' अंतराळवीर पांढऱ्या आणि नारंगी रंगाचेच सूट्स घालण्यामागे काय कारण असावं? – InMarathi

अंतराळवीर पांढऱ्या आणि नारंगी रंगाचेच सूट्स घालण्यामागे काय कारण असावं?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आजवर अंतराळ या विषयावर कित्येक चित्रपट येऊन गेले, आणि त्यातून आपल्याला बऱ्याच नवीन गोष्टी माहीत झाल्या आणि शिकायला मिळालं! ग्रॅविटि, इंटेरस्टेलार, अपोलो १३ अशा कित्येक चित्रपटांच्या माध्यमातून आपण याविषयी काहीतरी नवीन माहिती मिळवली!

पण यापैकी एका गोष्टीकडे तुमचे लक्ष गेले आहे का?? म्हणजे स्पेस मध्ये जाऊन संशोधन करणाऱ्यांचा युनिफॉर्म तुम्ही कधी बारकाईने पाहिला आहे का हो?

 

movie on space inmarathi

 

आपण बरेचदा अंतराळवीर त्यांचा भडक केशरी स्पेस सूट घालून अंतराळयानातून जातात असे पाहतो.

आपण कधीच हा विचार करत नाही, की हा पोशाख भडक केशरी रंगाचाच का असतो? हा भडक निळ्या रंगाचा किंवा भडक लाल रंगाचा का असत नाही?

आपल्यापेक्षा हुशार अशा या समुहाचे हा रंग भडक केशरीच निवडण्यामागे काहीतरी ठोस कारण असायलाच हवे. अर्थातच ते तसे आहे देखील.

आणि तसं पहायला गेलं तर हे कारण किंवा यामागचे विज्ञान हे खूप सोपे आहे.

यातून नासा कोणत्याही प्रकारचे style statement करू इच्छित नाही तर अंतराळवीराच्या पोशाखातील इतर प्रत्येक घटकाप्रमाणे त्यांच्या सूटच्या रंगाचे तार्किक स्पष्टीकरण नासा आपल्याला देते.

 

space-suit-inmarathi

 

भडक केशरी किंवा अंतराळशास्त्रात म्हटले जात असल्याप्रमाणे इंटरनॅशनल ऑरेंज हा रंग हा most visible colour म्हणून ओळखला जातो.

या वैशिष्ट्यामुळे जर अंतराळवीरांना शोधण्यास शोधमोहीम हाती घ्यायची झाली तर या रंगाच्या पोशाख घातल्याने अंतराळवीरांना शोधणे सोपे जाते.

शोधमोहिमेमध्ये अंतराळवीरांना लवकरात लवकर ओळखणे हे गरजेचे असते. कारण त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न असतो.

 

space-suit-inmarathi01

 

हा सूट pressurized shell ने युक्त असा असतो. त्यामुळे हा अंतराळवीरांना landing किंवा take off च्या वेळी होणाऱ्या अंतराळयानाच्या अपघातापासून वाचवू शकतो.

ACES म्हणजेच Advanced Crew Escape Suit. यामध्ये पाण्याचा आणि हवेचा विशिष्ट प्रमाणात पुरवठा केलेला असतो.

पोशाखात आणीबाणीच्या परिस्थितीत वापरण्यासाठी हवाईछत्रीचीही सोय असते. पृथ्वीवर आपल्याला ज्या तापमान व हवेच्या दाबाची सवय झालेली असते, त्याच प्रकारची हवा पोशाखात भरली जाते.

या पोशाखाला इवलेसे जरी भोक पडले तरी माणसाचा जीव धोक्यात येऊ शकतो. मोकळ्या अंतराळात या पोशाखाशिवाय १५ सेकंदांत माणसाला मृत्यू येईल.

अंतराळवीर हे उड्डाणाच्या वेळी (व परत येताना) हे पोशाख घालतात, परंतु एकदा यान कक्षेत पोहोचले की त्यांना दुसरे कपडे घालता येतात. यानाच्या आतमध्ये हवा आणि तापमान नियंत्रित केलेले असते.

याशिवाय एका विशिष्ट सूटची व्यवस्था अंतराळवीराच्या यानातील कपाटामध्ये करून ठेवलेली असते. हा पोशाख ते spacewalk आणि Extravehicular Activities (EVAs) साठी वापरतात.

हे पांढरे पोशाख हे अंतराळवीर खासकरून अंतराळात तग धरू शकावेत या दृष्टीने बनविलेले असतात. काळ्याकुट्ट पोकळीमध्ये अंतराळवीरांचा माग घ्यायचा असेल तर या पांढऱ्याशुभ्र पोशाखाची मदत होते.

अवकाशात वापरल्या जाणाऱ्या विशेष प्रकारे बनवलेल्या कपड्यांना अंतराळ पोशाख असे म्हणतात. अंतराळात अंतराळवीरांना पृथ्वीवरील वातावरणासारखे वातावरण पुरवितो.

हे गणवेश अंतराळात जिवंत राहण्यासाठी प्राणवायूचा पुरवठा होईल, तसेच मलनिस्सारणाची सोय होईल हे ध्यानात ठेऊन बनवलेले असतात.

या कपड्यात हालचाली करणे अवघड असले तरी त्यातून अंतराळ यानाबाहेर यात्रा करताना कार्यरत राहता येते. यानाच्या दुरुस्तीसाठी यानाबाहेर अंतराळ यात्रेला जाताना हा पोशाख अत्यावश्यक असतो.

 

space-suit-inmarathi03

 

अंतराळवीरांच्या पोशाखात सुमारे ७ स्तर असतात. हे स्तर अंतराळवीरांचे अवकाशातील धोक्यांपासून संरक्षण करतात.

त्वचेलगत पाण्यामुळे थंड राहणाऱ्या वस्त्रांचा थर असतो ज्यामुळे उष्णतेपासून बचाव होतो. वरचा थर मजबूत असा दाब नियंत्रित करणारा असतो. यातून प्राणवायूचा पुरवठा होत असतो.

या सगळ्यावर बाह्य स्तर आणि डोक्यावर शिरस्त्राण.

 

space inmarathi 2

 

हे सर्व अंतराळातील घातक वस्तू व उत्सर्जनापासून रक्षण करतात. हा पोशाख अंतराळवीराचे सूर्याच्या अतिनील किरणांपासून बचाव करतो.

तसेच अंतराळातील हवेच्या शून्य दाबापासून शरीराला इजा पोहोचणार नाही याची काळजी घेतो. शिवाय पोशाख पांढरा असल्यामुळे तो सूर्याची अतिरिक्त उष्णता परावर्तित करतो.

 

space suit inmarathi

 

हे EVA सूट ACES सूट्सपेक्षा जास्त जड असतात. यामध्ये तापमान नियंत्रणाची विशिष्ट यंत्रणा असते. श्वासोच्छवासासाठी उपयुक्त अशा प्राणवायूयुक्त हवेची सोय असते. शिवाय स्वच्छ पाण्याचा साठा केलेला असतो.

रशियामध्ये त्यांचे orlan suits हे स्वदेशी बनावटीचे स्पेस सूट्स आहेत. चीनमध्ये सुद्धा राशियासारख्या डिझाईनचे स्वदेशी सूट बनविले जातात.

तर हे आहे अंतराळात जाताना अंतराळवीर घालत असलेल्या पांढऱ्या आणि नारंगी रंगाचेच सूट्समागचं लॉजिक!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?