अजब योगायोग…ह्या ५ महाभयंकर अपघातांमुळे आजचा विमान प्रवास “सुरक्षित” झाला आहे…!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
जगात दररोज १ लाखांहून अधिक नागरी विमानं उड्डाण करतात! जणू मानवाने तंत्र कौशल्याने कित्येक असाध्य गोष्टी साध्य केल्याची, ही दर दिवशी १ लाखवेळा दिलेली पावतीच. परंतु हा विमानांच्या टेक ऑफ-नि-लँडिंगचा प्रवास अगदीच सुरस, सुगम नव्हता. “हवेत उडू शकणारं वाहन” म्हणून विमान तयार झालं खरं. परंतु नागरी सेवेत अनंत अडचणी, खाचखळगे होते.
नेहेमीप्रमाणे, माणसाने आपल्या चुकांमधून शिकून, सुधारणा करून ह्या अडचणी कमी कमी करत नेल्या आहेत.

दुर्दैवाने, ह्या सुधारणांची किंमत अनेकदा “फार मोठी” असली आहे. परंतु ती किंमत चुकवूनच आपण विमान उद्योगाची दिशा बदलली आहे.
येथे आम्ही ५ अश्या विमान दुर्घटनांविषयी सांगणार आहोत, ज्यांनी विमान उद्योग कायमचे बदलून टाकले…
१) एअर कॅनडा फ्लाइट 797 ( मॅक्डोनाल्ड डगलस डिसी 9-32) दुर्घटना :

2 जून, 1983 साली एअर कॅनडा फ्लाइट 797 चा एक मॅक्डोनाल्ड डगलस डिसी 9-32 टेक्सासहून मॉन्ट्रियलकडे जात होते. क्रू मेंबरला 3 हजार 300 फुटाच्या उंचावरुन विमानाच्या मागील बाजूने धूर निघताना दिसतला.
वैमानिकाने विमान सिनसिनाटीच्या विमानतळावर उतरवले. तत्काळ प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु झाले पण तोपर्यंत आगीमुळे केबिनमध्ये विस्फोट झाला.
या अपघातात विमानातील 46 प्रवाशांपैकी 32 जणांचा मृत्यू झाला. परंतु आग कशामुळे लागले याचे कारण समजले नाही.
या घटनेनंतर विमानाच्या टॉयलेटमध्ये स्मोक डिटेक्टर आणि ऑटोमॅटिक आग विझवणारे यंत्र लावण्यात आले. दुसरीकडे जेटलायनर्सच्या आसनांवर अग्निरोधक लेप लावण्यात आला.
विमानाच्या फ्लोरमध्ये लायटिंगची व्यवस्था करण्यात आली. या मुळे दाट धुक्यातून विमान चालवणे काही प्रमाणात शक्य झाले.
या घटनेचा परिणाम असा झाला की 1988 मध्ये विमानांमध्ये अधिक सुरक्षितता आणि अग्निरोधक इंटीरिअर बनवले जाऊ लागले.
२) टीडब्ल्यूए लॉकहीड सुपर आणि युनायटेड एअरलाइन्स डग्लस डीसी-7 दुर्घटना :

ही दुर्घटना 30 जून, 1956 रोजी घडली.
टीडब्ल्यूए लॉकहीड सुपर आणि युनायटेट एअरलाइन्स डग्लस डीसी-7 एकमेंकांना ग्रँड कॅनयॉन येथे धडकले. टीडब्ल्यूए लॉकहीड सुपरमध्ये 6 क्रू मेंबरबरोबर 64 प्रवाशी होते आणि डग्लस डीसी-7 मध्ये 5 क्रू सदस्यांबरोबर 53 प्रवाशी होते.
या दुर्घटनेत एकूण 128 जण मृत पावले.
दोन्ही विमाने इंस्ट्रूमेंट फ्लाइट रुल्सने नियंत्रित केले जात होते. दोन्ही वैमानिकांच्या मार्गात बदल झाले. कारण त्यावर एअरवेज कंट्रोलरुमचे नियंत्रण नव्हते. यामुळे दुर्घटना घडली.
या दुर्घटनानंतर 20 कोटी 50 लाख रुपयांचा खर्च करुन एअर ट्रॅफिक कंट्रोल सिस्टिम सुधारणा करण्यात आली.
ह्या घटनेनंतर अमेरिकेत आतापर्यंत कुठलेच विमान एकमेकांशी धडकले नाही. 1958 मध्ये फेडरल एव्हिएशन एजन्सीची (आता अॅडमिनिस्ट्रेशन) सुरुवात करण्यात आली. ती हवाई सुरक्षितेची जबाबदारी घेते.
३) युनायटेड एअरलाइन्सचे विमान 173 दुर्घटना :

