तुमच्या wi-fi ची speed वाढवण्याच्या ५ सोप्या टिप्स

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

घरी internet वापरण्यासाठी wi-fi राऊटर लावताना आपण त्यात फारसं लक्ष घालत नाही. आपल्या internet service provider companyचा tech expert कनेक्शन आणि राऊटर सेटिंग्ज करून देतो. नंतर ते राऊटर तसंच पडून रहातं. पण, तुम्ही पुढील 5 सोप्या ideas वापरून, राऊटर सेटिंग्ज बदलून इंटरनेट speed बरीच वाढवू शकता.

 

postion-WiFi-router-higher

Image source: mywifirouter.me

1) wi-fi राऊटरची जागा

एक गोष्ट नेहेमी लक्षात ठेवा – राऊटरचं ट्रान्समिशन omnidirectional आणि downward असतं. म्हणजेच, राऊटरमधून इंटरनेट transmit होण्याची दिशा वर्तुळाकार आणि वरून खालच्या दिशेने असते.

म्हणून, तुमचं राऊटर घराच्या मध्यभागी आणि उंच जागी असावं. शक्यतो घराच्या 3/4th (तीन चतुर्थांश) उंचीवर असावं.

 

2) Avoid interruptions – अडथळे टाळा

राऊटर कपाट, drawerमध्ये बंदिस्त ठेवू नका. तसंच अगदी कोपऱ्यात किंवा भिंतीला खेटून ठेऊ नका. Reflective surfaces (- काच, आरसा, मार्बल टाईल्स etc) जवळ ठेऊ नका.

सर्वात महत्वाचं – राऊटर इतर electronic वस्तूंच्या जवळ ठेऊ नका.

 

ku1iqof4rox16un5j7mg

Image source: fieldguide.gizmodo

 

3) मोठे antenna आणि extender वापरा

राऊटरमध्ये वापरले गेलेला antenna चांगल्या qualityचा असण्याची शक्यता कमी असते. बाजारात अगदी रुपयांपासून उत्तम राऊटरचे antenna मिळतात. शिवाय राऊटरचे antenna हातानेच फिरवून सहज काढता येतात. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की चांगल्या प्रतीचे antenna कधीकधी एकाच दिशेने सिग्नल्स फेकतात. त्यामुळे तुम्हाला राऊटर तसं ठेवावं लागेल.

बाजारात internet extender मिळतात. हे फक्त इंटरनेट सिग्नल्स उचलून आणखी समोर फेकतात. ह्यांनी तुम्ही राऊटरचा reach खूप वाढवू शकता.

 

4) थोडासा ‘जुगाड’ !

कधीकधी तुम्हाला इंटरनेटचा वापर एका विशिष्ठ दिशेनेच करता येणं शक्य असतं. राऊटर घराच्या मध्यभागी ठेवणं शक्य नसतं. अश्यावेळी कोल्ड ड्रिंक्सच्या aluminum canचा वापर करून तुम्ही इंटरनेट एमिशन तुमच्या बाजूने करून घेऊ शकता.
Aluminum can अर्धी कापून तिचा अर्धवर्तुळाकार भाग राऊटरच्या antenna भोवती असा ठेवा की वर्तुळाचा उघडा भाग तुमच्या दिशेने असेल. ह्याने हव्या त्या दिशेने एमिशन वाढवता येतं.

 

5) सॉफ्टवेअर इंजिनीअर बना – इंटरनेट चोरी टाळा!

Just kidding! पण हे इतकं अवघड नाहीये. काही फ्री टूल्स मिळतात (उदा: Wireless Network Watcher — एक free पण windows-only software) जे कोणते कोणते devices तुमचं इंटरनेट वापरत आहेत, हे सांगतात. सारखं check करत रहा की कुणी तुमचं राऊटर hack करून इंटरनेट चोरत तर नाहीये ना!

राऊटरच्या security levels वाढवण्याच्या आणखी काही किचकट processes आहेत. त्या तुमच्या इंटरनेट प्रोव्हायडरकडून implement करून घ्या.

Hope this helps!

तुम्हाला कुठल्या माहित असतील तर आम्हाला कळवा.

आम्ही इतरांना कळवू!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?