'चुकीचा पत्ता असूनही पत्र योग्य ठिकाणी कसं पोहोचलं? अतिशय रंजक गोष्ट...

चुकीचा पत्ता असूनही पत्र योग्य ठिकाणी कसं पोहोचलं? अतिशय रंजक गोष्ट…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

सध्या पत्रव्यवहार हा फक्त नावापुरताच राहिला आहे! आता कॉम्प्युटर मोबाईल इंटरनेट यामुळे कोणाशीही संपर्क साधणं खूप सोप्पं झालं आहे आणि त्यामुळे सारं जगच छोटं वाटायला लागले आहे!

व्हाट्सअप फेसबुक ४जी अनलिमिटेड इंटरनेट सुविधा, व्हिडियो कॉलिंग या सगळ्यामुळे खूप फरक पडला आहे!

 

indian letter
the indian express

 

पण तरीही आजही पत्रं, तार यांची आठवण काढली जाते! ते पोस्टमन ची वाट बघत बसणे आणि त्या छोट्याशा कागदावर लिहिलेला लहानसा संदेश वाचणे यात काही वेगळीच मजा असायची! जी सध्याच्या फास्ट कम्युनिकेशन मध्ये अजिबात नाही!

काही लोकांच्या आयुष्यात काम हे केवळ काम असतं तर काहींसाठी ते आयुष्याचा एक भाग असतं.

दिलेलं काम पूर्ण करण्यासाठी असे लोक नेटाने प्रयत्न करतात. मग त्यात सफाईकामगार, अग्निशामक दलाचे लोक आणि पोस्टमन हे येतात. ही लोकं दुर्लक्षित असतात तरीही आपलं काम विनातक्रार करत असतात.

आयर्लंडच्या टपालात आलं एक पत्र. ज्यावर फक्त एक नकाशा आणि ढोबळ माहिती होती. पण आयर्लंडच्या एका पोस्टमनने हे पत्ता नसलेलं पत्र एकदम बरोब्बर त्याच्या जागी पोहोचवलं. त्याला त्या पत्रावरच्या नकाशाने आणि मोडक्या तोडक्या एक दोन वाक्यांनी मदत केली.

 

post box inmarathi
stanford mercury

त्याचं काय झालं, एक हौशी भटक्यांचा चमू Búðardalur ह्या आयर्लंड च्या एका गावी गेला होता. तिथेच एका रहिवाश्याकडे त्यांनी मुक्काम ठोकला. सुट्टीहून परत गावी आल्यावर ह्या चमुने त्या परिवाराला एक पत्र पाठवलं. पण नेमकी माशी इथेच शिंकली.

ह्यांना त्या परिवाराचं नाव, पत्ता, पोस्टल कोड कुठ माहिती होता? मग ह्या चमूने एक नवी शक्कल लढवली. त्या पत्रावर त्यांनी एक कच्चा नकाशा काढून दिला जेणेकरून पोस्टमनसाठी  सोयीस्कर होईल.

देश – आयर्लंड

शहर – Búðardalur

नावाच्या रकान्यात त्यांनी काय लिहिलं माहितीये?

A horse farm with an icelandic/danish couple and 3 kids and alot of sheep!

म्हणजेच,

   एक घोडे असलेलं शेत जिथे एक दानिश जोडपं आपल्या तीन लेकरांसोबत आणि खूप साऱ्या मेंढ्यासोबत राहतं.

 

त्यांनी काढलेला नकाशा खालील फोटोत दिसतोय, ज्यात त्यांनी पत्ता लाल ठिपक्याने दाखवला.

 

letter 2
domain.com.au

स्रोत

आणखी माहिती द्यावी म्हणून जे काही आठवलं  ते त्यांनी पत्रावर लिहिलं. उदा.-

दानिश महिला Búðardalur मधल्या एका सुपरमार्केट मध्ये काम करते.

बर पोस्ट मास्तरांनी ही मोहीम मनावर घेतली आणि उपलब्ध माहितीवर पत्र पोहोचवायला निघाले. २७० लोकांची वस्ती असलेल्या Búðardalur गावात पोस्टमन आणि नागरिकांच्या मदतीने हे पत्र योग्य जागेवर पोहोचलं.

 

longford inmarathi
longford leader

इथल्या पोस्टाच्या कर्मचाऱ्यांना माहित आहे की ते काय आणि का करत आहेत आणि आयर्लंड मधल्या अफलातुन पोस्टमनची कहाणी ही काही एकमेव नाहीये.

ह्या Búðardalur च्या घटनेची जेव्हा एका वेबसाईटने दखल घेतली तेव्हा जगभरातून अनेक लोकांनी आपले अनुभव शेअर केले.

lettre

स्रोत

letter2

स्रोत

आपल्या कामाशी प्रामाणिक राहून प्रत्येकाची सुख दु:खे ज्याच्या त्याच्या घरी पोचवणाऱ्या सर्वच पोस्टमन काकांचं करावं तेवढ कौतुक कमीच आहे !

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Abhidnya Adwant

Author @ मराठी pizza

abhidnya has 49 posts and counting.See all posts by abhidnya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?