' आपल्याकडे प्रत्येक चित्रपट शुक्रवारीच का रिलीज होतो? – InMarathi

आपल्याकडे प्रत्येक चित्रपट शुक्रवारीच का रिलीज होतो?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

विकेंडचं प्लॅनिंग करताना या आठवड्यात रिलीज होणा-या चित्रपटांवर नजर टाकली नाही असा माणुस क्वचितच सापडतो.

चित्रपटप्रेमींची संख्या इतकी झपाट्याने वाढतीय की दर शुक्रवारी सिनेमा रिलीज होताच, त्याच दिवशी तो पाहण्याचा अनेकांचा हट्ट असतो.

 

yahoo news india

 

त्यातही फर्स्ट डे फर्स्ट शोसाठी गर्दी करणा-यांची संख्या सध्या घटत असली, तरी शुक्रवार रात्रीपासून रविवार रात्रीपर्यंतच्या प्रत्येक शो ला असलेली गर्दी सतत वाढती आहे. सध्या अनेक मल्टिप्लेक्स उभारली गेली असली, तरीही विकेंडला तिकीट मिळविण्यासाठी खटपट करावी लागते याचा अनुभव तुम्हीही घेतला असेल.

तर, शुक्रवार म्हटलं की या दिवशी हमखास किमान एक तरी चित्रपट रिलीज होणार हे मात्र नक्की !

तुम्हाला देखील कधीतरी प्रश्न पडला असेल की आठवड्यातील इतर वार सोडून केवळ शुक्रवारीचं चित्रपट का रिलीज होतात? इतर दिवशी यांचं काय एवढं नुकसान होतं? रविवार सारखा सुट्टीचा दिवस पडलेला असताना अगदी आठवड्याच्या मधलाच सुट्टी नसलेला दिवस चित्रपट रिलीज करण्यासाठी का बरं निवडला जातो?

तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तर आज आम्ही तुमच्यासमोर उलगडत आहोत.

 

 

स्रोत

 अनेकांचा हा समज आहे, की शुक्रवारी चित्रपट रिलीज करण्याची प्रथा ही हॉलीवूड मधून आली आहे.

१५ डिसेंबर १९३९ रोजी हॉलीवूडची प्रसिद्ध फिल्म ’Gone With The Wind’ रिलीज झाली होती आणि त्या दिवशी होता शुक्रवार ! आणि तेव्हापासून हॉलीवूडमध्ये प्रत्येक फिल्म शुक्रवारीचं रिलीज करण्याचा पायंडा पडला. परंतु फिल्मचा प्रीमियर मात्र एक दिवस आधी म्हणजे गुरुवारी होतो.

त्यामुळे हॉलिवुडमध्ये शुक्रवारी फिल्म रिलीज करण्याची प्रथा होती, ही बाब एका अर्थी खरी असली, तरी त्याचे अनुकरण भारतीयांनी केले असे मुळीच नाही.

 

why-movie-releases-on-friday-marathipizza02

स्रोत

पण चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी शुक्रवार निवडण्याचं संपुर्ण कारण हे आर्थिक फायद्यासाठी आहे. 

भारतीय सिनेसृष्टीतील मैलाचा दगड म्हणून ओळखला जाणारा ‘नील कमल’ हा चित्रपट सोमवार दिनांक २४ मार्च १९४७ रोजी रिलीज करण्यात आला होता. त्यावेळी शुक्रवारसाठी हट्ट धरला जात नव्हता. अर्थात त्यावेळी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेवरून वादही घातले जात नव्हते.

मात्र भारतात चित्रपट शुक्रवारी रिलीज करण्याची प्रथा १९५० सालच्या शेवटी सुरु झाली.

क्लासिक चित्रपट मुगल-ए-आजम ५ ऑगस्ट १९६० रोजी शुक्रवारी रिलीज झाला.  त्या चित्रपटाला मिळालेलं भरघोस यश पाहता इतर निर्मात्यांनी देखील आपले चित्रपट शुक्रवारी रिलीज करण्यास सुरुवात केली आणि इथून सुरु झाली प्रत्येक चित्रपट शुक्रवारी रिलीज करण्याची प्रथा!

 

why-movie-releases-on-friday-marathipizza03

स्रोत

मुघल ए आजम या चित्रपटाची जादुु आजही रसिकांच्या मनावर काय आहे, याचंच उदाहरण म्हणजे काही वर्षांपुर्वी मुघल ए आजम या चित्रपट रंगीत स्वरुपात पुन्हा प्रदर्शित करण्यात आला.

