' इंटरनेटमुळे निर्माण होणाऱ्या “कुकी” फाइल्समुळे नेमकं काय होतं? – InMarathi

इंटरनेटमुळे निर्माण होणाऱ्या “कुकी” फाइल्समुळे नेमकं काय होतं?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

भारतात आता अनेक जण इंटरनेटचा वापर करतात. पूर्वी वयस्क लोकांना इंटरनेट वापरताना त्रास व्हायचा. पण आताची पिढी मात्र इंटरनेटशी परिचित आहे.

आता इंटरनेट केवळ काम करणार्‍यांचं माध्यम राहिलं नसून वेळ घालवण्याचं आणि मनोरंजनाचं माध्यम सुद्धा झालं आहे.

“शस्त्र पाप ना स्वयेंचि, शस्त्र पुण्य ना स्वयें”, याप्रमाणे इंटरनेट सुद्धा ते कोण वापरतंय यावर त्याचे चांगले वाईट गुण ठरतात.

आता लोक केवळ इंटरनेटचा वापर करत नसून त्या बाबतीत अधिकाधिक माहिती सुद्धा मिळवत आहेत.

 

internet inmarathi

 

लोकांना वेगवेगळी माहिती वाचायला आवडते. इंटनेटची व्याप्ती खूप मोठी आहे.

ह्या व्याप्तीत अनेक अज्ञात गोष्टी देखील आहेत, ज्या आपल्या इंटरनेटच्या वापरात दिसत, कळत नाहीत – पण आपला इंटरनेट वरील वावर कसा असेल हे ठरवत असतात.

तुम्ही इंटरनेट वापरता, मग तुम्ही कुकीज फाईल्स पाहिल्या असतीलच.

पण कुकीज म्हणजे नेमकं काय? त्याचे काय फायदे किंवा तोटे आहेत, हे माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही हे जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केला आहे का?

चला तर मग…आपण कुकीजबद्दल जाणून घेऊया.

 

cookies inmarathi

 

आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये अनेक फाईल्स असतात. त्यात कुकीज फाईल्स सुद्धा असतात. आपल्या कंप्युटरच्या हार्ड ड्राईव्हमध्ये एक सामान्य टेक्स्ट फाईल्स म्हणजे कुकीज फाईल्स.

या फाईल्स इंटरनेटद्वारे आपोआप सेव्ह होतात. जेव्हा जेव्हा आपण एखादी वेबसाईट ओपन करतो, तेव्हा त्याबद्दलची सर्व माहिती सेव्ह होते.

जेव्हा आपण पुन्हा वेबसाईट ओपन करतो तेव्हा त्या संबंधित कोणतेही पेज ओपन करताना सुलभता होते आणि म्हणून कमी वेळ खर्च होतो व डेटा सुद्धा शिल्लक राहतो.

हे एकप्रकारे आयडंटीफिकेशन कार्डप्रमाणे काम करते, जे ऍडव्हर्टायजिंग साइज आणि ई-कॉमर्स वेबसाईटसाठी अत्यंत गरजेचे आहे.

कारण त्यांच्या संबंधित सर्व प्रकारचे ऍड दाखवण्यासाठी हे प्रभावी ठरते.

 

internet cookies-inmarathi

 

इंटरनेट कुकीजचे प्रकार

१. सेशन कुकीज

२. परसिस्टेंट कुकीज

३. सिक्योर कुकीज

४. एचटीटीपी ऑनली कुकीज

जेव्हा आपण इंटरनेटचा वापर करतो तेव्हा ज्या कुकीज सेव्ह होतात. या सेव्ह झालेल्या कुकीजमुळे सर्वरला कळतं की तुम्हाला काय आवडतं!

तेव्हा तुम्ही काही सर्च करत असाल तर त्याच प्रकारचे रिजल्ट तुम्हाला दिसतील.

म्हणून तुमच्यासाठी जे उत्तम आहे तेच तुमच्यापर्यंत पोहोचेल यामुळे तुमचा वेळ आणि डेटा वाचतो.

समजा तुम्ही Amazon वर सर्च करता आहात. मग तुम्हाला एखाद्या विषयावरील पुस्तक विकत घ्यायचे आहे.

