'विमानाची जमिनीपासूनची उंची मोजण्याचे हे अफलातून तंत्रज्ञान तुम्हाला ठाऊक आहे का?

विमानाची जमिनीपासूनची उंची मोजण्याचे हे अफलातून तंत्रज्ञान तुम्हाला ठाऊक आहे का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

राईट बंधूंनी विमानाचा शोध लावुन शतक उलटून गेलं आहे. तेव्हा पासून आजच्या तारखेपार्यंत विमान उड्डयन शास्त्रात अनेक शोध लागत गेले, तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अवाढव्य वजनाची आणि आकाराची विमानं आकाशात झेपावताना आपल्याला दिसतात.

विमान हा आजही अनेकांसाठी कुतूहलाचा विषय आहे आणि आजही उड्डयन शास्त्राच्या सीमा दिवसेंदिवस विस्तारत आहेत.

विमानाची जमिनीपासूनची उंची कशी मोजत असावेत हाही समान्यजनांच्या कुतूहलाचा विषय असतो.

तर या लेखात जाणून घेऊयात विमानाची जमिनीपासूनची उंची मोजण्याचे तंत्रज्ञान

बरीच उपकरणं विमानाची उंची मोजण्यासाठी वापरली जातात, पण यापैकी दोन उपकरणे सर्वाधिक लोकप्रिय आहेत ती म्हणजे Barometric altimeter आणि Radio altemeter.

 

radio-altimeter-inmarathi
rfcafe.com

Barometric altimeter विषयी जाणून घेऊयात.

साधारणपणे bar हा शब्द pressure म्हणजेच दाब या संकल्पनेसंबंधी वापरला जातो. आणि altimeter म्हणजेच altitude(उंची)मोजण्याचे उपकरण.

तर जसे आपल्याला नावावरून लक्षात येते की, या उपकरणात हवेच्या दाबाचा उपयोग करून विमानाची उंची मोजली जाते. या उपकरणामागची संकल्पना अगदी गाडीच्या टायरमधल्या हवेचा दाब मोजणाऱ्या उपकरणापेक्षा फार वेगळी नाही.

जसजशी विमानाची उंची वाढत जाते, तसतसे वातावरण विरळ होत जाते आणि त्यामुळे हवेचा दाब कमी होत जातो. या उपकरणात sealed bellows म्हणजेच सीलबंद भाते वापरले जातात.

जेव्हा विमान उड्डाणाची उंची वाढत जाते आणि हवेचा दाब कमी होऊ लागतो, तेव्हा हे bellows प्रसरण पावतात. याउलट जेव्हा विमानाची उंची कमी होऊ लागते आणि हवेचा दाब वाढायला लागतो तेव्हा हे bellows आकुंचन पावतात.

या आकुंचन-प्रसारण यंत्रणेशी गियर यंत्रणा जोडलेली असते, तिच्या साहाय्याने दर्शकाची हालचाल होते आणि रीडिंगद्वारे विमानचालकाला विमानाची उंची कळते.

आता प्रश्न असा पडू शकतो की हवेचा दाब हा काय केवळ उंचीनुसार बदलत नाही तर हवामानातील बदलांनुसारही बदलतो.मग त्याचा परिणाम रिडींग वर होत नाही का?

 

airplane-taking-off-inmarathi
wisegeek.com

साधारणपणे १८०० फूट उंचीचा आतील विमानांसाठी आणि त्याच्याही वर उडणाऱ्या विमानांसाठी काही वेगळे नियम आहेत. याचे कारण म्हणजे १८०० फूट उंचीपेक्षा कमी उंची मध्ये हवेच्या दाबातील थोडा बदलही रीडिंगमध्ये मोठा बदलआणू शकतो कारण या टप्प्यात उंचीनुसार आणि हवामानाच्या बदलानुसार दाबाच्या प्रमाणात मोठा बदल होतो.

त्यामुळे या उंचीच्या आत उडणाऱ्या विमानांमध्ये खालील तत्वाचा वापर केला जातो-

विमानाच्या टेक ऑफ आणि लँडिंग च्या वेळी हवामानाच्या थोड्या बदलांचाही मोठा परिमाण दाबाच्या काट्यावर होऊ शकतो त्यामुळे विमानचालकापाशी एक कळ असते जिचा वापर करून तो रिडींग मध्ये येणारी चूक दुरुस्त करू शकतो.

