' टिपू सुलतानशी लढाई ते राष्ट्रपतींची सुरक्षा: भारतीय आर्मीच्या या तुकडीला सलाम! – InMarathi

टिपू सुलतानशी लढाई ते राष्ट्रपतींची सुरक्षा: भारतीय आर्मीच्या या तुकडीला सलाम!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

स्वातंत्र्य दिन तसेच गणतंत्र दिनाच्या निमित्ताने आपल्याला आपल्या देशाची भव्यता आणि आपल्या भारतीय सैन्याबाबत जाणून घ्यायला मिळते.

जसे की गणतंत्र दिनाला जेव्हा राजपथवर परेड होते तिथे आपल्या देशातील विभिन्न संस्कृती तसेच देशाची सुरक्षा करणारे जवान आणि त्यांच्या रेजिमेंटबाबत बघायला मिळते.

प्रत्येक स्वतंत्रता दिनाला तसेच गणतंत्र दिनाला इतरांसोबतच आणखी एक सैनिकांची तुकडी आपलं लक्ष वेधून घेते, ती म्हणजे राष्ट्रपतींची सुरक्षा करणाऱ्या सैनिकांची तुकडी.

राष्ट्रपती हे देशाचे पहिले नागरिक आणि भारतीय सैन्याच्या तिन्ही दलाचे सरसेनापती असतात.

त्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी घोडदलाची एक विशिष्ट तुकडी नेमलेली असते. अतिशय कठीण असं प्रशिक्षण घेतलेले हे सेनेचे जवान राष्ट्रपतींचे संरक्षण करत असतात.

भारतीय सैन्यात अनेक रेजिमेंट आहेत. ज्यांच्याबाबत आपण ह्याधी देखील जाणून घेतलं आहे.

राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी तैनात असणारी ही रेजिमेंट देखील त्यापैकीच एक. ह्या रेजिमेंटला प्रेजिडेंट्स बॉडीगार्ड्स (पीबीजी)’ म्हणजेच ‘राष्ट्रपतींचे अंगरक्षक दल’ म्हणून ओळखले जाते.

 

PGB-rejiment-inmarathi
newsnation.in

 

ही भारतातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित रेजिमेंट आहे.

ह्या रेजिमेंटची निर्मिती १७७३ साली इस्ट इंडिया कंपनी बनारसचे तेव्हाचे गव्हर्नर ‘वॉरन हेंस्टिंग्ज’ ह्यांनी केली होती.

हेंस्टिंग्ज ह्यांनी घोडदलातील ५० सैनिकांना अंगरक्षक म्हणून निवडले होते. तेव्हा ह्या सेनेला ‘दि गार्ड ऑफ मुघल्स’ ह्या नावाने ओळखले जायचे.

आजची ही सेना ह्याच ‘दि गार्ड ऑफ मुघल्सचं’ बदललेलं स्वरूप आहे.

ह्या रेजिमेंटमध्ये बंसारच्या राजाने आणखी ५० सैनिकांची भर घातली. त्यामुळे पुढे ह्या रेजिमेंटला १७८४ सालापासून ‘दि गवर्नर जनरल्स बॉडीगार्ड (जीजीबीजी)’ असे संबोधले जाऊ लागले.

त्याकाळी संन्याशांचा उठाव, रोहीग्यांचे बंड, टिपू सुलतान विरुद्धची लढाई, इजिप्त, ब्रह्मदेश अश्या प्रकारच्या अनेक युद्धात ह्या रेजिमेंटच्या जावांनांनी भाग घेतला होता.

१८५९ साली भारतामधील इस्ट इंडिया कंपनीचे राज्य संपुष्टात येऊन राणीचे राज्य सुरु झाले होते. तेव्हा ह्या रेजिमेंटला ‘व्हॉइसरॉयचे बॉडीगार्ड’ म्हणून संबोधले जाऊ लागले.

ह्या रेजिमेंटच्या जवानांना ‘जीजीबीजी’ असे संबोधण्यामागे एक अतिशय रंजक कहाणी आहे.

ह्या रेजिमेंटमध्ये भरती होण्यासाठी जवानांची उंची ही ६ किंवा ६ फुटाच्या वर असणे बंधनकारक होते. त्यामुळे ह्या रेजिमेंटमधील सर्वच सैनिक हे उंचपुरे, रांगडे आणि देखणे होते.

ब्रिटीश अधिकारी त्यांना ‘Gods’Gift to Beautiful Girls’ म्हणजेच जीजीबीजी म्हणायचे.

