'विविध समाजांमध्ये "मर्द" झाल्याचं सिद्ध करण्याच्या ह्या प्रथा-अंगावर शहारे आणतात

विविध समाजांमध्ये “मर्द” झाल्याचं सिद्ध करण्याच्या ह्या प्रथा-अंगावर शहारे आणतात

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

प्रत्येक समाजाच्या त्यांच्या त्यांच्या प्रथा परंपरा आणि त्यांची वेगळी अशी संस्कृती असते. त्यामुळेच प्रत्येक समाज हा एकमेकांपासून भिन्न असतो, तीच त्याची ओळख असते. पण हे असं केवळ आपल्या शहरात किंवा गावातच नाही तर आदिवासी जमातीत देखील असते.

प्रत्येक आदिवासी जमात ही भिन्न असते. त्यांच्या परंपरा ह्या वेगवेगळ्या असतात. पण ह्या सर्व भिन्न आदिवासी जमातीत एका गोष्टीसाठी समान मापदंड आहेत. जे हे आदिवासी मोठ्या कटाक्षाने पाळतात देखील.

जगातील अशा काही आदिवासी जमाती आहेत जिथे मुलांना मर्द म्हणवून घेण्यासाठी अघोरी पद्धतींना सामोरे जावे लागते. ह्यानंतर ते मर्द होतात असा ह्या आदिवासी जमातींचा समज आहे. कुठल्या आहेत त्या अघोरी पद्धती जाणून घेऊ…

१. सिंहाची शिकार 

मसाई नावाच्या आदिवासी जमातीत मुलांना मर्द होण्यासाठी सिंहाची शिकार करावी लागते. आधी त्यांना एकटे जाऊन शिकार करावी लागायची पण आता जेव्हा सिंहाची संख्या कमी होत चालली आहे तेव्हा हे आदिवासी मुलं एकत्र मिळून सिंहाची शिकार करतात.

 

tribe-rituals-inmarathi02
toptenz.net

सिंहाची शिकार करणे म्हणजे काही सोपं काम नाही, जंगलाचा राजा आहे तो. त्याची शिकार ही खूप धोकादायक असू शकते.

पण सिंहाची शिकार केल्याने हे मुलं मर्द बनतात शूर होतात असा ह्यामागील उद्देश आहे. पण ह्यासाठी ते दुबळ्या किंवा जखमी सिंहाची शिकार करू शकत नाही, तसेच ते मादीची शिकारही करू शकत नाही.

२. उंच ठिकाणहून समुद्रात उडी

हवाई येथील आदिवासी जमातीतील मुलांना देखील स्वतःला मर्द सिध्द करण्यासाठी एका अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागते. ह्यासाठी त्यांना एखाद्या उंच ठिकाणहून समुद्रात उडी घ्यावी लागते.

 

tribe-rituals-inmarathi10
cracked.com

यातून हा संदेश देण्यात येतो की, आता लहानपण विसरून मर्द होण्याची वेळ आली आहे.

३. वार्षिक शिकार उत्सव

भारतातील आदिवासी जमातींमध्ये देखील असेच काहीसे बघायला मिळते. झारखंड येथील मुंडा, सांथाल, हो, भूमीज, आरोओन आणि खरीया जमातीतील मुलांना तिथल्या वार्षिक शिकार उत्सवात भाग घ्यावा लागतो.

 

tribe-rituals-inmarathi
telegraphindia.com

जर मुलाने त्याच्या जन्मानंतर एकदाही ह्या उत्सवात भाग घेतला नाही, तर तो अजूनही त्याच्या आईच्या गर्भात असल्याचे मानले जाते.

४. ६ महिने जंगलात एकांतवास

ऑस्ट्रेलिया येथील Aborigine जमातीच्या मुलांना मर्द होण्यासाठी अध्यात्मिकतेचा मार्ग स्वीकारावा लागतो, त्यासाठी त्यांना ६ महिने जंगलात एकांतवासात घालवावे लागतात.

 

tribe-rituals-inmarathi09
cracked.com

त्यानंतरच ते त्यांच्या समुदायात परतू शकतात.

५. भयानक शारीरिक वेदना 

ऑस्ट्रेलिया येथील आणखी एक जमात Unambal.

ह्या जमातीतील मुलांना मर्द म्हणवून घेण्यासाठी त्यांना भयानक शारीरिक वेदना सहन कराव्या लागतात. या जमातीतील वृद्ध मंडळी ह्या मुलांच्या शरीरावरील त्वचेचा काही भाग कापतात, जसे की छातीवरील, हातावरील, खांदे ह्यांच्यावरील त्वचा कापली जाते. त्यानंतर ही जखम भरण्याआधीच त्यात माती भरली जाते.

