' भारतातील या ८ ठिकाणी मुलींना आज ही जीन्स घालण्यास "सक्त मनाई आहे"!

भारतातील या ८ ठिकाणी मुलींना आज ही जीन्स घालण्यास “सक्त मनाई आहे”!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

पूर्वीपासूनच स्त्रियांच्या पेहरावाबाबत अनेक नियम कायदे करण्यात आले आहेत आणि ते आजही होत असतात. त्यासोबतच मुलींच्या पाश्चिमात्य कपडे घालणे हा तर नेहमीच चर्चेचा विषय असतो. मग ते राजकारणी असो वा कॉलेजची रूलबुक.

मुलींनी काय घालावे आणि काय घालू नये ह्यावर ही मंडळी उपदेश देत असतात.

अनेकजण तर मुलींच्या पाश्चिमात्य पेहरावाला बलात्काराचे कारण ठरवून मोकळे होतात.

मग धार्मिक ठिकाणं असो, शैक्षणिक ठिकाणं असो वा कार्यालयीन सर्वत्रच महिलांना त्यांच्या पेहरावावरून त्यांचे अक्षरशः वर्गीकरण केले जाते. म्हणजे कोण संस्कारी आणि कोण नाही ते.

==

हे ही वाचा : तुमच्या रोजच्या वापरातील ‘जीन्स’ नेमकी आली कुठून? वाचा जीन्सचा हा रंजक प्रवास

==

भारत हा पारंपारिक चालीरीती मानणारा देश आहे, हा एक धार्मिक देश आहे जिथे धर्माला आणि संस्कारांना खूप महत्व आहे.

पण हाच भारत देश आज जगातील त्या देशांमध्ये देखील गणला जातो ज्या देशांना आधुनिक म्हटले जाते. मग ह्या आधुनिक देशात आधुनिकीकरण हे फक्त तंत्रज्ञानात झालं आहे की काय असा प्रश्न पडतो.

आणि हा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे, भारतातील ते ८ ठिकाणं जिथे आजही मुलींना पाश्चिमात्य कपडे घालण्यास मनाई आहे, बघुयात कुठली आहेत ही ठिकाणं :

१. आदर्श मुलींचे महाविद्यालय, हरयाणा :

 

Adarsh-Womens-College-Haryana-jeans-ban-inmarathi

ह्या महाविद्यालयातील प्रमुख अल्का शर्मा ह्यांनी सांगितले की,

“लहान ड्रेस घातल्याने विद्यार्थिनी पूर्णपणे झाकल्या जात नाही त्यामुळे त्यांना छेडखाणीला सामोरे जावे लागते.”

त्यामुळे ह्या कॉलेजमध्ये पाश्चिमात्य कपडे घालण्यास मनाई आहे. आणि जर कुणी हा नियम मोडला तर त्याला १०० रुपयांचा दंड भरावा लागतो.

येथे विचार करण्याची गोष्टी ही आहे की एकत्र ह्या कॉलेजची प्रमुख ही देखील एक स्त्री आहे आणि तरीदेखील तिचे असे विचार आहेत.

त्यामुळे येथे शिकत असलेल्या मुलींवर नक्कीच ह्याचा विपरीतप परिणाम होत असेल.

२. श्री साईराम कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, चेन्नई :

 

Sri-Sairam-College-of-Engineering-dress-ban-inmarathi

चेन्नईतील ह्या इंजिनीअरिंग कॉलेजात देखील मुलींनी काय घालावे आणि काय घालू नये ह्यासंबधीचे नियम बनविण्यात आले आहेत.

३. आरडीएम कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, थिरुवल्लुवर :

 

RMD-college-of-engineering-dress-ban-inmarathi

थिरुवल्लुवर येथील आरडीएम कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग ह्या कॉलेजात तर गेस्ट लेक्चर घेणाऱ्या लेक्चरला देखील कपड्यांबाबतचे हे नियम पाळावे लागतात.

४. बारमेर, राजस्थान :

 

western clothes ban-inmarathi02

राजस्थान येथील बारमेर येथे तर फक्त जीन्स घालणेच नाही तर मुलींचे मोबाईल फोन्स वापरणे देखील बॅन आहे. तर नवरदेवाला देखील लग्नाच्या दिवशी पारंपारिक धोती घालणे बंधनकारक आहे.