तर या चित्रपटाला मिळालेलं यश आपल्यालाही मिळावं ही इच्छा मनात ठेवून अनेक निर्मात्यांनी आपल्या चित्रपटांसाठी शुक्रवारचा आग्रह धरला.

चित्रपटासाठी शुक्रवार निवडण्याचं आणखी एक कारण म्हणजे त्याची आर्थिक कमाई.

चित्रपटातील प्रत्येकाची चित्रपटाकडून वेगवेगळी अपेक्षा असते. कलाकारांना प्रसिद्ध हवी असते, प्रेक्षकांना मनोरंजन हवं असतं, तर निर्मात्यांना आर्थिक नफा.

त्यामुळे आपला आर्थिक नफा मिळविण्यासाठी निर्मात्यांनी शुक्रवारला पसंती दिल्याचं सांगितलं जातं.

 

patrika

 

कारण चित्रपट निर्मात्यांची यामागे एक श्रद्धा देखील आहे. शुक्रवार म्हणजे लक्ष्मीचा दिवस. निर्माता असो वा कोणताही व्यावसायिक, प्रत्येकाकडूनच लक्ष्मीदेवीची आराधना केली जाते. कारण देवीच्याच आशिर्वादाने व्यवसायात भरभरटात येते यावर अनेकांचा दृढ समज असतो.

या दिवशी चित्रपट रिलीज केल्यास लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्यांचा चित्रपट भरघोस कमाई करेल असे ते मानतात.

हे झालं चित्रपट प्रदर्शनाचं, इतकंच नाही तर चित्रपटाची शुटींग सुरु करण्याचा मुहूर्त देखील शुक्रवार बघूनच निश्चित केला जातो, जेणेकरून चित्रपटाचं शुटींग निर्विघ्नपणे पार पडावं आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर छप्परतोड कमाई करावी.

 

why-movie-releases-on-friday-marathipizza04

स्रोत

तसेच यामागे एक व्यावसायिक कारण देखील आहे की मल्टीप्लेक्समध्ये फिल्म स्क्रीनिंगची फी शुक्रवार वगळता इतर दिवशी जास्त असते. त्यामुळे साहजिक आपला व्यावसायिक फायदा लक्षात घेऊन चित्रपट निर्माते शुक्रवारीचं चित्रपट रिलीज करतात.

 

why-movie-releases-on-friday-marathipizza05

स्रोत

 

तर चित्रपटासाठी शुक्रवार निवडण्याची कारणं ही अशी आहेत. मात्र सध्याचे काही चित्रपट याला अपवाद ठरतात. कोणताही सण अथवा सार्वत्रिक सुट्टी यांचे औचित्य साधून चित्रपट गुरुवारीही प्रदर्शित केला जातो. यांची संख्या कमी असली तरी काही उदाहरणं सापडतात.

त्यातलंच एक उदाहरण म्हणजे सलमान खानचे चित्रपट. इद या सणाला चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय सलमान खानने घेतल्याने त्या दिवशी कोणताही वार असला तरी इदच्या मुहुर्तावर चित्रपटाचा आनंद प्रेक्षकांना घेता येतो.

 

thenewscrucn

 

तर प्रेक्षकांनो,, आजही शुक्रवार आहे, तुमच्या भेटीला आजही काही चित्रपट आले आहेत.

अभिनेता विकी कौशल तुम्हाला घाबरविण्यासाठी आला आहे. भुत द हॉंटेड शीप या भयपटासाठी आजच्या रात्रीचा शो आताच बुक करा, ठराविक रोमॅंटिक फिल्मचा कंटाळा आला असेल तर हा थरारक अनुभव घ्यायला काहीच हरकत नाही.

किंवा भुताची भिती वाटत असेल, अभिनेता आयुषमानची धमाल प्रेमकथा बघायला हरकत नाही, गे प्रियकरांची धमाल कथा बघण्यासाठी आजचा शुक्रवारचा मुहुर्त चुकवु नका.

 

 

 

चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी शुक्रवारची निवड ही निर्मात्यांचाा फायद्यासाठी केली जात असली, तरी आठवड्यातील पाचही दिवस धकाधकीचे आयुष्य जगणा-यांना विकेंडची सुरुवात करण्यासाठी शुक्रवारी येणारा नवा चित्रपट हा सर्वोत्तम पर्याय आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?