' असं "काय" झालं की मद्रास हे नाव बदलून चेन्नई करण्यात आलं?

असं “काय” झालं की मद्रास हे नाव बदलून चेन्नई करण्यात आलं?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारत देशाला नवनवीन राजा राजवाड्यांचा इतिहास आहे. मोठ-मोठी राज्ये स्थापन करून त्यांना आपल्या आवडीची नावं देऊन हे राजे राज्य करीत असत. तसेच एकमेकांवर कुरघोड्या करत दुसऱ्याच्या राज्यातील भाग बळकावणे हे राज्यकारभार वाढवण्याचे मोठे तंत्र होते.

राजपूत राज्यांच्या प्रभागाला राजपुताना, उत्तरे कडे दिल्ली इलाखा, मराठा राज्य, दक्षिणे कडे मद्रासपट्टनं आशा तऱ्हेची काही नावं अस्तित्वात होती.

मुघलांनी आपापल्या शासन कर्त्याची नावे शहरांना दिली जशी औरंगाबाद, शाहजनाबाद, हैदराबाद, अहमदाबाद, अहमदनगर वगैरे.

पुढे इंग्रज आल्यावर त्यांनी त्यांना सोपी वाटतील अशी नावे जिंकलेल्या भागांना द्यायला सुरुवात केली. बॉम्बे, कॅलकटा, बँगलोर, डेल्ही अशी उच्चरण्यास सोपी नावं वापरण्यात आली.

 

mumbaia-inmarathi

 

स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारतात लोकशाही स्थापन झाली. घटना आली. लोकांना आणि त्यांनी निवडलेल्या सरकारकडे काही अधिकार आले. तसे काही शहरांची नावं बदलण्यात आली.

बॉम्बेच मुंबई झालं, कॅलकटा कोलकाता बेंगलोरच बंगळुरू आणि मद्रासचे चेन्नई.

प्रत्येक नावामागे काही कारण होते. जसे मुंबई हे मराठी बोली भाषेत वापरले जाणारे त्या शहराचेच नाव होते. मग तेच का वापरू नये? कशाला हवीत ती मुघल आणि इंग्रजांनी दिलेली नावं? अशी टूम निघाली आणि बऱ्याच शहरांची नव्याने बारशी झाली..

चेन्नईच्या बारश्याची कथा पण अशीच काही आहे…

दक्षिणेकडील ‘मद्रासपट्टनं’ हा एक मोठा प्रदेश होता. राज्यच होतं एक प्रचंड! कानडी, मल्याळम, तेलगू आणि तमिळ भाषिक सगळेच ह्यात सामील होते.

हळू हळू त्याचे विभाजन झाले आणि आंध्र, केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू अशी विविध भाषिकांच्या संख्येप्रमाणे ही राज्ये बनली. मद्रास नावाचं बंदर असलेलं ‘शहर’ तामिळनाडूची राजधानी म्हणून नावारूपास आलं…

 

Madras became chennai-inmarathi

 

असे म्हणतात की, मद्रास हे नाव मात्र पोर्तुगीजांनी त्यांच्या भाषेतील ‘Mae De Deus’ ज्याचा अर्थ ‘मदर ऑफ गॉड’ असा होतो, त्या शब्दावरून दिलेले असावे.

काही जण म्हणतात की, संस्कृत मधील ‘मधुरस’ ह्या शब्द वरून मद्रास नाव पडले असावे. तर खूप वर्ष सत्ता गाजवलेल्या ब्रिटिशांच्या नकाशा बनवणाऱ्या सदस्यांचे असे म्हणणे होते की, मद्रासला आधी ‘मंदिर-राज’ असे संबोधले जायचे.

बहुदा तिथे बनवल्या गेलेल्या असंख्य मंदिरांमुळेही हे नाव दिले गेलेले असेल.

