' महाग दारू जास्त 'चढते' कि स्वस्त दारू? वाचा, विज्ञान काय म्हणतं!

महाग दारू जास्त ‘चढते’ कि स्वस्त दारू? वाचा, विज्ञान काय म्हणतं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

वीकएंड पार्टी असो की ३१ डिसेंबरचा नवीन वर्षाचा जलसा असो कमीअधिक प्रमाणात दारू (सभ्य भाषेत बूझ म्हणूयात) पिऊन मजा करणे हा त्याचा अविभाज्य भाग झालेला आहे.

पब, डिस्को किंवा मोठमोठे स्टार हॉटेल्समध्ये ऊंची मद्य हे त्यांच्या श्रीमंतीचं लक्षण असतं आणि ती चार चौघांनी घेणं म्हणजे स्टेटसच लक्षण.

 

pub disco inmarathi

 

तशी दारू घेतली की चढतेच असं नाही किंवा काही जणांना ती खूपच चढूही शकते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर डोकं गरगरणे मळमळणे असे परिणाम भोगावे लागतात.

ही चढलेली दारू उतरवायला जालीम उपाय ही करावे लागतात. ह्यालाच हँगोवर सुद्धा म्हणतात.

 

wine-inmarathi

 

हॉलिवूड चा ‘द हँगोवर’ सिनेमा पाहिलाय का कधी? सिनेमाच्या सुरुवातीला एक मित्राच्या लग्नाच्या बॅचलर पार्टीसाठी जमलेल्या मित्रांपैकी त्याच लग्न आहे तो तर चक्क गायब झाला आहे.

बाकी तिघे एका हॉटेल रूममध्ये आहेत, अंगावर जखमा आहेत, बाथरूम मध्ये वाघ आहे, झोपायचा बिछाना गच्चीवर कोपऱ्यात कधी खाली कोसळेल असा लटकला आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

एका पात्राचा दात तुटला आहे आणि एक बालक सुद्धा कुठूनसं त्यांच्या सोबत आलं आहे. हे असं सगळं असताना त्यांना काहीच आठवत देखील नसतं.

म्हणजे दारू पिऊन ती इतकी जबरदस्त चढलीये की अख्खा सिनेमा त्यांना जे झालं ते कसं झालं हे शोधून काढण्यात घालवावा लागतो.

 

 

अशी दारू चढू नये म्हणून ती कायम चांगल्या प्रतीची असली पाहिजे. अर्थात चांगल्या प्रतीची असल्यावर ती महाग असणारच!

मग पर्याय उरतो जरा स्वस्त दारूचा. सगळ्याच स्वस्त दारू त्रास दायक नसतात. पण ज्यांची गुणवत्ता खराब असते त्या प्रकारची दारू भयंकर चढते. त्यामागे काही कारण असतात ती बघू.

दारूत असलेला मद्यार्क:

प्रत्येक दारूच्या बाटलीवर त्यामध्ये किती प्रमाणात मद्यार्क आहे त्याची टक्केवारी लिहिलेली असते, म्हणजे किती इथेनॉल, मिथेनॉल किंवा प्रॉपॅनॉल वगैरे. जर ह्याचं प्रमाण जास्त असेल आणि ती खूप प्रमाणात सेवन करण्यात आली तर ती शरीराला हानिकारक ठरते.

जितके जास्ती मद्यार्क असेल तितकी जास्ती ती दारू चढते.

वाईट मद्यार्क:

दारू बनण्याच्या प्रक्रियेतून बरेच पदार्थ ज्याला बाय प्रॉडक्ट्स म्हणतात ते तयार होत असतात. त्यातील एक आहे ‘कंजेनेर’ म्हणजे अशुद्ध द्रव्ये असलेला वाईट मद्यार्क.

अशा मद्यार्कचा उत्कलनांक म्हणजे बॉयलिंग पॉईंट खूप जास्ती असतो. मद्य बनवताना निकृष्ट दर्जाचे पदार्थ वापरल्यास अजून जास्ती कंजेनेर्स किंवा अशुद्ध द्रव्य निर्माण होतात.

 

making-liquor-inmarathi

 

अति प्रमाणात कंजेनेर्स असले तर त्या मद्याची गुणवत्ता खालावते. आपलं शरीर असे मद्य पचवू शकत नाही. किंबहुना ते विष मानले जाते आणि त्यामुळे त्याची बाधाही होते. जबर डोकेदुःखी हा त्यातीलच एक भाग आहे.

डोक्यात घणाचे घाव घातल्यासारखं डोकं ठणकतं. काही जणांना मळमळ किंवा उलटी ही होऊ शकते.

मद्याची शुद्धता:

मद्य बनवताना ते बऱ्याचदा शुद्धतेच्या प्रक्रियेतून जात असतं. त्याला डिस्टीलेशन असेही म्हणतात. म्हणजे आंबलेल्या दारुतून पाणी आणि इथेनॉल वाफेच्या माध्यमातून वेगळं केलं जातं आणि तेही खूप वेळा.

