चॉकलेट अॅल्युमिनियमच्या फॉईलमध्ये रॅप केलेलं का असतं? जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

चॉकलेट आवडत नाही असं माणुस क्वचितच सापडेल. केवळ लहान मुलं नव्हे तर मोठी माणसंही मिटक्या मारत चॉकलेटचा आस्वाद घेतात.

लहान मुलांचं रडणं थांबवून त्यांची समजुत काढण्यापासून ते थेट प्रेयसीकडे आपलं प्रेम व्यक्त करण्यापर्यंत अनेक घटनांमध्ये या गोड पदार्थाचा आधार घेतला जातो.

सुरवातीला चॉकलेट हे भलेही एक शाही पेय म्हणून उदयास आलेलं असलं तरी आज ते सर्व वर्गातील लोकांसाठी उपलब्ध झाले आहे.

एकदा चॉकलेट हाती पडलं की त्याचा आस्वाद घेताना त्यातील वेष्टनाकडे पाहिलं जातं नाही.

मात्र आपल्या शहरांपासून दूर तयार होणारं हे चॉकलेट आपल्यापर्यंत कसं पोहोचतं, दरम्यान ते हवामानामुळे वितळत नाही, त्याला अन्य कोणताही वास येत नाही, वेष्टनात गुंडाळुनही त्याची चव बदलत नाही असे प्रश्न तुम्हाला कधीतरी निश्चित पडले असतील.

पण जर तुम्ही कधी ह्या चॉकलेटच्या पॅकेजिंगकडे लक्ष दिले असेल तर तुमच्या लक्षात आले असेल की हे चॉकलेट नेहमी अॅल्युमिनियमच्या फॉईलमध्ये रॅप केलेलं असतं.

पण ते अॅल्युमिनियमच्या फॉईलमध्येच नेहमी रॅप का केले जाते, प्लास्टिक किंवा कागदात का नाही असा प्रश्नही कदाचित तुम्हाला पडला असेल. तर आज तुमच्या ह्याच प्रश्नच उत्तर घेऊन आम्ही आलो आहोत.

 

aluminium foil-inmarathi02
symetal.gr

 

त्यासाठी आधी हे अॅल्युमिनियमच्या फॉईल काय असते ते जाणून घेऊया.

 

aluminium foil-inmarathi01
womansday.com

 

लोखंडाच्या पत्र्यापासून ही अॅल्युमिनियम फॉईल तयार केली जाते. जिला misnomer tin foil असे देखील म्हणतात. ह्या फॉईलची जाडी ही ०.२ मिमी एवढी असते. ह्यासाठी ६ मायक्रोमीटर पर्यंतचा गेज वापरला जातो.

तर घरात वापरली जाणारी फॉईल ही ०.०२४ मीमी एवढी जड असते.

अत्यंत कमी जाड असल्याने ही फॉईल खूप लवचिक असते, त्यामुळे ती वाकवल्या जाऊ शकते तसेच त्याने कुठलीही वस्तू रॅप केली जाऊ शकते.

ही फॉईल अतिशय नाजूक असते पण ती बाहेरील तापमानापासून आतील पदार्थाचे रक्षण करण्यास सक्षम असते.

त्यामुळे तुमच्यापर्यंत येणारं चॉकलेट ते सुरक्षित आणि टिकाऊ राहतं, त्याचं क्रेडिट या फॉइलला द्यायला हवं.

 

aluminium foil-inmarathi05
freshee.in

 

तसे तर ह्या अॅल्युमिनियम फॉईलचे खूप फायदे आहेत. ही अॅल्युमिनियम फॉईल आपल्या रोजच्या वापरातील आहे.

पदार्थ रॅप करण्यासाठी आपण ह्या फॉईलचा मोठ्या प्रमाणावर वापर करतो. जेव्हा हॉटेलातून काही मागवतो तेव्हा देखील ते पदार्थ ह्याच फॉईलमध्ये बांधून पाठवले जातात हे तुम्हाला माहित असेलचं,

काही वर्षांपुर्वीपर्यंत केवळ हॉटेलमध्ये वापरली जाणारी ही फॉईल आता मात्र घराघरांतही वापरली जात आहे.