मद्रास हे नाव सगळीकडे वापरात असताना देखील बावीस-एक वर्षांपूर्वी तामिळनाडूमध्ये सत्तेत असलेल्या करुणानिधी सरकारला पण इतर राज्यातील सरकारांप्रमाणे हुक्की आली. त्यांनी देखील मद्रासचे त्वरित बारसे घातले.

जिथे जिथे शहरांची नावे बदलली गेली तिथे तिथे त्यामागे एक सुप्त राजकीय अजेंडा होता.

कोणालाही मातृभाषा प्यारीच असते. परकीयांनी आपल्या शहरांना दिलेली नावं बदलून जर आपल्या मातीतली, आपल्या मातृभाषेतील नावं त्या शहरांना दिली तर जनतेला आपल्याबद्दल जास्ती आदर वाटेल.

हाच आदर नंतर मतदानाला पेट्यात भरून आपल्या नावे होईल. म्हणजेच स्वतःच्या पक्षाची वोट बँक सुधारेल. हाच मुख्य हेतू. हाच तो राजकीय अजेंडा. म्हणूनच मद्रास देखील नववधू प्रमाणे चेन्नई हे नाव लेऊन सज्ज झाले.

 

Madras became chennai-inmarathi01

 

नावात काय आहे जसे शेक्सपियर म्हणून गेला आहे. नाव बदलून राजकीय फायद्या पलीकडे सर्वसामान्य माणसांना फार काही मिळणार ही नसते. पण ‘मातृभाषेची अस्मिता’ असा मुद्दा बनवून लोकांच्या भावनांना हात घातला जातो आणि मग अशी नामांतर घडवली जातात.

अर्थात तरीही चेन्नई मधील काही इन्स्टिट्यूट्सची नावे जी ‘मद्रास’ ह्या नावाने सुरू होत होती त्यांची नावे बदलणं शक्य नव्हतं.

त्यामुळे जरी सगळीकडे मद्रास चे चेन्नई झाले तरी, मद्रास मेडिकल कॉलेज, मद्रास युनिव्हर्सिटी, आय आय टी मद्रास, मद्रास वेटर्नरी कॉलेज इत्यादी जसेच्या तसेच ठेवावे लागले. ह्यामुळे मद्रास ह्या नावाची ओळख पूर्णपणे कधीच पुसली जाऊ शकणार नाही.

असो, पण चेन्नई हेच नाव का देण्यात आले ह्या मागच्या काही मजेशीर कथा आहेत. कोणती सत्यकथा आहे ह्यावर अजूनही शिक्कामोर्तब झालेले नाही.

 

Madras became chennai-inmarathi02

 

ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या दृष्टीने मद्रास खूप महत्वाचे शहर होते. तिथे बोटींची ये-जा सोपी व्हावी म्हणून बंदरही बांधण्यात आले होते.

ही सगळी जमीन इंग्रजांनी, ‘चर्च, गड, किल्ले आणि बंदर’ बांधण्यासाठी, एका तेलुगू भाषिक असलेल्या, चेन्नाप्पा नाईकर नावाच्या माणसाकडून घेतली होती.

हा माणूस तेथील राजा होता. त्या माणसाच्या नावामुळे चेन्नई नाव देण्यात आले असा समज आहे.

तर कोणी म्हणतात की, चेन्ना केशवा मंदिरामुळे चेन्नई नाव निवडले गेले.

काहींचे म्हणणे आहे की, चेन्न्नईपट्टनं असे फार आधी पासून गावकरी म्हणत असत त्या भागाला. तिथूनच हे नाव घेण्यात आलंय.

सध्याच्या मिम्सच्या युगात तर असेही म्हंटले जाते की, मद्रासी माणसं लुंगी नेसतात पॅन्ट नाही वापरत आणि लुंगीला पॅन्टसारखी ‘चेन नाही’ म्हणून गावाचं नाव चेन्नई.

तर अशी आहे चेन्नईच्या बारश्याची कथा..!!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?