 

tribe-rituals-inmarathi01
toptenz.net

असे हेतुपुरस्सर केले जाते, जेणेकरून ह्या जखमा पूर्णपणे भरल्यावर त्यातून चट्टे निर्माण होतील. जे ते आता मर्द आहेत हे दर्शवतील.

६. कोळश्याने रंगवून २४ आठवड्यांसाठी जंगलात 

केनिया येथील Okiek जमातीच्या मुलांना कोळश्याने रंगवून २४ आठवड्यांसाठी जंगलात एकट सोडून दिले जाते. येथील मान्यतेनुसार जंगलात cemaasiit नावाचे भूत आहे, जे ओरडतात.

 

tribe-rituals-inmarathi07
survivalinternational.org

मुलांना जंगलातून आल्यावर ह्यांच्या ओरडण्याची नक्कल करून दाखवावी लागते. तेव्हाच ते खरे मर्द बनतात असे येथे मानतात.

७. डोळ्यात झाडांचा झोंबणारा रस

ब्राझील येथील Matis जमातीतील लोक आपल्याच मुलांच्या डोळ्यात झाडांचा झोंबणारा रस घालतात, तसेच काडीने त्यांची जबर मारहाण देखील केली जाते. आणि ह्या झाडाच्या छडीवर बेडकाचे विष लावले जाते.

 

tribe-rituals-inmarathi08
toptenz.net

त्या मुलाने हे सर्व सहन केल्यावरच तो मर्द झाला असे मानले जाते.

८. Papua New Guinea येथील Sambai जमातीतील लोक आपल्या मुलांच्या नाकात काडी घालतात आणि असे तोपर्यंत केले जाते जोवर त्याच्या नाकातून रक्त येणार नाही.

 

tribe-rituals-inmarathi06
toptenz.net

ह्यानंतर त्या मुलाला मर्द होण्याचा दर्जा प्राप्त होतो.

९.  मुंग्या ने भरलेले हातमोजे

ब्राझील येथे Satere-Mawe जमातीच्या मुलांना दोन्ही हातात हातमोजे घातले जातात, ज्याच्या आत अतिशय धोकादायक अश्या मुंग्या सोडल्या जातात. मर्द म्हणवून घेण्यासाठी ह्या मुलांना हे मुंग्या भरलेले हातमोजे १० मिनिटे न रडता आणि न ओरडता घालून ठेवावे लागतात.

 

tribe-rituals-inmarathi05
steemit.com

ह्या मुंग्या एवढ्या धोकादायक असतात की अनेक दिवसांपर्यंत ह्या मुलांचे हात लकवाग्रस्त होऊन जातात. मर्द म्हणवून घेण्यासाठी त्यांना एवढ्या भयानक परीक्षेला सामोरे जावे लागते ज्याचा आपण स्वप्नातही विचार करू शकत नाही.

१०. निर्वस्त्र होऊन गायींच्या रांगेवरून न पडता धावावे लागणे

Ethiopia येथील Hamar जमातीच्या मुलांना निर्वस्त्र होऊन गायींच्या रांगेवरून न पडता धावावे लागते. आणि हे असे त्यांना चारवेळा करावे लागते. तेव्हाच ते मर्द बनतात असा ह्या समाजाचा समज आहे.

 

tribe-rituals-inmarathi04
junhyejin5.blogspot.com

ह्यामागे त्यांची अशी मान्यता आहे ह्याने मुलांमध्ये स्फूर्ती येते आणि त्यांच्या शारीरिक क्षमता कळते.

११. २०-३० मीटर उंच लाकडाच्या टॉवर वरुन पायाला झाडाची दोरी बांधून उडी 

Pentecost ह्या बेटाच्या दक्षिणेस राहणाऱ्या Vanuatu जमातीच्या मुलांना २०-३० मीटर उंच लाकडाच्या टावरहून पायाला झाडाची दोरी बांधून उडी घ्यावी लागते. ह्यामध्ये त्यांचे खांदे जमिनीला लागू नये असा नियम असतो.

 

tribe-rituals-inmarathi03
everfest.com

जर ते हे करण्यात यशस्वी झाले तरच त्यांना मर्द समजले जाते.

ह्या सर्व परिक्षांमागे आदिवासी जमातींचा एकमात्र उद्देश हा असतो की येणाऱ्या पिढीला त्यांच्या भविष्यात प्रत्येक समस्येला सामोरे जाता यावे.

त्यासाठीची ही तयारी असते. कारण आदिवासी लोक हे जंगलात खूप बिकट परिस्थितीत राहत असतात, त्यामुळे त्यांना शारीरिकदृष्ट्या सक्षम राहणे अतिशय गरजचे असते. ह्या सर्व प्रथांतून ह्या मुलांना येणाऱ्या धोक्यासाठी तयार केले जाते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?