'भारतातील एक गाव जेथे दरवर्षी पक्षी करतात आत्महत्या!

भारतातील एक गाव जेथे दरवर्षी पक्षी करतात आत्महत्या!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

एखाद्या माणसाने आत्महत्या करणं ही तशी सामान्य गोष्ट! माणसाच्या आत्महत्येमागे अनेक कारणे असू शकतात. कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, वैयक्तिक इत्यादी. तुम्हाला काय वाटत पक्ष्यांना देखील अश्या समस्या असतील का? त्याना देखील वाटत असेल का, आपण देखील आत्महत्या करावी म्हणजे आपल्या मागे लागलेल्या समस्यांचा देखील कायमचा निकाल लागेल? तुम्ही म्हणाल वेड वगैरे लागलाय का? मुळात पक्षी आत्महत्या करतीलच का?

तुमचे हा प्रश्न देखील बरोबर आहेत म्हणा, पण एक असं ठिकाण आहे जेथे पक्षी आत्महत्या करतात, बरं एकट्या दुकट्याने आत्महत्या करत नाही तर सामुहिक आत्महत्या करतात आणि हे ठिकाण आपल्या भारतातच आहे हे विशेष!

 

bird-sucide-jatinga-marathipizza01

स्रोत

आसाम राज्यात दिमा हसाओ जिल्ह्यात जातिंगा नावाच एक गाव आहे. येथील कछार नावाच्या दरीमध्ये स्वत:ला झोकून देऊन पक्षी सामुहिक आत्महत्या करतात, या विलक्षण गोष्टीमुळे हे गाव जगभरात चर्चेत आहे. पक्ष्यांच्या स्थलांतराच्या काळात अनेक पक्षी येथे येतात, पण त्यातील अतिशय कमी पक्षी पुन्हा आपल्या घरट्यात परततात. एक गोष्ट मात्र आवर्जून विचार करण्यासारखी आहे ती म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोंबर या दोन महिन्यांच्या काळात अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत पक्षी उडायचे थांबतात.

ते स्वत:चे पंख फडकावत नाहीत आणि प्रकाशाच्या दिशेने स्वत:ला खाली झोकून देतात. जणू ते स्वत:वरचा ताबा हरवून बसतात आणि एखाद्या वस्तूला धडकून खाली पडतात आणि त्यांचा मृत्यू होतो.

 

bird-sucide-jatinga-marathipizza02

स्रोत

गेल्या १०० वर्षांपासून न चुकता दरवर्षी ही घटना घडते. या आत्महत्येमध्ये जवळपास ४४ जातीच्या चिमण्यांचा समावेश असतो. या घटनेचा शोध लावण्यासाठी सरकारने प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ डॉ. सेन गुप्ता यांना पाचारण केलं होतं. त्यांनी केलेल्या निरीक्षणातून असा सिद्धांत मांडला की, जेव्हा धुकं पडतं आणि हवा जोरात वाहते तेव्हा येथील प्रदेशाच्या चुंबकीय स्थितीमध्ये मोठा फरक पडतो. याच कारणामुळे पक्षी विचित्र वागतात आणि प्रकाशाच्या दिशेने आकर्षित होतात. यावर त्यांनी एक उपाय सांगितला तो म्हणजे –

या काळात आग वा प्रकाश टाळला पाहिजे, जेणेकरून पक्षी त्या दिशेने येणार नाहीत.

त्यांनी सांगितलेल्या या उपायामुळे पक्षांच्या आत्महत्येमध्ये ४० टक्क्यांनी घट दिसून आली आहे.

 

bird-sucide-jatinga-marathipizza03

स्रोत

पण अजूनही न थांबलेल्या पक्ष्यांच्या आत्महत्येचं नेमकं कोडं गुलदस्त्यातच आहे !

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?