स्पेशल लोकांसाठी स्पेशल जेल – चक्क फाईव्ह स्टार हॉटेलचं केलं जेल मध्ये रूपांतर

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===


प्रत्येकाची एकदातरी पंचतारांकित हॉटेलमध्ये जाण्याची इच्छा असते. त्या हॉटेलचा थाटमाट आपण पण अनुभवावा असे आपल्याला वाटत असते. तेथील लोकांचा रुबाब, तेथील शिस्त, तेथे तयार करण्यात येणारे विविध देशांचे पदार्थ, तेथे येणाऱ्या लोकांची वागणूक हे सर्व काही वेगळेच असते. या हॉटेल्समध्ये येणारे लोक हे खूप श्रीमंत आणि प्रतिष्ठित असतात. त्यामुळे काहीतरी वेगळेच वातावरण या हॉटेल्समध्ये तयार होते. या पंचतारांकित हॉटेल्समध्ये तुमच्या सेवेसाठी नेहमी माणसे हजर असतात. यामध्ये खूप प्रशस्त खोल्या देखील असतात. कोणतीही गोष्टं तुमच्या हातामध्ये आणून दिली जाते.

 


Ritz Carlton.Inmarathi
hospitalityonline.com

पण हेच पंचतारांकित हॉटेल जर तुमच्यासाठी जेल बनले, तर तुम्हाला कसे वाटेल ? आता तुम्ही विचार कराल की, आम्ही हॉटेलला जेल  का म्हणतोय. पण हे खरंच घडले आहे. भ्रष्टाचारी नेत्यांना या पंचतारांकित हॉटेलमध्ये बोलावून नंतर नजरकैद करून ठेवण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.

दोन आठवड्यापूर्वी सौदी अरेबियामध्ये गुंतवणूकीला प्रोत्साहन देण्यासाठी रियाधच्या रिट्झ कार्लटन हॉटेलला एक आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी तयार करण्यात आले होते. ज्यामध्ये जगभरातील ३००० पेक्षा जास्त अधिकारी आणि व्यावसायिक समाविष्ट होते.

या परिषदेच्या दोन आठवड्यानंतर लगेचच या पंचतारांकित हॉटेलला लक्झरी जेलमध्ये परिवर्तीत करण्यात आले. ज्यामध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पकडल्या गेलेल्या ३० पेक्षा जास्त राजकिय नेत्यांना आणि शाही कुटुंबातील सदस्यांना ठेवण्यात आले आहे.

 

Ritz Carlton.Inmarathi1
vice.com

न्यूयॉर्क टाईम्सच्या बातमीनुसार – या बाबतीती सोशल मिडीयावर एक व्हिडियो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दाखवण्यात आले आहे की, आरोपींना ठेवण्यासाठी हॉटेललाच अस्थायी रुपात जेलमध्ये परावर्तीत करण्यात आले आहे. या व्हिडियोमध्ये जमिनीवर आरोपी झोपलेले दाखवण्यात आलेले आहेत आणि सुरक्षा रक्षक त्यांच्यावर नजर ठेवून आहेत.

द गार्डियनच्या एका वृत्तानुसार, शाही कुटुंबातील लोकांना इतर आरोपींबरोबर यासाठी ठेवण्यात आले नाही, जेणेकरून जनतेच्या मनात याविषयी काही चुकीचा संदेश जाऊ नये. या वृत्तपत्राला  एका अधिकाऱ्याने दिलेल्या मुलाखतीत असे म्हटले आहे की,


‘आम्हाला सर्वांना माहित आहे की, ते क्राऊन प्रिन्स आहेत आणि त्यामुळे आम्ही त्यांना जेलमध्ये ठेवू शकत नाही.’

 

अश्याप्रकारे या भव्य पंचतारांकित हॉटेलचे एका आरामदायी जेलमध्ये परिवर्तन करून मोठमोठ्या नावाजलेल्या हस्तींना त्यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे याच हॉटेलमध्ये सुरक्षा रक्षकांच्या पहाऱ्यात नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

 

 


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?