सैफ-नवाजुद्दीनची “सेक्रेड गेम्स” आवडली असेल तर ह्या ८ सिरीज नक्की बघाच

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

सध्या जमाना हा ऑनलाईनचा आहे आणि त्यासोबतच आता लोकांमध्ये वेब सिरीजची लोकप्रियता देखील कमालीची वाढते आहे. ह्यामध्ये नेटफ्लिक्स वरील आपलिया भारतीय वेब सिरीज ‘सॅक्रेड गेम्स’ चांगलीच गाजते आहे.

जर तुम्ही अजूनही ही सिरीज बघायला सुरवात केली नसेल तर तुम्ही एका उत्कृष्ट क्राईम-ड्रामा असलेल्या सिरीजला मुकताय.

आणि जर तुम्ही ही सिरीज बघितली असेल तर आज आम्ही तुम्हाला अश्याच काही आणखी आणि तेवढ्याच ताकदीच्या वेब सिरीज बाबत सांगणार आहोत ज्या तुम्ही नक्की बघायला हव्यात.

१) Narcos :

 

ही सिरीज जगातील सर्वात मोठा ड्रग डीलर आणि स्मगलर म्हणून प्रसिद्ध असलेल्या Pablo Escobar ह्या कोलंबियन गुन्हेगारावर आधारित आहे.

 

Pablo-Escobar-marathipizza01
images.dailystar.co.uk

Pablo Escobar ह्याची कहाणी एवढी रंजक आहे की ती तुम्हाला धरून ठेवते. तुम्ही एकदा ही सिरीज बघायला सुरवात केली तर तुम्ही ती सोडू शकत नाही.

२) Godfather :

 

गॉडफादर ही चित्रपट सिरीज आज पर्यंतची सर्वात लोकप्रिय क्राईम सिरीज पैकी एक आहे. ह्यामध्ये एक वृद्ध पिता आहे ज्याला त्याचा गुन्हेगारीचा धंदा आपल्या मुलाला सोपवायचा आहे.

ह्यात तुम्हाला गँग वॉर बघायला मिळेल. तसेच ह्या सिरीजचे लेखन जेवढे उत्कृष्ट आहे तेवढाच उत्कृष्ट अभिनय ह्यातील कलाकारांनी केला आहे. ही मुव्ही सिरीज तर बघायलाच हवी.

३) Breaking Bad :

 

ह्या सिरीजमध्ये एक हायस्कूल केमिस्ट्री शिक्षक दाखविण्यात आला आहे. ज्याला लंग कॅन्सर झाला असल्याचं समोर येत आणि मग त्याच्या खडतर प्रवासाची सुरवात होते.

आपल्या नंतर आपल्या कुटुंबाचं भविष्य व्यवस्थित आणि सुरक्षित असावं ह्यासाठी त्याचे प्रयत्न सुरु होतात.

 

breaking-bad

 

ह्यामध्ये मध्यमवर्गीय माणूस जीवन जगण्यासाठी आपल्या जीवाचा किती आटापिटा करतो हे दाखविण्यात आले आहे.

४) Fargo :

 

हा क्राईम ड्रामा आपल्याला १९७९ सालच्या South Dakotaमध्ये घेऊन जातो जिथे एक तरुण पोलीस अधिकारी Lou Solverson जो एका स्थानिक गुन्हेगारी टोळी आणि मोठ्या सिंडीकेट जमावटोळी यांचा तपास करताना दिसतो.

ह्याचे सुरवातीचे काही भाग अगदी आपल्याला मंत्रमुग्ध करून सोडतात. आणि त्यामुळे पुढे काय होणार ह्याची उत्सुकता नेहमी मनात असते.

५) No Country for Old Men :

 

ही एक ऑस्कर विनिंग फिल्म आहे जी आपल्याला अगदी खिळवून ठेवते.

ही देखील एक क्राईम थ्रिलर वेब सिरीज आहे. ह्यामध्ये जे ट्विस्ट आणि टर्न आहेत ते आपल्याला आश्चर्यचकित करून सोडतात.

६) Game Of Thrones

 

 

जॉर्ज आर आर मार्टिन यांच्या कादंबरी रूपातील पुस्तकाच्या कथेवर या सिरीजचे कथानक बेतले आहे.

युरोपातील मिथकांचा आधार घेऊन गुंफण्यात आलेल्या या कथेत काही रॉयल फॅमिलीजचे एका सर्वोच्च सिंहासनासाठीचे युद्ध दाखवण्यात आले आहे.

 

daenerys-dragon-game-of-thrones02-marathipizza

 

या टीव्ही सेरीजचे सात सिझन पूर्ण झाले असून शेवटचा म्हणजे आठवा सिझन पुढच्या वर्षी येणार आहे.

७) Peaky Blinders 

 

व्हिक्टोरियन जमान्यातील गुन्हेगारीपट पाहण्यात तुम्हाला इंटरेस्ट असेल तर ही टीव्ही सिरीज तुम्हाला नक्की आवडेल.

थरार आणि फायटिंग सिन्सने जाण आणलेली ही उत्कृष्ठ टीव्ही सिरीज आहे. या सिरीजमध्ये व्हिलनने केलेली भूमिका सर्वात जास्त गाजली.

त्याच्या या आधीच्या इतर भूमिका या व्हिलनच्या भूमिकेने लोकांना विसरायला भाग पाडलंय!

महत्वाचं म्हणजे एका गुन्हेगाराच्या नजरेतून या सिरीजची पटकथा आपल्यासमोर उलगडत जाते. या आगळ्या अनुभवासाठी ही सिरीजाही बघायलाच हवी!

८ ) Mindhunter 

 

या सिरीजची पटकथा १९७० च्या दशकात अमेरिकन तपाससंस्था एफबीआयने गुन्ह्याचा तपास करताना विज्ञानाची मदत घ्यायला सुरुवात केली त्याभोवती फिरते.

मानसशास्त्रीय दृष्टीने गुन्ह्याचा तपास कसा केला जातो, धागेदोरे कसे उलगडले जातात हे ही सिरीज पाहताना काळात जातं.

सत्तरीच्या दशकातला अमेरिकेतला काल उभा करण्यात दिग्दर्शकाचं कसब दिसून येतं.

गुन्ह्याच्या तपासाचा थरार बघायचा असेल तर ही सिरीज चुकवू नका!

मग आजपासून ह्या सिरीज बघणं सुरु करा…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “सैफ-नवाजुद्दीनची “सेक्रेड गेम्स” आवडली असेल तर ह्या ८ सिरीज नक्की बघाच

  • July 31, 2018 at 7:31 pm
    Permalink

    Consider adding “Lost” and “Fringe” series

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?