'कॅथलिक चर्चचं लपवलेलं "कर्तृत्व" : विद्वान स्त्रिया, पुजाऱ्यांना जिवंत जाळण्याचा काळाकुट्ट इतिहास

कॅथलिक चर्चचं लपवलेलं “कर्तृत्व” : विद्वान स्त्रिया, पुजाऱ्यांना जिवंत जाळण्याचा काळाकुट्ट इतिहास

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

हडळ, जखीण, चेटकीण, भूत, पिशाच्च, काळी जादू अशा बऱ्याच संकल्पना आपण ऐकत आलो आहोत. ‘हॅरी पॉटर’ नामक सिनेमा साखळी पूर्णपणे ह्याच ‘विच’ आणि ‘विझर्ड’ च्या संदर्भात आहे.

चेटूक म्हटले की, ती विचित्र झोपडी, टोकदार टोपी, जादूची छडी, उडणारा झाडू, वेगवेगळे द्रवपदार्थ रटरट उकळतानाची मोठी काळी हंडी आणि अक्राळविक्राळ दिसणारी म्हातारी किंवा म्हातारा अशाच आकृत्या डोळ्यासमोर येतात.

प्रेमभंग, वशीकरण, काळी जादू करून कोणाला आपली कामे करायला भाग पाडणे वगैरे कामांसाठी आजही काही तांत्रिक मांत्रिक सरकारी निर्बंध असतानाही चोरून आपापले धंदे थाटून बसलेले दिसतात.

लोकं सुद्धा करून बघायला काय हरकत आहे म्हणून कसलेही प्रयोग स्वतःवर करून घेतात.

गमतीदार कहाण्यांपेक्षा चेटूकांच्या वाईट काहण्याच समाजात प्रसिद्ध आहेत.

चेटूक ही फक्त भारतीय संकल्पना नसून १४०० च्या शतकापासून भारताबाहेरील देशात सुद्धा चेटकीण म्हणजेच ‘विच’ ही संकल्पना मानण्यात येत होती.

किंबहुना त्यावर लोकांचा खूप विश्वासही होता. चेटूक-चेटकीणी ह्या खलनायक/खलनायिका रूपातच मानल्या जायच्या. त्यांना जादू येते, त्याचा वापर करून त्या काहीही करू शकतात असा समज होता.

 

Witch-Hunt-inmarathi03
afwcraft.blogspot.com

 

असल्या चेटूकांच्या जादू टोण्याची त्या काळी चलती होती. एखाद्यावर ‘मॅजिक स्पेल’ टाकून त्याला त्याच्या कर्माची शिक्षा देणे असे प्रकार सर्रास घडत असत.

युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि आशियामध्ये अजब जादू चालायच्या. चेटूकांच्या नावाखाली कुकर्म देखील चालायची.

आयुष्यातील काही अडचणींचा उतारा म्हणून हे चेटूक/चेटकीणी त्यांच्याकडे येणाऱ्या माणसांकडून भयंकर अघोरी कृत्य करून घ्यायचे. अशक्यप्राय गोष्टी घडवून आणू असा दावा करायचे.

आगीच्या निखाऱ्यांवरून चालणे, काळ्या शैतानाची पूजा करून घेणे इतकाच नाही तर नर बळी देखील द्यायला लावायचे.

अतिशय हिंसक अशा पद्धती अवलंबल्या जात असत. तशात त्याकाळी ह्या विरुद्ध फार काही कायदे ही नव्हते त्यामुळे अशा लोकांवर वचक नव्हता.

तरीही काही देशांमध्ये कायदे काढले गेले. जादूटोणा करणे, त्याची पुस्तके बाळगणे, जादू करायला लागणारे कसले कसले पदार्थ, हत्यारं बाळगणे सगळेच अवैध ठरवले गेले.

अशा गोष्टी करणाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा संमत केली गेली. खूप जणांना दिली ही गेली. पण त्याचे प्रमाण कमीच होते.

 

Witch-Hunt-inmarathi01
vox.com

 

पुढे बऱ्याचश्या देशांमध्ये ख्रिस्त धर्म वाढीस लागला. ख्रिस्त धर्मियांच्या पवित्र ग्रंथात म्हणजेच बायबल मध्ये बऱ्याच गोष्टींना स्थान नव्हते.

जादूटोणा करणे हे बायबलला अमान्य होते. जादूगार, ‘विच’ आणि विझर्ड ह्यांना जिवंत ठेवणे म्हणजे बायबलच्या विरोधात वागणे.

ख्रिस्ती लोकांच्या प्रार्थना स्थळातील (चर्च) पाद्री आणि इतर मोठ्या लोकांनी असल्या जादूटोणा करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली. त्यांना शोधून काढायचे फतवे जारी झाले.

इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांना पकडून आणून सार्वजनिक पणे त्यांना ‘जाळून’ टाकण्याची सजा दिली जायची. ह्यालाच ‘विच हंट’ असे म्हटले गेले.

