हे ५ पदार्थ तुमचं सुटलेलं पोट कमी करण्यात मदत करतील..!

===

===

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आपण आणि आपली मित्रमंडळी चित्रपटातील सलमान, शाहरुख, ह्रितिकची बॉडी आणि सिक्स पॅक अॅब्स पाहून भारावून जातो, त्यासारखे सिक्स पॅक अॅब्स आपले देखील असावेत, असे आपल्याला नेहमी वाटत असते. त्यासाठी आपण जिममध्ये जाऊन खूप वेळ व्यायाम करतो, पण हे सर्वकाही केल्यानंतर देखील आपले काही सिक्स पॅक अॅब्स बनत नाहीत, त्याएवजी आपले पोट आणखी सुटत जाते. पोट सुटल्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मग तुम्ही विचार करता की, मी सर्व काही करून देखील माझे पोट का सुटले ? आज तुमच्या याच प्रश्नावर आम्ही काही उपाय घेऊन आलो आहोत.

InMarathi Android App
bloated-belly-InMarathi
liverdoctor.com

तुम्ही खूप व्यायाम करून देखील तुमचे पोट सुटत, कारण तुम्ही योग्य पदार्थ खात नाहीत. आज आम्ही तुम्हाला यावर काय उपाय करावे किंवा असे होण्यापासून कसे थांबवावे, हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया या उपायांबद्दल…

१. दही

===
===

 

curd-InMarathi
hindustantimes.com

सर्वच डेअरी उत्पादनांमुळे गॅस निर्माण होतोच असे नाही. चीज आणि दुध आपले पोट सुटणे थांबवू शकते. पण दही विशेषतः ग्रीक योगर्ट (दह्याचा एक प्रकार) आपल्याला या समस्येमधून बाहेर पडण्यासाठी मदत करू शकतो. याचे कारण असे की, दही हे चांगले जीवाणू (Good Bacteria) तयार करतात, ज्यामुळे आपल्या आतड्यांमधील अन्नप्रक्रिया चांगल्याप्रकारे होते आणि त्यामुळे सुटलेले पोट कमी होण्यास मदत होते. प्रोबायोटिक दह्याचे सेवन केल्याने आतड्यांमधील बॅक्टेरियाचे निरोगी संतुलन ठेवण्यास मदत होते.

२. काकडी (पाण्याची मात्र जास्त असलेल्या भाज्या आणि फळे)

 

Reduce-Bloated-Tummy.Inmarathi1
healthline.com

जास्त प्रमाणात पाणी पिल्याने आणि जास्त पाणी असलेल्या भाज्या किंवा फळे खाल्ल्याने तुम्ही तुमचे सुटलेले पोट कमी करू शकता. काकडी हे तुमचे पोट साफ करण्यासाठी उत्तम आहे. काकडी, टरबूज, द्राक्षे आणि अननस यांच्या मदतीने फुगलेले पोट तुम्ही कमी करू शकता. अननसमध्ये पोटॅशियम असते, ते पोटातील पाणी संतुलित करते. त्यामुळे पोट कमी करण्यासाठी अननस आवर्जून खाल्ले पाहिजे.

३. आलं

 

Reduce Bloated Tummy.Inmarathi2
ridgetimes.co.za

पोटाच्या दुखण्यावर आलं हे एक रामबाण उपाय आहे. आलं आपल्या शरीरासाठी खूप गरजेचे आहे. आल्याचे चमत्कारिक आणि आरोग्यमय फायदे आहेत. त्यातलाच एक फायदा म्हणजे हा फुगलेले पोट कमी करण्यात मदत करतो. आलं हे आतड्यांना साफ करण्याचे काम करते आणि यामुळे पचनक्रिया चांगली राहते.

४. केळी

 

Reduce Bloated Tummy.Inmarathi3
medicalnewstoday.com

केळी ही आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी आहेत. केळीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते आणि त्याचबरोबर आळशी माणसांना देखील केळी आवडतात. त्यामुळे केळी खायला आवडणार नाहीत, असे कोणतेही कारण नाही आहे. पण कधीही पूर्णतः पिकलेली खेळीच खावीत, कारण कच्चे केळे खालल्याने गॅस होतो. केळी जर तुम्ही योग्य त्या प्रमाणात खाल्लात, तर तुम्ही तुमचे सुटलेले पोट आटोक्यामध्ये आणू शकता.

===
===

५. ओट्स

 

Reduce Bloated Tummy.Inmarathi4
natureloc.com

ओट्समध्ये विद्रव्य फायबरचे प्रमाण जास्त असल्याने हा एक स्वादिष्ट नाश्त्याचा प्रकार आहे. ओट्स हे गॅस आणि बद्धकोष्ठतेसाठी उपयोगी आहे. ओट्समुळे बद्धकोष्ठता टाळता येत असल्याने, तुमचे पोट सुटत नाही. विद्रव्य फायबरचे इतर स्त्रोत हे सफरचंद, पेर आणि स्ट्रॉबेरी हे आहेत.

वरील सर्व खाद्यपदार्थ तुमच्या अस्वस्थ भावनांना दूर करण्यास मदत करेल. या पदार्थांचे योग्यरीत्या सेवन केल्याने तुम्ही फिट राहू शकता आणि तुमचे सुटलेले पोट कमी करू शकता.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *