' दोन्ही हात जोडून “सलाम” : मंगेश पाडगावकरांना विनम्र श्रद्धांजली – InMarathi

दोन्ही हात जोडून “सलाम” : मंगेश पाडगावकरांना विनम्र श्रद्धांजली

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

संपूर्ण महाराष्ट्राचे जीव की प्राण असणाऱ्या कविवर्य मंगेश पाडगावकर यांचा आज स्मृतिदिन! ३० डिसेंबर २०१६ रोजी वयाच्या ८६ वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.

१० मार्च १९२९ रोजी वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) इथे जन्मलेल्या मंगेश पाडगावकरांनी मुंबई विद्यापीठातून मराठी आणि संस्कृत ह्या विषयांवर MA पदवी मिळवली होती. १९६० ते ७० च्या दरम्यात विंदा करंदीकर आणि वसंत बापट ह्यांच्याबरोबर अनेक काव्य वाचनात त्यांनी भाग घेतला होता. अनेक चित्रपटांसाठी गीतं लिहिलेल्या पाडगावकरांची “या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे”, “भातुकलीच्या खेळामधली”, “शुक्रतारा मंद वारा” ही अरुण दातेंनी गेलेली गाणी घराघरात ऐकली आणि गायली जातात.

पाडगावकरांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांना १९५३  आणि १९५५ सालचा महाराष्ट्र शासन पुरस्कार देखील मिळाला होता. ‘सलाम’ ह्या कवितासंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार (१९८०) मिळाला होता. २००८ साली त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने आणि २०१३ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

पाडगावकरांच्या आठवणी…त्यांच्या कविता…त्यांच्याच आवाजात…त्यांच्या काव्यवाचनात…

त्यांच्या “प्रेमाने” – तुमचं काय गेलं?

 

आय आय टी मुंबई मधलं काव्य वाचन, सहा भागात:

 

 

 

 

 

महाराष्ट्राच्या ह्या लाडक्या कविवर्याला मनापासून  ‘सलाम’…

 

Featured image source: Economic Times

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Omkar Dabhadkar

Founder@ इनमराठी.कॉम

omkar has 167 posts and counting.See all posts by omkar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?