' केरळसाठी देणगी देताना फसू नका : रिलीफ फंडाला मदत करण्याचे अधिकृत मार्ग हे आहेत – InMarathi

केरळसाठी देणगी देताना फसू नका : रिलीफ फंडाला मदत करण्याचे अधिकृत मार्ग हे आहेत

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

जून महिन्यापासून केरळ राज्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे येथे भयंकर परिस्थिती उद्भवली असून येथील लाखो लोकांना महापुराला तोंड द्यावे लागत आहे. येथील परिस्थिती अतिशय भयाण झाली असून केरळ राज्यात आतापर्यंत कोट्यावधींचे नुकसान झाले आहे.

ह्या महापुरामुळे लाखो लोक बेघर झाले असून वीज, रस्ते व जनजीवन संपूर्णपणे विस्कळीत झाल्याने हाहाकार माजला आहे.

कालपर्यंत ह्या महापुराने तीनशेहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे.

खाद्यपदार्थ, तसेच जगण्यासाठी आवश्यक वस्तूंचा अतिशय तुटवडा निर्माण झाल्याने आपल्या केरळमधील बांधवांचे हाल होत आहेत. हवामान खात्याने केरळ राज्यातील तेरा जिल्ह्यांत रेड अलर्ट घोषित केला आहे.

 

Kerala-flood-inmarathi
theresistancenews.com

सतत पडणाऱ्या पावसामुळे नद्यांची पातळी वाढली असून ८० धरणांचे दरवाजे उघडावे लागले आहेत. ह्या भीषण परिस्थिती मदतकार्य करणाऱ्यांनी २२ लाख पेक्षाही जास्त लोकांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. ह्या लोकांसाठी स्पेशल कॅम्प तयार करण्यात आले असून त्यांची व्यवस्था ह्या कॅम्प मध्ये करण्यात आली आहे.

भारतातील सर्वच राज्ये, अनेक संस्था केरळच्या मदतीसाठी पुढे आल्या आहेत. भारतीय रेल्वेकडून केरळमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येत आहे.

आतापर्यंत दिल्ली, आंध्र प्रदेश ,तेलंगणा व पंजाब ह्या राज्यांनी केरळला आर्थिक मदत पाठवली आहे. ह्याशिवाय केंद्र सरकारने सुद्धा तातडीने आर्थिक मदत पाठवली असून सर्व सामान्य जनता व संस्थांना सुद्धा मदत करण्याचे आवाहन केले आहे.

आतापर्यंत केरळमध्ये २०८८ मिमी पेक्षाही जास्त पाउस झाला आहे व आणखी मुसळधार पाउस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. केरळमध्ये गेल्या शंभर वर्षातील हा सर्वात भयंकर व विनाशकारी पूर आहे. ह्या पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

रेल्वेद्वारे तामीळनाडू येथून मालगाडीच्या डब्यातून पाण्याच्या टाक्या पाठवण्यात येत आहेत. अशा परिस्थितीत केरळला सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन ह्यांनी केले आहे.

 

railwaykerala_inmarathi
astcoastdaily.in

अशा परिस्थितीत आपले समाजऋण ओळखून अनेक व्यक्ती संस्था व सर्विस सेक्टर कंपन्यांनी ह्या मदतकार्यात मोठे योगदान दिले आहे. ह्या परिस्थितीत सुरक्षा व सशस्त्र दलाचे जवान आपला जीव धोक्यात घालून पुरात अडकून पडलेल्या लोकांना हर प्रकारे मदत करण्याचे दृढ प्रयत्न करीत आहेत.

नागरिकांना मदतीसाठी आवाहन केले जात आहे. आणि मदतीसाठी तत्पर असलेले इतर देशातील नागरिक त्याला चांगला प्रतिसादही देत आहेत.

असे असले तरी काही चुकीची माहिती असलेले संदेश पसरवून मदतीची मागणी करत नागरिकांना फसवण्याचे प्रकार देखील होत आहेत. या संदेशांच्या जाळ्यात फासायचे नसेल तर कोणकोणते अधिकृत मार्ग वापरले जाऊ शकतात त्याची माहिती इनमराठीच्या वाचकांसाठी देत आहोत..

१. पेटीएम:

तुम्हाला जर पेटीएम वरून आर्थिक मदत पाठवायची असेल तर तुमचे पेटीएम ऍप उघडून त्यावरून पैसे ट्रान्स्फर करु शकता. तुम्हाला जर ह्यात जर “Kerala Floods” हे ऑप्शन दिसत नसेल तर “View All” वर tap करून तुम्ही हे ऑप्शन बघू शकता.

 

paytm kerala-inmarathi
paytm.com

ह्यातून तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या रिलीफ फंड मध्ये आपले योगदान देऊ शकता किंवा काही नॉन प्रॉफिट संस्थांद्वारे तुम्हाला आर्थिक मदत करायची असल्यास “Donate To” ह्यावर tap करून तुमची माहिती व पैश्याचा आकडा टाकून तुम्ही पैसे ट्रान्स्फर करु शकता.

तुम्ही पैसे ट्रान्स्फर केल्यानंतर तुम्हाला एक कन्फर्मेशनचा मेसेज येईल.

