'भारतीय "स्वस्तिक" चिन्हाचा अर्थ काय? हिटलरमुळे ते बदनाम कसं झालं? वाचा इतिहास

भारतीय “स्वस्तिक” चिन्हाचा अर्थ काय? हिटलरमुळे ते बदनाम कसं झालं? वाचा इतिहास

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

हिंदू धर्मात श्लोक, जपजाप्य, प्रथा आणि चालीरीतींना खूप मान आहे. घरात, देवळात आणि सगळ्याच शुभ स्थळी सकारात्मक स्पंदने, उर्जात्मक लहरी मिळवण्यासाठी काही विशिष्ट अशी चिन्ह वापरली जातात.

अशा शुभ चिन्हांमध्ये स्वस्तिक हे असे चिन्ह आहे जे फक्त हिंदू धर्मियांमध्ये नाही, तर जैन धर्मियांमध्ये ,बौद्ध धर्मियांमध्ये आणि चीन देशातील ताओ धर्मियांमध्ये ही पुजले जाते.

 

history-of-swastika-inmarathi
learning-mind.com

 

स्वस्तिक चिन्ह नावारुपाला येण्याच्या मागे बरेच संदर्भ आढळतात.

संस्कृत भाषेतून सु+अस्ति (म्हणजे शुभ असणे) हा शब्द उचलला गेला आहे. तर गौतम बुद्धांच्या पाऊलखुणा मानून बौद्धधर्मीयांतही हे शुभ चिन्ह वापरले जाते.

जपान आणि चीन देशात स्वस्तिक चिन्ह प्रामुख्याने बुद्धमूर्तींवर आढळून येते.

हिंदू धर्मात शक्ती दायक सूर्याचं प्रतीक म्हणून स्वस्तिक चिन्ह दरवाज्यांवर, रोजच्या दारासमोरील किंवा देवघरा समोरील रंगोळीमध्ये, वह्यांमध्ये आणि भिंतींवरही बनवले जाते.

 

swastika-budhha-inmarathi
IndiaDivine.org

 

अत्यंत शुभ मानले जाणारे असे हे चिन्ह मात्र ज्यू धर्मियांमध्ये अत्यंत अपवित्र मानले जाते. इतके की त्याचा वापर किंवा त्याचं दर्शनही अमंगळ ग्राह्य असल्याने कुठेही वापरणे एक गुन्हा ठरतो. ज्यू धर्मिय ह्याच स्वस्तिकाला कुठेही थारा देत नाहीत. हे चिन्ह त्यांच्या देशातून म्हणजे जर्मनीतून हद्दपार केलेलं आहे.

का असेल इतका द्वेष ह्या चिन्हामागे? कारणही तसंच आहे.

ज्यूंचा झालेला अमानुष नरसंहार. ज्यू धर्माला आणि त्या धर्मातील लोकसमूहाला समूळ नष्ट करण्यासाठी जर्मनीचा सर्वे-सर्वा असणाऱ्या ऍडॉल्फ हिटलर ने जणू विडाच उचलला होता.

ना भूतो ना भविष्यती अश्या कत्तली करण्यात आल्या. असतील तिथे त्यांना ठेचण्यात आलं. जे जिवंत राहिले त्यांनी कसेबसे देशातून पलायन केले आणि स्वतः चा जीव वाचवला.

जेव्हा भारतात इंग्रजांचे राज्य असताना जी भारतीयांची ससेहोलपट झाली होती तशी किंबहुना त्याहून कितीतरी अधिक पटीने ज्यू लोकांचे हाल झाले होते.

अर्थातच हिटलर संबंधित सगळ्याच गोष्टींशी ज्यूंच्या पुढील पिढ्यांना घृणा वाटणे, चीड वाटणे साहजिकच आहे. त्यातच काळ्या रंगाचे स्वस्तिक हेच चिन्ह होते हिटलरचे म्हणजेच नाझी पक्षाचे आणि तत्कालिक जर्मनीच्या ध्वजाचे. ज्याचा उपयोग शुभ कृत्यांसाठी नसून विघातक कृत्यांसाठी झाला.

जगातील काही घटकांनी पवित्र मानलेलं, भक्ती आणि शक्तीशी निगडित असणारं शुभ चिन्हच का घेतलं नाझी सत्तेतील दुष्टकर्मीयांनी हा प्रश्न साहजिकच पडेल.

 

swastik-inmarathi
youtube.com

 

त्यामागे खूप मोठी विचारसरणी मांडून, खल निश्चय करून हे चिन्ह स्वीकारलं गेलं होतं.

१८७० च्या काळात एक जर्मन व्यापारी आणि पुराणवस्तू संशोधक असलेला हेन्रीक श्लीमन नामक गृहस्थ ऐतिहासिक वारसा असलेल्या ‘ट्रॉय’ नावाच्या ग्रीक देशातील शहरात पोचला आणि त्याला उत्खननात काही भांडी आणि बाकी बऱ्याच वस्तू सापडल्या.

त्यावर स्वस्तिक चिन्ह होती. त्याला काहीच कल्पना नव्हती त्या चिन्हांबाबत.