खास  पंचायतने हा फर्मान “मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने” काढला होता.

==

हे ही वाचा : जीन्सच्या खिश्यांना छोटी बटणं का असतात?

==

५. उत्तर प्रदेशातील काही गावं :

 

jeans baned InMarathi

पश्चिम उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनग्रास आणि हारनपुस जिल्ह्यातील पश्चिम बंगालमधील किमान १० गावांत पाश्चिमात्य कपडे घालण्यास बंदी घालण्यात आली आहे.

तसेच मोबाईलच्या वापरावर देखील येथे बंदी घालण्यात आली.

ह्याबाबत १७ मुस्लिम परिषदेतील सदस्यांनी हे मत नोंदविले आहे की, हे नवीन नियम महिलांच्या विरोधात गुन्हे रोखण्यास मदत करतील.

६. काश्मीर :

 

western clothes ban-inmarathi

श्रीनगरमध्ये तर फक्त स्थानिकच नव्हे तर महिला पर्यटकांना देखील ‘योग्य परिधान आचारण’ अंतर्गत राहावे लागते.

जमात-ए-इस्लामी काश्मिर या स्थानिक धार्मिक संघटनेने असे सुचवले आहे की, जम्मू-काश्मीरला येणाऱ्या स्त्रियांना अशी वस्त्रे घालणे म्हणजे स्थानिक संवेदनांबाबत असंवेदनशील असणे आहे.

७. महिला व बाल विभाग, हरयाणा :

 

Women-and-Child-department-Haryana-dress-ban-inamarathi

कामाच्या ठिकाणी आपण कसे कडपे घालावे हा सर्वस्वी आपला प्रश्न असतो, पण हरयाणाच्या महिला व बाल विभागात एक वेगळाच प्रकार बघायला मिळतो, येथील फिल्डवर काम करणाऱ्या महिलांना सभ्य कपडे घालण्याची ताकीद देण्यात आली आहे.

त्यांना कामावर जीन्स-टीशर्ट सारखे असभ्य कडपे घालण्यास मनाई आहे. सामाजिक कल्याण मंत्री गीता भुक्कल यांनी हे स्पष्टपणे अभिप्रेत असल्याचे म्हटले आहे.

८. तामिळनाडूतील मंदिरे :

 

western clothes ban-inmarathi04

==

हे ही वाचा : जीन्स सगळेच वापरतात, पण करोडोंची जीन्स आणि त्यामागचा रंजक इतिहास तुम्हाला नक्कीच ठाऊक नसेल

==

हे एक धार्मिक सभ्यतेच्या अंतर्गत येत असल्याने ह्यावर आपण कोणीही प्रश्न उपस्थित करू शकत नाही.

तर मद्रास उच्च न्यायालयाने येथील मंदिरात जीन्स, तसेच छोटे कपडे घालून जाण्यास मनाई केली आहे.

येथील अरुल्मिगु रामनथ स्वामी मंदिरात अनेक पर्यटक भेट देतात तेव्हा जर कुठलाही पर्यटक हा धोती, पायजामा किंवा फॉर्मल शर्ट-पँटमध्ये नसेल तसेच जर स्त्री ही साडीत नसेल तर त्यांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही.

जर परंपरेचा किंवा धार्मिक बाबींचा विचार केला तर आपल्या देशात प्रत्येक राष्ट्राचा त्यांचा त्यांचा वेगळा पोशाख आहे.

पण आज जेव्हा आपण एवढ्या आधुनिकीकरणाच्या गोष्टी करतो तिथे कुठेतरी आपल्या विचारांत देखील आधुनिकता यायची गरज आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “भारतातील या ८ ठिकाणी मुलींना आज ही जीन्स घालण्यास “सक्त मनाई आहे”!

  • March 16, 2019 at 10:07 am
    Permalink

    अरे यामध्ये शांति प्रिय धर्माचे सर्व स्थल राहिले ना।
    का ते भारतात नाही,?

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?