' पत्नी आणि मुलाला संपवून स्वतः आत्महत्या करणारा WWE स्टार ख्रिस बेनवॉ: भाग २ – InMarathi

पत्नी आणि मुलाला संपवून स्वतः आत्महत्या करणारा WWE स्टार ख्रिस बेनवॉ: भाग २

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : स्वप्नील खेरडेकर

===

या लेखमालेच्या पहिल्या भागात आपण ख्रिस बेनवॉ कोण होता आणि त्याविषयी इतर माहिती आपण जाणून घेतली, त्या लेखाची लिंक पुढे देत आहोत, ज्यांचा पहिला भाग वाचायचा राहिला असेल त्यांनी खालच्या लिंकवर क्लिक करून पहिला भाग अवश्य वाचावा!

(पहिल्या भागाची लिंक : ज्याच्या मृत्यूमुळे रेसलिंग विश्वच ढवळून निघालं; ख्रिस बेनवॉची शोकांतिका – भाग १)

===

Sometimes, truth is stranger than fiction असं म्हणतात आणि ते खरं देखील ठरतं.

२३ जून, २००७ (WWE Vengeance – Night of Champions च्या एक दिवस आधी) :

ह्या रात्री टेक्सासला WWE चा हाउस शो होता. दुपारी सुमारे ४ च्या आसपास बेनवॉचा मित्र आणि एडी गरेरोचा नातेवाईक चावो गरेरोला बेनवॉने फोन केला आणि कळवलं की त्याची पत्नी नॅन्सी आणि मुलगा डॅनिएल ह्या दोघांनाही Food Poisoning मुळे रक्ताच्या उलट्या होत आहेत. चावोसुद्धा त्यावेळी WWE सोबत काम करत होता. बेनवॉ त्या हाउस शो ला येऊ शकला नाही.

२४ जून, २००७ (WWE Vengeance – Night of Champions च्या काही तास आधी) :

पहाटे ४ च्या सुमारास ख्रिस बेनवॉ आणि त्याची पत्नी नॅन्सीच्या मोबाइलवरून वेगवेगळ्या क्रमांकावर टेक्स्ट messages पाठवले गेले. यात त्यांच्या घराचा पत्ता आणि एका message मध्ये त्यांच्या कुत्र्यांचा उल्लेख होता.

नंतर बेनवॉने WWE ला फोन करून कळवलं की त्याचा मुलगा डॅनिएल ह्याला उलट्या होत असुन तो आणि त्याची पत्नी मुलासोबत हॉस्पीटलला आहेत. पुढलं विमान पकडुन WWE Vengeance – Night of Champions करता वेळेत पोहोचत असल्याचं देखील त्याने सांगितलं.

 

chrish and nancy inmarathi

 

मात्र तरीदेखील बेनवॉ न पोहोचल्याने ऐनवेळी जॉनी नायट्रोला बेनवॉ ऐवजी रिप्लेस करण्यात आलं आणि त्याने ECW टायटल जिंकलं.

मात्र, दोन दिवस आधीच म्हणजे २२ जूनला नॅन्सी बेनवॉचा खून करण्यात आला होता! नंतर त्यांचा मुलगा डॅनिएल ह्याचाही खून झाल्याचं आढळून आलं.

(नॅन्सी ही बेनवॉची दुसरी पत्नी होती आणि तिच्यापासून त्याला डॅनिएल हा मुलगा होता. बेनवॉ हा नॅन्सीचा तिसरा पती होता.)

२५ जून, २००७ (WWE Vengeance – Night of Champions नंतरचा दुसरा दिवस) :

बेनवॉ परिवाराकडून आलेले टेक्स्ट messages, बेनवॉची अनुपस्थिति आणि फोन कॉल्सना न मिळणारा प्रतिसाद ह्यामुळे शेवटी पोलीसांना कळवण्यात आलं. दुपारी ४.१५ च्या सुमारास पोलीसांनी ३ डेड बॉडीज मिळाल्याचं जाहीर केलं.

WWE ने त्या रात्रीचा Raw Live शो रद्द केला आणि त्याऐवजी बेनवॉच्या करिअरवर स्पेशल कार्यक्रम प्रसारित केला.

 

chris-benoit-03-marathipizzaa

 

मात्र कार्यक्रम संपेपर्यंत पोलीसांच्या प्राथमिक तपासात काही तथ्य बाहेर आली होती आणि त्यावरून निघणारे निष्कर्ष केवळ भयानक होते.

पोलीसांच्या तपासानुसार २२ तारखेला बेनवॉने स्वत: आधी नॅन्सीचा गळा आवळून खून केला. तिचं प्रेत पाय बांधलेल्या, कापडात गुंडाळलेल्या अवस्थेत सापडलं आणि जवळ बायबलची एक प्रत ठेवलेली आढळली.

७ वर्षांच्या डॅनिएलचा मृतदेहदेखील घरातच सापडला. त्याचासुद्धा गळा आवळण्यात आला होता आणि त्याच्या देखील मृतदेहाजवळ बायबलची एक प्रत सापडली. त्याचासुद्धा खून ख्रिसनेच केला असावा असं प्राथमिक तपासात दिसत होतं. मात्र सगळ्यात भयानक काही असेल तर त्याला मारण्यासाठी वापरलेली पद्धत.

 

chris and his family inmarathi

 

रिपोर्ट्सनुसार बेनवॉने तो रिंग मध्ये फाईट दरम्यान प्रतिस्पर्धी प्रोरेसलर्स विरुद्ध वापरल्या जाणारी Crippler Crossface ही सबमिशन मुव्ह वापरून आपल्याच मुलाचा खून केला होता.

स्वत: बेनवॉचा मृतदेह त्याच्या घरातल्या जीममध्ये आढळला. त्याने weight lifting machine ला स्वत:ला लटकावून गळफास घेतला होता. त्या मशीनवर देखील पोलिसांना बायबलची एक प्रत सापडली.

===

हे सगळे डीटेल्स बाहेर आल्यानंतर WWE ने बेनवॉचा उल्लेख टाळण्याचा निर्णय घेतला. मंगळवार, २६ जूनच्या WWE ECW शो पूर्वी WWE चेयरमन व्हिंस मिकमॅन ह्यांनी एक स्टेटमेंट देत आपला हा निर्णय सगळ्यांना कळवला.

 

wince inmarathi

(क्रमशः)

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?