२. अमेझॉन

 

amazon-inmarathi
chennaimemes.in

अमेझॉन वरून तुम्हाला मदत पाठवायची असल्यास तुम्ही अमेझॉन ऍपमध्ये स्क्रोल केल्यावर तुम्हाला तिथे एक ऑप्शन दिसेल.त्या ऑप्शन वर tap केल्यावर तुम्ही अमेझॉन बरोबर काम करणाऱ्या NGO ची यादी असलेल्या पेजवर रीडायरेक्ट केले जाईल.

त्या लिस्ट मधून तुम्ही कुठल्याही NGO मार्फत तुमची आर्थिक मदत त्यांना पैसे ट्रान्सफर करून पाठवू शकता.

३. केरळ सरकार वेबसाईट:

तुम्हाला जर पेटीएम किंवा इतर साईटवरून आर्थिक मदत पाठवता येत नसेल तर तुम्ही Chief Minister’s Distress Relief Fund (CMDRF) ह्यांच्याकडे सुद्धा तुमची आर्थिक मदत पाठवू शकता.तुमची आर्थिक मदत तुम्ही डीडी, चेक किंवा इंटरनेट बँकिंग द्वारे पाठवू शकता.

 

kerala-inmarathi
donation.cmdrf.kerala.gov.in

किंवा donation.cmdrf.kerala.gov.in ह्या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही तुमची आर्थिक मदत ऑनलाईन पाठवू शकता.

४. तुम्ही तुमचे चेक पुढील पत्यावर पाठवू शकता

The Principal Secretary (Finance) Treasurer, Chief Minister’s Distress Relief Fund, Secretariat, Thiruvananthapuram – 1;

५. तुम्हाला इंटरनेट बँकिंग द्वारे पैसे पाठवायचे असल्यास पुढील खात्यात पैसे जमा करु शकता.

Account number: 67319948232

Bank: State Bank of India

Branch: City branch, Thiruvananthapuram

IFS Code: SBIN0070028

PAN: AAAGD0584M

Name of Donee: CMDRF

आर्थिक मदतीखेरीज आपल्या केरळमधील बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचीही गरज आहे. धान्ये, डाळी ,मिल्क पावडर इतर खाद्यपदार्थ , झोपण्यासाठी सतरंज्या किंवा चादरी, पाणी, टॉयलेटरिज, सॅनिटरी नॅपकिन,टॉवेल, स्वैपाकाची भांडी,कपडे, चप्पल ह्या गोष्टी सुद्धा तेथे पोचवणे आवश्यक आहे.

ह्या मदतकार्यात गूगलने एका वेगळ्या प्रकारे मदतकार्य करण्याचे महत्वपूर्ण कार्य केले आहे. गूगलने पर्सन फाईंडर टूल तयार केले आहे. तुम्ही ह्यात हरवलेल्या व्यक्तीची तपशीलवार माहिती टाकून त्या व्यक्तीचा ठावठिकाणा शोधू शकता.

 

youtube.com

तसेच तुमच्याबरोबर एखादी व्यक्ती सुरक्षित असेल परंतु परिवारापासून लांब असेल तर तिची माहिती ह्यात अपलोड करून त्या व्यक्तीच्या परिवारातील लोकांना मदत करु शकता.

तुम्ही subscribe to updates about this person ह्या ऑप्शन वर क्लिक केलेत तर नंतर कुणी त्या व्यक्तीबद्दल काही माहिती टाकली तर तुम्हाला नोटीफिकेशन येउन तुम्ही ती माहिती बघू शकता.

जिओ, एयरटेल व BSNL ह्या कंपन्यांनी केरळसाठी मोफत सेवा सुरु केली आहे. पूरग्रस्त भागात मोफत एसेमेस, कॉल व डेटा सर्विस ह्या कंपन्या देत आहेत. असे असले तरीही पुरामुळे अनेक ठिकाणी मोबाईल वरून संपर्क होणे कठीण झाले आहे.

केरळ सरकारने जनतेसाठी पुढील हेल्पलाईन नंबर जाहीर केले आहेत.

Kasargod: 9446601700

Kannur: 91-944-668-2300

Kozhikode: 91-944-653-8900

Wayanad: 91-807-840-9770

Malappuram: 91-938-346-3212

Malappuram: 91-938-346-4212

Thrissur: 91-944-707-4424

Thrissur: 91-487-236-3424

Palakkad: 91-830-180-3282

Ernakulam: 91-790-220-0400

Ernakulam: 91-790-220-0300

Alappuzha: 91-477-223-8630

Alappuzha: 91-949-500-3630

Alappuzha: 91-949-500-3640

Idukki: 91-906-156-6111

Idukki: 91-938-346-3036

Kottayam: 91-944-656-2236

Kottayam: 91-944-656-2236

Pathanamthitta: 91-807-880-8915

Kollam: 91-944-767-7800

Thiruvananthapuram: 91-949-771-1281

आपल्या केरळमधील बांधवांना आपल्या मदतीची आत्यंतिक गरज आहे. अस्मानी संकटात सापडलेल्या आपल्या बांधवांना मदत करणे आपले कर्तव्य आहे. थोडे मन मोठे करा व ह्या कार्यात आपल्याला शक्य होईल तेवढा खारीचा वाटा उचला.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?