हे करण्यासाठी पाणी आणि इथेनॉलच्या मिश्रणाला उकळले जाते . ज्यातून इथेनॉल वाफ रुपेने बाहेर पडते. पुन्हा ते थंड करून बाष्प रूपाने साठवले जाते.

अशा प्रकारे सतत करत राहिल्यास अत्यंत शुद्ध इथेनॉल उरते. असे शुद्ध प्रतीचे मद्य महाग असते.

 

pure-wine-inmarathi

 

जे मद्य ह्या प्रक्रियेतून एक किंवा दोन वेळाच जाते ते स्वस्त किमतीत विकले जाते. अर्थात त्याची शुद्धताही कमीच असते. कमी पैसे देऊन स्वस्तातील दारू घेत राहिल्यास ती शरीराला अपायकारक असतेच.

जुनी दारू किंवा वाईन:

जितकी जुनी दारू किंवा विंटेज वाईन ही लोकांना जास्तीत जास्त आवडते. त्याची चव काही औरच असते म्हणतात. पण गडद रंगाची दारू जशी विस्की किंवा रम अथवा खूपच जुनी रेड वाईन सुद्धा काही जणांना बाधते.

कारण त्या जुन्या करण्यासाठी जे लाकडी बॅरल वापरले जातात. त्या बॅरल च्या लाकडाचा रासायनिक परिणाम दारूवर होतो.

 

pure liquor inmarathi

 

मद्याची शुद्धता आणि साठवणूक पद्धती ह्या दोन्ही प्रक्रियांमुळे ह्या प्रकारच्या दारूंना एक रंग आणि चव येते.

म्हणजे खूप जुनी साठवलेली दारू जी ही दर्जाच्या पदार्थाने बनवलेली आणि निकृष्ट बॅरलमध्ये साठवली गेली असल्यास, ती घेणाऱ्याला चांगलीच ‘किक’ बसू शकते.

पण पांढऱ्या रंगाची दारू जसा वोडका, जीन किंवा व्हाइट रम असल्यास त्या मध्ये वाईट मद्यार्काचे प्रमाण कमी असते. त्याला वास आणि रंग तर नसतोच.

 

wine-blind-inmarathi

 

हलक्या, कमी किमतीच्या दारूचा फक्त चढणे, डोकं दुखणे इतकाच परिणाम नसून ती आपल्या शरीरातील पाणी सुद्धा संपवून शरीर तहानलेलं किंवा कोरडं (डि-हायडरेट) करते. खूप दारू प्यायली तर लघवीला खूप होत असते आणि शरीरातील पाणी संपते.

आपण तसेच कमी पाणी पिता झोपलो तर शरीर पाण्याची तहान भागवायला शरीरातील अवायवांमधून पाणी शोषु लागते.

मेंदूतील पाणी सुद्धा शोषले जाते आणि मेंदूकडून हे सहन केले जात नाही. मेंदू कोरडा झाल्यावर आकुंचन पावतो.

ह्यामुळेच आपल्याला चक्कर येणे किंवा डोकेदुःखीसारखे परिणाम भोगायला लागतात आणि एकदा जर ही डोकेदुःखी चालू झाली तर पटकन बरी होऊ शकत नाही.

 

bira inmaraathi

 

त्यामुळे कुठल्याही प्रकारची दारू घेताना शरीराला व्यवस्थित पाणी पुरवठा असणे ह्याकडे लक्ष द्यावेच लागते.

काही मद्यात आंबण्याची प्रक्रिया पटकन पूर्ण होण्यासाठी कधी कधी साखरही घातली जाते. मद्य तर पटकन आंबते पण पर्यायानं कमी दर्जाची दारू त्या साखरेमुळे बनते.

ती साखरयुक्त दारू आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण बिघडवते. त्याचा पण शेवट दारू चढण्यात म्हणजेच चक्कर येण्यात होऊ शकतो.

 

sharaabi inmarath

 

काही जणांची पचनशक्ती खूपच चांगली असल्यास त्यांच्यावर कदाचित हलक्या दर्जाच्या दारूने काहीच परिणाम होणार नाहीत किंवा लगेच होणार नाहीत. पण असे लोक विरळेच. सहसा स्वस्त किंवा शुद्धता न पडताळता घेतली गेलेली दारू खूप जणांना चांगलाच हँगोवर देते.

खास करून भारतात गटारी अमावस्ये नंतर खूप जणं उगीच नाही रस्त्याच्या कडेला किंवा गटारात पडलेली दिसत.

दारूचा ग्लास घेताना कमी पैशातली निकृष्ट दारू तर घेत नाही ना हा विचार करणं खूपच गरजेचं आहे. शेवटी हेल्थ इस वेल्थ, चिअर्स!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?