28 डिसेंबर, 1978 मध्ये युनायटेड एअरलाइन्सचे फ्लाइट 173 ओरेगनचे उपनगरीय भागातील पोर्टलँडमध्ये दुर्घटनाग्रस्त झाले. ते पोर्टलँडच्या इंटरनॅशनल विमानतळावर उतरवले जाणार होते. विमान तातडीने विमानतळावर उतरवताना ही दुर्घटना झाली.
मात्र यात आग लागली नाही. विमानात 138 प्रवाशी आणि 8 क्रू मेंबर होते. सर्व क्रू मेंबर्ससह 19 लोकांचा मृत्यू, 21 प्रवाशी जखमी झाले.
विमानाच्या इंधनावर नजर ठेवणाऱ्या कॅप्टनच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना झाली. दोन्ही इंजिनमधले इंधन संपले होते. इंधन पुरवठा थांबल्यामुळे उतरण्याच्या वेळी गिअरमध्ये बिघाड झाला आणि तातडीचे लँडिंगचा प्रयत्न अयशस्वी ठरला.
या दुर्घटनेनंतर सर्व क्रू मेंबर्संना कॉकपिटचे प्रशिक्षण देण्यात आले. नवा कॉकपिट रिसोर्स मॅनेजमेंट (सीआरएम) अवलंबण्यात आला.
या बरोबरच विमानातील अन्य सदस्यांना तांत्रिक प्रशिक्षण अनिवार्य करण्यात आले. या सुधारणांमुळे 1989 मध्ये आयोवाच्या सिओक्स सिटीमध्ये डिसी-10चे दुर्घटना होता होता क्रू मेंबरने वाचवले.
४) डेल्टा एअरलाइन फ्लाइट 191 ( लॉकहीड एल-1011-385-1) दुर्घटना :

2 ऑगस्ट, 1985 रोजी टेक्सासच्या डलासमध्ये दुपारनंतर हवामानात बदल झाला होता.
डेल्टा एअरलाइनच्या विमान 191 ने रनवेवरुन उड्डाण घेतले. या लॉकहीड एल-1011-385-1 मध्ये 167 प्रवाशी होते. 800 फुट उंचावर विस्फोट होतो आणि काही सेकंदात विमान खाली कोसळले.
यात 137 लोक मृत पावले. दुर्घटनेमागे दुर्बल फ्रंटल सिस्टिम असल्याचे सांगितले जाते.
या दुर्घटनेनंतर नासाने विंडशीयर डिटेक्टर रडार बनवले आणि नंतर या घटनांची नोंद झाली नाही.
५) एअरोमेक्सिको विमान 498 दुर्घटना :

1956 मध्ये ग्रँड कॅनयॉनमध्ये दुर्घटनेनंतर एटीसी सिस्टिमने एअरलाइन्सचे वेगवेगळे मार्ग बनवले होते. याने विमान दुर्घटना थांबली. असे असूनही लॉसएंजिल्समध्ये 31 ऑगस्ट, 1986 रोजी एक खासगी 4 आसनी पायपर आर्चर विमानला कंट्रोल रुमचे सिस्टिम डिटेक्ट करु शकले नाही.
एअरोमॅक्सिको डीसी-9 च्या वैमानिकाने मोठी चूक केली होती. उतरवताना ते एलएएक्स विमानाला जाऊन धडकले. या दुर्घटनेत 82 लोकांचा मृत्यू झाला.
कंट्रोल रुमचे सिस्टिम विमानतळाच्या क्षेत्रात आलेल्या छोट्या विमानाला डिटेक्ट करु शकले नाही.
नियंत्रित भागात प्रवेश देण्यासाठी ट्रान्सपोंडर्सचा प्रयोग सुरु झाला. हे इलेक्ट्रॉनिक मशिन विमानाची स्थिती आणि उड्डाणाची उंचीचे तपशील देते.
असा हा इतिहास.
मानवी चुकांचा…मोठी किंमत मोजून शिकलेल्या धड्यांचा…
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
khup chaan