक स्त्री फुकटात उपलब्ध करून देत आहे. मदतीसाठी तिने तिचा मोबाइलला नंबर देखील ट्विटर वर दिलेला आहे.

८. मल्याळम न्युज चॅनेल ‘Asianet’

मल्याळम न्युज चॅनेल ‘Asianet’ नी चॅनेल ला पैसे पुरवणाऱ्या जाहिराती सध्या बंद ठेवून त्या ऐवजी तो वेळ मदतकार्याची माहिती सतत पोचवण्याच्या बातम्यांसाठी वापरला आहे.

९. भारतीय वायुसेना


भारतीय वायुसेनेने माणसांना सुरक्षित जागी पोहचवणे आणि खान पान, कपडे, औषध पुरग्रस्तांपर्यंत पोहचवण्याचे मुख्य काम हाती घेतलेले आहे. अवघड ठिकाणी पोचून काम करण्याची त्यांची उमेद खचून गेलेल्या लोकांना बळ देत आहे.

१०. स्थानिक मच्छिमार

 

fisherman-inmarathi
scoopwoop

स्थानिक मच्छिमारांनी सुद्धा मदत कार्यात उडी घेतली आहे. पोलीस आणि आर्मीच्या जवानांसोबत बोटीतून जाऊन पुरात अडकलेल्या माणसांना वाचवण्याचे कार्य ते जोमाने करत आहेत.

११. कोझिकोडे येथील मदरसा 


कोझिकोडे येथील एका मदारश्याचे रूपांतरण एक रिलीफ कॅम्प मध्ये झालेले आहे. बेघर झालेल्या माणसांना इथे निवार्याची सोया मिळाली आहे.

१२. मोठ्यांच्या मदतकार्यात लहानगे पण मागे नाहीत. कोची मधील एका बहिणभावाच्या जोडगोळीने खाऊसाठी साठवलेले सगळे पैसे, पैशाची मिंटी फोडून केरळ सरकारला देऊनही टाकले आहेत.

 

help-inmarathi
scoopwoop

जो तो आपापल्या परीने मदतीला, बचावकार्याला धावून जात आहे. ज्यांना शक्य नाही ते आपली मदत पैसे, धान्य, इतर वस्तूं आणि प्रार्थनांच्या मार्फत पोचती करत आहेत. ह्यात कुठेही जुने मतभेद, राग उरलेले नाहीत.

माझ्या देशातील लोकांना माझी थोडी का होईना मदत पोचली पाहिजे हेच सध्या सगळ्यांच्या मनात चालू आहे. माणुसकी आणि भूतदया ह्या माणसाला लाभलेल्या भावनाच पुरून उरत आहेत.

थोडक्यात काय तर, ‘हम लोगोंको समझ सको तो.. समझो दिलबर जानी..

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?