अशातच बरनॉफ नावाच्या एका भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या हुशार व्यक्तीने त्याचं अस्तित्व शोधून काढलं. त्याच्या निकषांनुसार ते चिन्ह आर्य संस्कृतीतील होतं, ग्रीक आणि जर्मन माणसं हे देखील आर्यांचे वंशज आहेत हे ही त्याने शोधून काढलं.

आर्य समाज हा क्षत्रिय म्हणजेच अत्यंत शूरवीर होता आणि स्वस्तिक हे शुभ आणि शौर्याचे प्रतिक म्हणून वापरले जात असे.

ह्या आर्यांनी बाहेरून हल्ले करून भारतात आपले बस्थान बसवले होते ही गोष्ट त्याने क्रूर नाझींच्या ध्यानात आणून दिली. ऋग्वेदात पण स्वस्तिकाचा उल्लेख आहे असे बरनॉफ ने शोधून काढले होते.

एवढंच नाही तर असाही एक समज आहे की, स्वतः हिंदू धर्म आचरणात आणणाऱ्या आणि नाझी नेता असलेल्या सवित्रीदेवी (खरे नाव – मॅक्सिमिआनी पोर्तास) नामक महिलेने, जिने सुभाषचंद्र बोस ना पण जर्मनी च्या बाजूने वळवले होते, तिने असा दावा केला होता की एडॉल्फ हिटलर हा विंष्णूच्या दहा अवतारांपैकी एक कलकी नावाचा अवतार आहे.

तो दुष्टांचा नायनाट करण्यासाठी पृथ्वीवर अवतरला आहे आणि ज्यूंची कत्तल देखील ह्यातीलच त्याचे एक कर्म आहे. असे हे नाझी स्वतःलाच उच्च धर्मिय आणि उच्च प्रतिष्ठेचे मानव मानणारे होते.

नाझी विचारसरणीच्या लोकांना सोडून बाकी सगळ्या लोकांना आपल्या टाचे खाली ठेवून त्यांना जगावर राज्य करायचे होते. आर्यांचे क्षत्रिय आणि शूर असणे ह्याचा पूर्ण उलटा अर्थ लावून जगाला नेस्तनाबूत करायचे होते.

 

hitler-marathipizza00
indiatoday.com

 

त्यावेळी म्हणजे साधारण १९३३ च्या काळात हिटलर सुद्धा नाझी पक्षाच्या चिन्हाच्या शोधात होता.

त्याला जर्मनीच्या माणसांची जगावर हुकूमत गाजवणारी एक वेगळी सत्ता अस्तित्वात आणायची होती. नाझी विचारसरणीच्या लोकांना उच्च धर्मिय म्हणून प्रस्थापित करायचे होते.

म्हणून स्वतः अत्यंत निडर आणि क्रूर वृत्तीच्या हिटलर ला आर्यांचे हे ‘शक्ती’ दर्शक चिन्ह आवडले. जे वापरून तो ज्यूंच्या मनात दहशत माजवू शकणार होता.

ते चिन्ह त्याने स्वतः च्या मर्जीप्रमाणे थोडे बदलून ही घेतले आणि नाझी विचारसरणीला साजेसा ध्वज बनवला गेला. ज्यात लाल कापडावर पांढऱ्या वर्तुळात 45 अंशात फिरलेले स्वस्तिक चिन्ह बनवण्यात आले.

त्याच्या काळ्या प्रवृत्तीला साजेल असेच कर्म त्याने स्वस्तिकाच्या निशाणी खाली केले. पहिल्या महायुद्धात अपयश आल्याने त्याचं खापर हिटलर ने ज्यू लोकांवर फोडले.

आधीपासून ज्यूंबद्दल मनात असणारा द्वेष आणि पहिल्या महायुद्धातली हार हिटलर ला स्वस्थ बसू देत नव्हती. तिथूनच ज्यू लोकांच्या काळ्या दिवसांची सुरुवात झाली.

ज्यू धर्मियांच्या संहाराला कारणीभूत असलेल्या एडॉल्फ हिटलर ने स्वस्तिक चिन्ह वापरून ते नाहक बदनाम केले. स्वस्तिक हे निशाण असणारा नाझी ध्वज ऊंच ठेवण्याच्या नादात हिटलर ने जगाला दुसऱ्या महायुद्धाच्या गर्तेतही लोटले.

 

hitler-marathipizza
dawn.com

 

अजूनही बऱ्याच देशात ह्या चिन्हाला नैराश्याचे, मानवी संहाराचे प्रतिक मानले जाते. आपण कोठेही फिरावयास गेल्यास आणि स्वस्तिक चिन्हाचा वापर करत असल्यास लोकांच्या रागाने किंवा द्वेषाने भरलेल्या नजरेस बळी पडू शकतो. कित्येक ठिकाणी ह्या चिन्हाच्या वापरास ही बंदी आहे.

हिटलरसारख्या कृरकर्म्याने स्वस्तिकाचे चिन्ह आपल्या पक्षाचे चिन्ह बनवण्यामागची कहाणी ही आहे!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?