कॉलेज किंवा ऑफिसमध्ये डबा नेताना या फॉईलचा वापर करून पोळ्या नेल्या जातात.

त्याचप्रकारे बाजारात मिळणाऱ्या अनेक प्रकारच्या चॉकलेटला देखील ह्याच फॉईलने रॅप केलेले असते.

 

aluminium foil-inmarathi04
kisspng.com

 

चॉकलेटला ह्या अॅल्युमिनियम फॉईलमध्ये रॅप करण्यामागे अनेक कारणं आहेत.

ही फॉईल चॉकलेटला एक सुरक्षितता प्रदान करते.

विज्ञानाच्या नियमाप्रमाणे खाद्यपदार्थ ज्यामध्ये गुंडाळला जातो, त्या पदार्थाशी त्यांची रासायनिक प्रक्रिया होते.  आणि त्यामुळे खाद्यपदार्थावर विपरीत परिणाम होवून त्याचा खाणा-यांना अपाय होवु शकतो.

मात्र या फॉइलमुळे चॉकलेटच्या गुणधर्मांसोबत रिअॅक्ट होत नाही. तेच जर हे चॉकलेट एखाद्या कागदात रॅप केले तर काही काळाने त्या चॉकलेटला त्या कागदाची चव येते.

तसेच जर चॉकलेट एखाद्या दमट ठिकाणी असेल तर ते लगेचच वितळायला लागते, जर चॉकलेटला एखाद्या अश्या वेष्टनात ठेवलं ज्यातून कुठला वास येत असेल तर त्या चॉकलेटला देखील तसाच वास येऊ लागतो.

 

aluminium foil-inmarathi03
aliexpress.com

 

ह्यासर्वांपासून चॉकलेटचा बचाव करण्यासाठी त्याचा मूळ गुणधर्म जपण्यासाठी ही अॅल्युमिनियम फॉईल एक उत्तम पर्याय ठरते. कारण वरील सर्व समस्यांपासून ह्या चॉकलेटला वाचविण्यासाठी त्याला एका अश्या कवचाची गरज असते जे त्याला चारी बाजूंनी झाकून ठेवेल, ज्याला कुठलाही वास नसेल, स्वतःची चव नसेल.

म्हणून चॉकलेट हे अॅल्युमिनियम फॉईलमध्ये रॅप करण्यात येते कारण त्यामुळे चॉकलेट दीर्घकाळासाठी सुरक्षित राहू शकते.

 

aluminium foil-inmarathi
hogar.mapfre.es

 

 

तसेच ही अॅल्युमिनियम फॉईल स्वस्त असते, त्यामुळे ती चॉकलेट रॅप करण्यासाठी सहज उपलब्ध असते, तसेच ह्यातून चॉकलेटचे नैसर्गिक तेल निघू शकत नाही.

त्यामुळे चॉकलेटच्या वेष्टनासाठी कितीही फॉईन वापरलं गेलं तरी त्यामुळे चॉकलेटचा खर्च वाढत नाही, परिणामी आपल्याला महाग चॉकलेट खरेदी करावे लागत नसल्याने सर्वांनाच हे चॉकलेट सहज परवडु शकतं.

आपल्याला अनेकदा प्रश्न पडतो, की मुंबईसारख्या शहरांमध्ये उष्ण तापमान असूनही चॉकलेट कसं वितळतं नाही. तर याचं उत्तर आहे, अल्युमिनियम फॉइल.

अॅल्युमिनियम फॉईल चॉकलेट पासून उष्णतेला दूर ठेवते त्यामुळे चॉकलेट वितळत नाही. तसेच फॉईल चॉकलेटला कुठल्याही प्रकारच्या वासापासून देखील दूर ठेवतं. त्यामुळे तुमच्या पर्यंत पोहोचणारं तुमचं लाडकं चॉकलेट पुर्णपणे सेफ आणि ताजं असावं यासाठी ही फॉईल वापरली जाते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही,

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?