 

PGB-rejiment-inmarathi01
elementstoday.com

 

तर १९४४ साली ह्याचे नाव पुन्हा बदलून ’४४ वे डिवीजनल रिकोनिसेंस स्क्वाड्रन’ ठेवण्यात आले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ह्या सेनेला ‘प्रेजिडेंट्स बॉडीगार्ड्स (पीबीजी)’ असे टायटल देण्यात आले.

सध्या ह्या सेनेतील एक छोटीशी तुकडी राष्ट्रपती सचिवालयाअंतर्गत काम करते.

पीजीबी सध्या राष्ट्रपती भवनात अनुष्ठान शिस्तीच्या उपक्रमांना पूर्ण करण्याचं काम सांभाळते.

ह्या तुकडीमध्ये प्रामुख्याने जाट शीख आणि मुस्लीम जवानांची भरती केली जायची.

जेव्हा भारत ब्रिटीश राजवटीतून स्वतंत्र झाला तेव्हा ब्रिटिशांनी आपल्या ह्या भारत देशाचे दोन तुकडे केले. भारत आणि पाकिस्तान. त्यामुळे व्हॉइसरॉयच्या ह्या अंगरक्षकांची देखील विभागणी झाली.

मुस्लीम बॉडीगार्ड हे पाकिस्तानात गेले तर जाट शीख हे भारतात राहिले.

व्हॉइसरॉयकडे एक सोन्याचा मुलामा असलेली बग्गी होती. जेव्हा ह्या रेजिमेंटची विभागणी झाले तेव्हा ही बग्गी आता कुणाला मिळते ह्यावर एक नवा वाद उभा झाला.

कारण दोन्ही देशांसाठी ही बग्गी प्रतिष्ठेचा प्रश्न बनली होती. ह्या समस्येचे निवारण हे टॉसने झाले होते.

 

PGB-rejiment-inmarathi02
tehelka.com

 

भारताच्या लेफ्टनंट कर्नल ठाकूरसिंघ ह्यांनी टॉस जिंकून ही बग्गी भारताला मिळवून दिली. आजही ही बग्गी राष्ट्रपतींच्या सवारीची शान आहे.

ह्या सेनेतील जवांनांना भारतीय सैन्यातील जवानांमधूनच निवडले जाते. त्यानंतर त्यांना एक विशिष्ट प्रकारची ट्रेनिंग दिली जाते. ह्या तुकडीतील अनेक सैनिक हे मिल्ट्री फोर्स आणि एयर फोर्स मधून निवडले जातात.

डोक्यावर निळी- सोनेरी पगडी, लाल किंवा पांढऱ्या रंगाचा पोशाख असा ह्यांचा गणवेश असतो. जेव्हा हा गणवेश घालून हे जवान त्यांच्या रुबाबदार घोड्यावर बसतात तेव्हा ते दृश्य डोळ्याचे पारणे फेडणार असतं.

ह्या जवानांच्या हातात असणारा भाला हा शांतता आणि त्यागाचे प्रतिक असते. दर शनिवारी राष्ट्रपती भवनात ‘जयपूर कॉलम’समोर रक्षकांच्या बदलीचा कार्यक्रम पार पडतो. हा कार्यक्रम सामान्य नागरिकांसाठी खुला असतो.

राष्ट्रपती आपल्या संपूर्ण कारकिर्दीत एका अंगरक्षकाला उत्कृष्ट सेवेसाठी ‘चंदेरी तुतारी’ देऊन त्या जवानाचा सन्मान करतात.

 

navratnanews.com
navratnanews.com

 

ह्या रेजिमेंटकडे राष्ट्रपतींच्या संरक्षणाचीच नाही तर सियाचीन ग्लेशियर येथील सीमेच्या रक्षणाची देखील जबाबदारी आहे. तसेच ह्या रेजिमेंटने आजवर अनेक युद्धात आपले शौर्य दाखवले.

श्रीलंका, सोमालिया, अंगोला ह्या सारख्या देशांत त्यांनी शांतीसेना म्हणून काम केलं आहे.

१८११ साली ह्या रेजिमेंटला पहिला युद्ध सन्मान “जावा” ने सन्मानित करण्यात आले.

तर स्वातंत्र्यानंतर १९६२ साली भारत-चीन युद्ध आणि १९६५ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान देखील त्यांनी एक मोलाची भूमिका निभावली.

मागील २४५ वर्षांपासून ही रेजिमेंट देशाची सेवा करत आहे. सध्या ह्या दलात ४ ऑफिसर्स, २० ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर्स आणि ११८ घोडेस्वार असे दोनशेहून अधिक जवान ह्या रेजिमेंटमध्ये कार्यरत आहेत.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?