तुम्ही तुमच्या आवडीच्या विषयांवरील पुस्तके सर्च करत आहात आणि अचानक तुम्हाला लॅपटॉप बंद करुन दुसरीकडे जावं लागतं.

मग जेव्हा पुन्हा तुम्ही Amazon वेबसाईटवर जाता तेव्हा Amazon तुम्हाला तुमच्या पसंतीचे पुस्तक आधी दाखवेल.

 

internet cookies-inmarathi03

 

एवढंच नाही तर –

तुम्ही इतर वेबसाईटवर जात असाल तर गुगल ऍडसेंसचे जे ऍड्स असतात, त्यातही तुम्हाला पुस्तकांसंबधी जाहिराती दाखवल्या जातील. कारण ब्राऊझर तुमच्या प्रत्येक क्रियेची व वेबसाईटवर होणार्‍या क्लिकची नोंद करत असतो.

तर अश्याप्रकारे इंटरनेट कुकीज आपल्या आपल्या पसंतीच्या गोष्टी शोधायला मदत करते.

आणि हो – तुम्हाला कल्पना नसेल पण  – कुकीजमुळे आपल्याला बराच फायदा होत असतो…!

जसे की आपला वेळ आणि डेटा वाचतो.

जेव्हा आपले ब्राऊजर अचानक बंद होते, तेव्हा दुसरे ब्राऊजर ओपन करण्यासाठी त्याच पेजला रिस्टोर केले जाते.

 

browsers inmarathi

 

एखाद्या वेबसाईटवर आपण लॉग इन करत असाल तर त्याचे युजर आयडी सेव्ह करुन ठेवते. जेणेकरुन आपल्याला प्रत्येक वेळी युजर आयडी टाईप करण्याची गरज लागणार नाही.

कुकीज फाईल्सची साईज सुद्धा ४ केबीपेक्षा कमी असल्यामुळे जास्त स्पेस घेत नाही.

थोडक्यात – कुकीजचे फायदे जास्त आहेत आणि नुकसान कमी.

जर तुमचे युजर आयडी आणि पासवर्ड सेव्ह असेल आणि याबद्दलची माहिती लीक झाली तर तुमची वेबसाईट हॅक होऊ शकते.

जर तुम्ही शॉपिंग करताना आपल्या डेबिट कार्डचा आयडी व पासवर्ड सेव्ह करुन ठेवला असेल तर हॅकर्स तुमचे पैसे याद्वारे खर्च करु शकतात.

ज्यांच्या कंप्युटरमध्ये खुपच कमी स्पेस असेल तर त्यांचा कंप्युटर हळू चालू शकतो. आता तुम्ही इंटरनेट कशाप्रकारे वापरता यावर सगळं अवलंबून आहे.

 

internet cookies-inmarathi01

 

अश्या परिस्थितीत तुम्ही कुकीज ब्लॉक करु शकता.

त्यासाठी पुढील स्टेप्स वापरा :

ब्राऊझर ओपन करा. सर्वात आधी तुम्ही उजव्या हाताला वर असलेल्या मेन्यूवर क्लिक करा. त्यानंतर सेटिंग्स वर क्लिक करा. ते ओपन झाल्यावर ऍडव्हान्सवर क्लिक करा.

ऍडव्हान्समध्ये कंटेंट सेटिंगवर क्लिक करा. कंटेंट सेटिंगमध्ये कुकीजवर क्लिक करा.

कुकीजमध्ये तुम्हाला तीन ऑप्शन्स दिसतील, ते तुम्ही ऑन किंवा ऑफ करु शकता. ऑन केल्यावर कुकीजची नोंद होईल आणि ऑफ केल्यावर नोंद होणार नाही.

जर तुम्हाला कुकीज क्लियर करायची असेल तर Ctrl=H दाबून पेज ओपन होईल आणि तिथे तुम्हाला उजव्या हाताला Clear browsing data हा ऑप्शन दिले.

त्यावर क्लिक करा व ब्राऊजिंग डेटावर क्लिक करुन तुम्ही सर्व history, cookies, cache सर्व काही clear करु शकता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?