त्यासाठी त्याला जवळच्या हवामान केंद्राशी संपर्क करून वातावरणातील बदलांची माहिती घ्यावी लागते.

एकाच वेळी एक ठिकाणाहून अनेक विमानं जाऊ शकतात, काही वेळा डोंगर वगैरे चा अडसर होऊ शकतो आणि रिडींग मधील लहानश्या चुकी ची परिणती अपघातातही होऊ शकते. त्यामुळे हे स्थानिक दाबानुसार रिडींग बदलणे आवश्यक असते.

 

plane InMarathi

 

आता १८०० फूट उंचीच्या वरून उडणाऱ्या विमानांबद्दल-

या उंचीवरून उडणाऱ्या विमानांमध्ये altemeter ठरलेल्या २९.९२ रीडिंगशी समायोजित(ऍडजस्ट)करून घ्यावा लागतो. कारण १०००फूट उंचीचा वरून उडणारी विमाने समदाब पट्टीतून उडत असतात आणि एकच वेळी एकाहून अधिक विमाने एकाच क्षेत्रातून एकाच उंचीहून जाणाच्या संभवही कमी असतो.

दुसरे उपकरण ज्याचा सध्याच्या काळात अधिक वापर होतो आहे ते म्हणजे radio altemeter. हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे.
आपल्याला याच्या नावावरून कल्पना येतच असेल की या उपकरणात विमानाची जमिनीपासून उंची मोजण्यासाठी रेडिओ लहरींचा वापर केला जातो.

 

airplane-taking-off-inmarathi01
microwavejournal.com

या उपकरणात transmitor आणि receiver बसवलेले असतात. Transmitor द्वारे सोडल्या गेलेल्या रेडिओ लहरी जमिनीपासून वा विमानाखाली आलेल्या पृष्ठभागापासून परावर्तित होऊन reciever पर्यंत पोचतात.

या उपकरणात एक सेकंदाला शेकडो लहरी निर्माण करून रिसिव्ह करण्याची क्षमता असते. त्यामुळे चालकाला दर सेकंदाला बदलत्या उंचीची माहिती मिळू शकते.

plane 1 InMarathi

या मध्ये जो कालावधी लागतो त्यावरून विमानाची जमिनीपासूनची उंची मोजली जाते.

उंची = (रेडिओ लहरींचा वेग × लहरी परावर्तित होण्यासाठी लागलेला वेळ) ÷२ सूत्राद्वारे विमानाची उंची गणली जाते.

काही आधुनिक रेडिओ यंत्रांमध्ये परावर्तनाच्या वेळेचा वापर न करता रेडिओ लहरींच्या Phase difference अर्थात फेज मधील फरकाच्या आधारे उंची मोजली जाते.

या उपकरणाचा barometric aktemeter च्या तुलनेत फायदा असा की रेडिओ लहरीवर हवामानातील कुठल्याही बदलाचा परिणाम होत नाही.त्यामुळे त्याच्या तुलनेत अधिक तंतोतंत उंचीचे मोजमाप या उपकरणाद्वारे केले जाऊ शकते.

Radio altmeter चे दोन प्रकार आहेत.

एक म्हणजे Low Range radio Altimeter. याचा उपयोग ० ते २५०० फुटाच्या आत केला जातो. विशेषतः विमानाच्या लँडिंग वेळी याचा अधिक उपयोग होतो.

 

plane 2 InMarathi

 

आणि दुसरा म्हणजे High Range Radio Altimeter. याचा उपयोग २५०० फुटावरील उड्डाणासाठी केला जातो.

या पुढारलेल्या तंत्रज्ञानाच्या युगात gps(Ground positioning system) सारख्या काही नेव्हिगेशन सिस्टिम्स विमानाच्या सुरक्षित उड्डाणासाठी महत्वाच्या असलेल्या अनेक गोष्टींची माहिती सहजगत्या पुरवतात परंतु आजही या hi tech गोष्टींमध्ये बिघाड झाल्यास विशेषतः लँडिंग च्या वेळी barometric altemete हाच विमानचालकाचा सर्वात जवळचा मित्र आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?