इंटरनेट वापरताना ‘वाय-फाय राऊटरचा’ स्पीड वाढवण्यासाठी या ५ सोप्या टिप्स वाचाच

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

अन्न, वस्त्र, निवारा आणि वाय-फाय ह्या माणसाच्या मूलभूत गरजा झाल्या आहेत, असं आजकाल गंमतीने म्हंटल जातं! पण ही गोष्ट आता तितकीच महत्वाची झाली आहे!

या ३ मूलभूत गरजांनंतर इंटरनेट सुविधा ही एक अत्यावश्यक गोष्ट झाली आहे!

आज इंटरनेट ही गोष्ट फक्त ऑफिसच्या कामापुरतीच मर्यादित राहिली नसून ती प्रत्येक घराघरातली महत्वाची गोष्ट झाली आहे! आज याच इंटेरनेटच्या माध्यमातून माणसांमधले अंतर कमी झाले!

लोकांना बऱ्याच गोष्टी एका क्लिक वर समजायला सुरुवात झाली आणि त्यातूनच माणसाने आजवर एवढा विकासाचा पल्ला गाठला आहे!

 

internet inmarathi
afternoon voice

 

आज कितीही नाही म्हंटल तरी इंटेरनेटचे आभार आपण मानायलाच पाहिजेत! इंटरनेट मुळे काही विघातक गोष्टी सुद्धा निर्माण झाल्या पण त्याचा फायदा देखील तितकाच झाला!

टेक्नॉलॉजी मुळे झालेली प्रगती हीच आपल्या देशाला ह्या आज एका उंचीवर घेऊन गेली आहे हे सुद्धा मान्य करायलाच हवे!

सध्या बहुतेकरून प्रत्येकाच्या घरी इंटरनेट कनेक्शन्स आणि वाय-फाय बसवलेले आहे! घरी इंटरनेट वापरण्यासाठी वाय-फाय राऊटर लावताना आपण त्यात फारसं लक्ष घालत नाही.

 

wifi inmarathi
matrix networks

 

आपल्या इंटरनेट सर्व्हिस देणाऱ्या कंपनीचा तज्ञ किंवा ज्याला आपण इंजिनियर म्हणतो तो  कनेक्शन आणि राऊटर सेटिंग्ज करून देतो.

नंतर ते राऊटर तसंच पडून रहातं. पण, तुम्ही पुढील ५ सोप्या युक्त्या वापरून, राऊटर सेटिंग्ज बदलून इंटरनेटचा वेग बराच वाढवू शकता.

 

१. वाय-फाय राऊटरची जागा

एक गोष्ट नेहेमी लक्षात ठेवा – राऊटरचं ट्रान्समिशन omnidirectional आणि downward असतं. म्हणजेच, राऊटरमधून इंटरनेट ट्रान्समिट होण्याची दिशा वर्तुळाकार आणि वरून खालच्या दिशेने असते.

 

wifi router inmarathi
Pc Mag

 

म्हणून, तुमचं राऊटर घराच्या मध्यभागी आणि उंच जागी असावं. शक्यतो घराच्या ३/४ म्हणजेच (तीन चतुर्थांश) उंचीवर असावं.

 

२. अडथळे टाळा

वाय-फाय राऊटर कपाटात किंवा ड्रॉवर मध्ये बंदिस्त ठेवू नका. तसंच अगदी कोपऱ्यात किंवा भिंतीला खेटून ठेऊ नका. पारदर्शक पृष्ठभाग म्हणजेच (काच, आरसा, मार्बल टाईल्स इत्यादि) जवळ ठेऊ नका.

सर्वात महत्वाचं – राऊटर इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या जवळ ठेऊ नका.

त्यामुळे एखाद वेळेस चुंबकीय रीएक्शन होऊन शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते, ज्यामुळे तो राउटर किंवा ते इलेक्ट्रॉनिक उपकरण खराब सुद्धा होऊ शकते!

 

wifi strenth inmarathi

 

३. मोठे अॅंटीना असलेला राऊटर वापरा

राऊटरमध्ये वापरले गेलेला अॅंटीना चांगल्या दर्जाचा असण्याची शक्यता कमी असते. बाजारात अगदी किरकोळ किंमतीत उत्तम राऊटरचे अॅंटीना मिळतात.

शिवाय राऊटरचे अॅंटीना हातानेच फिरवून सहज काढता येतात.

 

wifi antenna inmarathi
phyics forum

 

फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की चांगल्या प्रतीचे अॅंटीना कधीकधी एकाच दिशेने सिग्नल्स फेकतात. त्यामुळे तुम्हाला राऊटर तसं ठेवावं लागेल.

बाजारात internet extender मिळतात. हे फक्त इंटरनेट सिग्नल्स उचलून आणखी समोर फेकतात. ह्यांनी तुम्ही राऊटरची पोहोच खूप वाढवू शकता.

 

४. थोडासा ‘जुगाड’

कधीकधी तुम्हाला इंटरनेटचा वापर एका विशिष्ठ दिशेनेच करता येणं शक्य असतं. राऊटर घराच्या मध्यभागी ठेवणं शक्य नसतं.

अश्यावेळी कोल्ड ड्रिंक्सच्या अल्यूमिनीयम कॅनचा वापर करून तुम्ही इंटरनेट एमिशन तुमच्या बाजूने करून घेऊ शकता.

अल्यूमिनीयम कॅन अर्धा कापून तिचा अर्धवर्तुळाकार भाग राऊटरच्या अॅंटीना भोवती असा ठेवा की वर्तुळाचा उघडा भाग तुमच्या दिशेने असेल. ह्याने हव्या त्या दिशेने एमिशन वाढवता येतं.

 

 

wifi hacking inmarathi

६. सॉफ्टवेअर इंजिनीअर बना – इंटरनेट चोरी टाळा!

गंमतीचा भाग बाजूला ठेवला तर खरंच हे इतकं अवघड नाहीये. काही फ्री टूल्स मिळतात ज्याच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या इंटेरनेटच्या वापरावर बारीक लक्ष ठेवता येते!

या मार्फत कोणत्या कोणत्या उपकरणाद्वारे तुमचं इंटरनेट वापरले जात आहेत, हे सांगतात. सारखं लक्ष ठेवून तुमचं इंटरनेट कुणी चोरून किंवा हॅक करून वापरत नाहीये ना हे सुद्धा या टूल्स च्या सहाय्याने आपल्याला समजते!

 

wifi security inmarathi
Tipard

 

राऊटरची सुरक्षा वाढवण्याच्या आणखी काही किचकट पद्धती आहेत. त्या तुमच्या इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरकडून जाणून घ्या, समजून घ्या आणि आजमावून बघाच!

या सगळ्याची तुम्हाला चांगलीच मदत होईल आणि यापुढे होणाऱ्या कोणत्याही प्रॉब्लेम वर तुम्ही स्वतः सोल्यूशन काढू शकाल!

तुम्हाला कुठल्या माहित असतील तर आम्हाला कळवा.

आम्ही इतरांना कळवू!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?