 

Witch-Hunt-inmarathi02
thewaronloneliness.com

 

जर कोणाकडे पुस्तके सापडली, जर जादू टोण्याची कुणकुण लागली तर त्या लोकांना पकडून नेण्यात येई आणि काहीही चौकशी विना त्यांना जाळून टाकण्यात येई.

कोणी दिसायला जरी असला एखाद्या चेटूक्या सारखा तरी त्याचा मृत्यू निश्चित. एक प्रकारे चर्चचा कारभार पाहणाऱ्यांना सगळीकडे दहशत निर्माण केली. जेणे करून कोणी जादूच्या नावाखाली कुकर्म करणार नाही.

रोमन कॅथॉलिक चर्चचा फतवा असा होता की,

ह्या “विचेस’ ‘Satan’ म्हणजेच शैतानाने पाठवलेल्या स्त्रिया आहेत. शैतान हा गॉडचा विरोधी असून, गॉडला म्हणजे परमेश्वराला मानणाऱ्या लोकांना छळायला ‘विचेस’ पृथ्वीवर पाठवल्या गेल्या आहेत. त्या काहीही करू शकतात. खूप नीच थराला जाऊ शकतात. माणसाचे बळी घेऊन त्यांचे रक्त प्यायला आणि मांस खायलाही मागे पुढे बघत नाहीत.

तुमची गाईगुरे, शेती, घरे सगळं नष्ट करू शकतात. ह्यासाठी त्यांना मारून टाकणे हे एक पवित्र काम आहे. ह्याने परमेश्वर तुमच्यावर कृपा करेल.

आणि चर्च मधील धर्म प्रचारकांनी कायदा हातात घेऊन ‘Witch Hunting’ ला जोरदार सुरुवात केली. जेणेकरून वाईटावर चांगल्याने मात करता येईल.

शैताना पुढे आपला देव मोठा होईल. खूप जणांना पकडून मारण्यात आले. स्त्री असो की पुरुष कोणाची हयगय करण्यात आली नाही.

नंतर हेही प्रकरण विकोपास जाऊ लागले. १५०० ते १८०० च्या काळात लाखोंनी चेटकीणींच्या कत्तली होऊ लागल्या. त्यांना आधी पकडून त्यांच्यावर अत्याचार करून, त्यांचे हाल करून मग त्यांना जाळून टाकण्यात येई.

फाशी देणे, शिरच्छेद करणे अशाही प्रकारे सजा देण्यात येई. गरीब किंवा कुरूप माणसे जे निरपराध होते त्यांना पण सजा मिळाली.

इतक्या स्त्रिया पुरुषांना मारले गेले की,  त्याची तुलना होलोकॉस्ट शी केली गेली. म्हणजेच हिटलरच्या काळात ज्यू लोकांच्या कत्तलीबरोबर ह्याची तुलना होऊ शकली.

 

Witch-Hunt-inmarathi
evil.wikia.com

 

त्या काळातील विचारवंतांचे असे म्हणणे होते की,

चेटकीणी, चेटूक असे काहीही अस्तित्वात नाहीये. रोमन आणि इतर चर्चला आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे. आपलाच धर्म किती श्रेष्ठ हे ठरवायचं आहे. ह्याच सगळ्यासाठी, लोकांच्या मनात दहशत पसरवून त्यांना स्वतःच्या धर्मात ओढण्याकरता हे अघोरी कायदे चर्च लागू करू पाहत आहे. हे ताबडतोब बंद झाले पाहिजे.

तर काही विचारवंतांचे म्हणणे होते की,

जे काही चाललेय ते योग्य आहे. देवाचा कोप होऊ नये म्हणून ह्या चेटूक्यांना मारलेच पाहिजे. त्यांना जिवंत ठेवणे म्हणजे सृष्टीचा अंतच. देवाची कृपा सदैव होण्याकरता सगळ्यांनी ह्या ‘विचेस’ ना मारून टाकण्याच्या पुण्यकर्मात हातभार लावला पाहिजे.

या काळात खूप उलटसुलट चर्चा करून काही विचारवंतांनी पुस्तके देखील लिहिली होती. त्यातून काही समाजसुधारकांनी जरा सकारात्मक लिखाण केले. अशा वाईट ‘सुपर नॅचरल पॉवर’ अस्तित्वातच नाहीत ह्यावर पुस्तके आली.

चेटकीणी, डाकिनीसुद्धा नसून हा स्वार्थी लोकांनी निर्माण केलेला भ्रम आहे असे त्यांचे म्हणणे पडले.

ह्यावरून बोध घेत हळू हळू काही देशांमधे विच हंटिंग थांबू लागले. काहींनी ते पूर्ण बंद केले. आता १९०० शतकात देखिल ही प्रथा काही ठिकाणी अगदी निर्धोकपणे चालू होती. आता जरा परिस्थिती सुधारत चाललीये. लोकांचा अशा गोष्टींवर विश्वास बसत नाहीये.

चेटकीणी, काळी जादू, शैतान अशांची भीती मनातून हद्दपार होऊ लागलीये. तरीही हा ‘विच हंटिंग’ चा अमानुष रक्तरंजित इतिहास पुसला जाऊ शकत नाही..!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?