' अफजल गुरू आणि टायगर मेमन प्रेमींना हा मराठी माणूस माहिती असायला हवा! – InMarathi

अफजल गुरू आणि टायगर मेमन प्रेमींना हा मराठी माणूस माहिती असायला हवा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्याकडे अतिरेक्यांना लक्षात ठेवले जाते, त्यांच्या अंतयात्रेत काही लोक सहभागी होतात. पण देशासाठी योगदान देणार्‍यांना मात्र उपेक्षा सहन करावी लागते. मकबूल बट्ट तुमच्या लक्षात असेलच… पण रविंद्र म्हात्रे हे नाव तुम्हाला आठवतंय का?

होय रविंद्र म्हात्रे हे भारताचे खरेखुरे हिरो आहेत, ज्यांनी देशासाठी बलिदान दिले आहे.

पुण्यामध्ये रविंद्र म्हात्रे यांच्या नावाने एक पुल सुद्धा बनवण्यात आलेला आहे.

कोण होते रविंद्र म्हात्रे? त्यांनी देशासाठी कशाप्रकारे बलिदान दिले? मकबूल बट्ट आणि रविंद्र यांचे संबंध काय होते?

 

RavindraMhatre-inmarathi

 

ही त्यावेळची गोष्ट आहे जेव्हा मकबूल बट्ट शिक्षणासाठी काश्मिरमधून पाकिस्तानात गेला. तो तिथे स्थानिक वर्तमानपत्रात पत्रकार म्हणून नोकरी सुद्धा करु लागला होता.

नंतर तो ब्रिटनच्या बर्मिंघम शहरात गेला. जिथे त्याने जम्मू काश्मिर लिबरल फ्रंटची स्थापना केली.

जेव्हा तो पुन्हा काश्मिरमध्ये परतला तेव्हा येताच तो वेगळे काश्मिर मागू लागला. १९६६ मध्ये जम्मू काश्मिर लिबरल फ्रंटच्या आतंकवाद्यांची सुरक्षा दलासोबत चकमक झाली.

या चकमकीत मकबूलचा आतंकवादी सहकारी औरंगझेब मारला गेला. दुःखद घटना अशी घडली की या चकमकीत क्राईम ब्रांच ऑफिसर अमर चंद हुतात्मा झाले.

पोलिसांनी अमर चंद यांची हत्या केल्याच्या आरोपाखाली मकबूल आणि काला खानला अटक केली. मकबूलवर शत्रूचा एजेंट असल्याचा आरोप लावण्यात आला आणि पुढे हा आरोप सिद्ध होऊन त्याला फासावर लटकवण्यात आले.

कोर्टामध्ये मकबूल निर्लज्जपणे म्हणाला की “माझ्यावर केलेल्या आरोपांचा स्वीकार करण्यात मला जराही संकोच वाटत नाही.”

माझ्याकडे लक्ष देऊन पाहा, मी तुमचा शत्रू आहे” त्याला शिक्षा तर झाली.

 

RavindraMhatre-inmarathi01

 

पण १९६८ मध्ये श्रीनगरमध्ये कैदेत असताना आपल्या दोन साथीदारांसोबत सुरुंग बनवून तो निसटला. तपास केल्यावर कळलं की तो पाकिस्तानमध्ये जाऊन लपला आहे.

१९७१ साली इंडियन एअरलाइंस फोक्कर F27 फ्रेंडशिप एअरक्राफ्ट ’गंगा’चं अपहरण करण्यात आलं.

काश्मिरी अतिरेकी हाशिम कुरेशी आणि अशरफ बट्ट गंगाला हायजॅक करुन लाहोरला घेऊन गेले.

अतिरेक्यांनी पॅसेंजर आणि क्रू मेंबर्सना बाहेर काढून विमान जाळून टाकलं. सुरक्षा एजेंसींच्यामते मकबूल या अपहरणाचा मास्टरमाईंड होता.

भारताने पाकला मकबूलला अरेस्ट करण्यास सांगितले. पाकने त्याला अटक तर केली पण भारताला सोपवण्यास नकार दिला.

नंतर मकबूलला पाकने सोडून दिले. काही काळानंतर मकबूल पाकमधून भारतात आला. गुप्त विभागाच्या सतर्कतेमुळे मकबूलला भारतात अटक झाली. कोर्टाने मकबूलला फाशीची शिक्षा सुनावली.

 

RavindraMhatre-inmarathi02

 

मकबूलने राष्ट्रपती ज्ञानी जैल सिंह यांच्याकडे दया याचिका पाठवली. एकीकडे मकबूलचे भारतातील समर्थक कायदेशीर लढाई लढत होते, तर त्याच्या आतंकवादी साथींनी भारतावर दबाव आणण्यासाठी ब्रिटनच्या बर्मिंघममध्ये भारतीय राजनीतिज्ञ रविंद्र हरेश्वर म्हात्रे यांचे अपहरण केले.

या बदल्यात त्यांनी मकबूलला सोडण्याची मागणी केली.

ही १९८४ ची घटना आहे. जम्मू काश्मिर लिबरल फ्रंटने या अपहरणाची जबाबदारी स्वीकारली.

अर्थात त्यांची मागणी स्वीकारली गेली नाही. ३ फेब्रुवारी १९८४ मध्ये जेव्हा रविंद्र म्हात्रेंचे अपहरण करण्यात आले तेव्हा त्यांच्या मुलीचा १४ वा वाढदिवस होता.

ते दुकानातून केक घेऊन घरी जात होते तेव्हाच त्यांचे अपहरण झाले. मकबूल बट्टला सोडा अन्यथा रविंद्र म्हात्रेंना मारुन टाकू अशी धमकी देण्यात आली.

पण इंदिरा गांधींनी ठरवलं होतं की कोणत्याही शर्तीवर मकबूलला सोडायचं नाही.

 

RavindraMhatre-inmarathi03

 

राष्ट्र सर्वप्रथम हा न्याय पाळत त्यांनी मकबूलला न सोडण्याचा कठोर निर्णय घेतला आणि तीन दिवसांनंतर हायवेच्या बाजूला रविंद्र म्हात्रेचं मृत शरीर आढळलं.

११ फेब्रुवारी १९८४ साली दिल्लीच्या तिहार जेलमध्ये मकबूलला फाशी देण्यात आली. त्याचं प्रेत जेलमध्ये दफ़न करण्यात आलं.

महत्वाचं म्हणजे मकबूल हा कुणी अशिक्षित नव्हता. तर त्याने हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्सचे शिक्षण घेतले होते.

उच्च शिक्षित असूनही तो अतिरेकी झाला होता. जेएनयूमध्ये अफझल आणि मकबूलच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या जातात. काही विघ्नसंतोषी लोकांना मकबूल अजूनही आठवतो.

पण ज्या रविंद्र म्हात्रेंनी देशासाठी बलीदान दिले ते आपल्याला आठवत नाहीत.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?