' कॅथोलिक चर्चचा धर्म नावाचा धंदा!

कॅथोलिक चर्चचा धर्म नावाचा धंदा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक : विनय जोशी 

===

झारखंडचा कॅथोलिक फादर इमान्युएल वाखाला याने कॅथोलिक संस्थेला मिळालेल्या सरकारी मदतीच्या पैशातील ७ कोटी २५ लाख रुपये वैयक्तिक म्युचुअल फंडात गुंतवले.

फादर इमान्युएल वाखाला यांनी छोटा नागपुर कॅथोलिक मिशन को-ऑपरेटिव सोसाइटीच्या अकाऊंटमधुन स्वतःच्या पंजाब बँकेच्या खात्यात १ कोटीची एफ.डी. केली.

याच फादर इमान्युएल वाखालाने छोटा नागपुर कॅथोलिक मिशन को-ऑपरेटिव सोसाइटीच्या अकाऊंटमधुन त्याचा बॉस असलेल्या आर्चबिशप टोप्पो याच्या वैयक्तिक बँक खात्यात २ कोटी टाकले.

या बातम्या तुम्ही पूर्वी वाचल्या असतील.

 

Fraud-church-inmarathi

 

पण हे घोटाळे काहीच नाहीत असा हा घोटाळा बघा….

झारखंड अनुसुचित जातींची (ट्रायबल) मोठी लोकसंख्या असलेलं राज्य आहे आणि राज्यघटनेने पाचव्या शेड्युल अंतर्गत ट्रायबल बांधवांना विशेष संरक्षण दिलेलं आहे.

संविधानाच्या पाचव्या शेड्युलमुळे ट्रायबल गावांमधील जमीन अन्य कुणालाही विकत घेता येत नाही; याचा उद्देश असा की वनवासी बांधव बाहेरून आलेल्या संपन्न लोकांमुळे भूमिहीन होऊ नयेत.

झारखंड मध्ये वनवासी बांधवांच्या जमिनीचं हस्तांतरण अन्य कुणाकडे होऊ नये म्हणुन दोन कायदे आहेत. छोटा नागपुर टेनेंसी एक्ट आणि संथाल परगना टेनेंसी एक्ट.

पण या दोन्ही कायद्यांना धाब्यावर बसवुन कॅथोलिक चर्चने २५,००० एकर जमीन आपल्या घशात घालुन घेतली होती. यासाठी लागणारा पैसा FCRA निधी, राज्य आणि केंद्र सरकारचे समाज कल्याण निधी यातुन गैर मार्गाने वळवलेला होता.

 

Catholic_Church-inmarathi

 

तत्कालीन मुख्यमंत्री रघुवर दास यांनी याची चौकशी सुरु केल्यावर मिशनरी थयथयाट करू लागले. त्यातंच खालील दोन घटनांची भर पडली.

राज्यात एकापाठोपाठ एक कॅथोलिक घोटाळे बाहेर आल्यामुळे कॅथोलिक चर्च मध्ये घबराट पसरली. मदर तेरेसाच्या मिशनरीज ऑफ चारीटीजच्या दोन नन्सनी त्यांच्या अनाथाश्रमातील काही बाळे विकल्याने पहिलं वादळ आलं आणि खुंटी सामुहिक बलात्कारात एका कॅथोलिक फादर पोलिसांनी अटक केल्याने अजून एक वादळ!

राज्याच्या गुन्हे शाखेने (सी.आय.डी.), कॅथोलिक चर्चला लोकोपयोगी कामांसाठी मिळालेल्या पैशाचा नेमका कसा उपयोग केला याचा शोध घ्यायला सुरुवात केल्याने कॅथोलिक नेतृत्वाने आरडओरडा सुरु केला होता.

 

father-church-inmarathi
catholic-linc.com

 

“आमच्याकडे सगळा हिशोब आहे, आम्ही कुठेही पैसा खाल्लेला नाही, आम्ही साफ आहोत, आम्ही सगळा हिशोब दाखवू शकतो” अशी पालुपदं त्यांनी सुरु ठेवली होती. चर्च यापलीकडे जाताना दिसलेच नाही. सी.आय.डी.च्या एकाही प्रश्नाचं उत्तर कॅथोलिक चर्च देऊ शकलं नाही.

शेवटी कागदपत्रे मिळवण्यासाठी पोलिसांनी छापेमारी सुरु केली. या कारवाईनंतर चर्चमध्ये जबरदस्त खळबळ उडाली. वर उल्लेख केलेले सुमारे १० कोटीचे घोटाळे फक्त छोटा नागपुर कॅथोलिक मिशन को-ऑपरेटिव सोसाइटी या एका संस्थेमधील आहेत.

पोलिसांनी अशा ८८ संस्थांच्या २८३ कोटीच्या पैशाचा हिशोब लावण्यासाठी आधी त्या संस्थांना लिखित स्वरुपात प्रश्न विचारले होते आणि त्याची उत्तरे न मिळाल्याने हे छापे टाकले गेले होते.

कल्पना करा ही स्थिती एका राज्यातील आहे…. संपुर्ण देशातल्या कॅथोलिक चर्चने आत्तापर्यंत, म्हणजे जवळपास गेल्या ७० वर्षात किती पैसा खाऊन पचवला असेल!

 

church-offertory-inmarathi

 

ह्याच कॅथोलिक चर्चच्या ३ आर्चबिशप्सनी हिंदुत्ववादी संघटना आणि भाजपच्या विरोधात बोंबाबोंब केली होती. आणि त्यात मुख्य आरोप असा करण्यात आला की, हिंदुत्ववादी दलित- ट्रायबल यांचे अधिकार हिरावून घेऊ इच्छितात आणि भारतीय संविधान पायदळी तुडवू इच्छितात.

जे कॅथोलिक चर्च संविधानाने पाचव्या शेड्युल अंतर्गत वनवासी लोकांना दिलेले जमिनीचे अधिकार फाट्यावर मारून त्यांच्या जमिनी बळकावतात त्यांना संविधानाचा पुळका कशाबद्दल?

तर या पुळक्यामागचं खरं कारण कॅथोलिक चर्चचं संविधानाबद्दल प्रेम नसुन हिंदुत्ववादी संघटनांमुळे त्यांच्या “पैसे खाण्याच्या” मुलभूत अधिकारावर आणलेली गदा हेच आहे!

तो अधिकार भाजप शासित राज्यांनी चर्चला दिला आणि संघवाले यांच्या “कन्वर्शन फॅक्टरीज” बद्दल बोलायचे बंद झाले की चर्च त्यांच्याबद्दलही काहीही बोलणार नाही!

बरोबर?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com  त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. |आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “कॅथोलिक चर्चचा धर्म नावाचा धंदा!

  • September 15, 2018 at 5:39 pm
    Permalink

    Detail information not shared in this article.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?