' विमानातील स्टाफच्या “अलर्टनेस” मुळे प्रवासी हृदयविकाराच्या झटक्यातून वाचतो तेव्हा.. – InMarathi

विमानातील स्टाफच्या “अलर्टनेस” मुळे प्रवासी हृदयविकाराच्या झटक्यातून वाचतो तेव्हा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

विमान उड्डाणादरम्यान येणाऱ्या वैद्यकीय आणीबाणी आपणास काही दुर्मिळ नाहीत. माणूस म्हटलं की थोडं कमी जास्त होतंच असतं. बऱ्याचवेळा अश्या लांबच्या प्रवासादरम्यान असे प्रसंग उद्भवतात. उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार इत्यादी धोकादायक आजार असणाऱ्यांची विशेष काळजी यात घ्यावी लागते.

मार्च २०१८ मध्ये एअर इंडिया च्या दिल्ली ते मुंबई प्रवासादरम्यान एका प्रवाश्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता.

तातडीच्या वैद्यकीय सेवेसाठी विमान जयपूर कडे वळविण्यात आले आणि त्या व्यक्तीस दवाखान्यात नेले गेले. अश्या प्रकारे प्रसंगावधान साधून पीडित व्यक्तींना मदत केली जाऊ शकते.

पण मे २०१८ मध्ये अहमदाबाद-कोची प्रवासादरम्यान इंडिगो फ्लाईट मध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
इंडिया टाइम्स च्या अहवालानुसार.. जर विमानातील सहकारी आणि डॉक्टर यांनी वेळेवर हस्तक्षेप करून मदत केली नसती तर याचीच पुनरावृत्ती मुंबई-लंडन प्रवासादरम्यान जेट एअरवेजच्या विमान 9W -116 मध्ये होणार होती.

 

Plane-heart-attack-inmarathi01.jpg
clevelandclinic.org

कॉन्सलटिंग फर्म McKinsey चे भागीदार, विवेक पंडित यांनी एका फेसबुक पोस्ट मध्ये या प्रसंगाचे वर्णन केले आहे की कसे या जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्याने एका प्रवाशाला विचित्र अवस्थेत झोपलेले पाहून बाकीच्यांच्या लक्षात आणून दिले.

पंडितांच्या पोस्ट नुसार, अगदीच अस्ताव्यस्त अवस्थेत असतानाच त्या व्यक्तीचा चेहरा काळानिळा पडला असून त्यांच्या नाडीचे ठोके अगदी धीम्या गतीने पडत होते.

यातच राहुल, त्यांचे बाकीचे सहकारी, कॅप्टन सौरभ कँटीनवाला आणि २ सहप्रवासी डॉक्टर यांनी तातडीने उपचार केले. त्यातील एक डॉक्टर या बेंगलोर मधील अपोलो हॉस्पिटलच्या डॉक्टर निवेदिता होत्या.

पुढाकार घेत त्यांनी आत्मविश्वास दाखविला आणि २० मिनिटांच्या गरजेच्या अश्या (resuscitation सेशन) उपचारानंतर डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी व बाकी लोकांच्या सहकार्याने शेवटी त्या व्यक्तीस मरणाच्या दारापासून परत आणण्यास यश मिळाले. या दरम्यान विमान बुखारेस्टकडे बाकीच्या वैद्यकीय सेवेसाठी वळविण्यात आले.

 

Plane-heart attack-inmarathi
express.co.uk

जेट एअरवेजने एका निवेदनात म्हटले की, प्रवाशाच्या वैद्यकीय समस्येसाठी विमानात वळविण्यात आले आहे.

तर, जेव्हा सहप्रवाश्याला हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा नक्की काय घडते? त्यावेळी तुम्ही अश्याप्रकारे मदत करू शकता…

१. ती व्यक्ती शुद्धीत किंवा बेशुद्ध आहे हे पुन्हा पुन्हा तपासून पहा

२. त्यांना एका बाजूला आडवे झोपवा.

३. जर तुम्ही प्रशिक्षित असाल तर त्यांचे chest compression चालू करा अन्यथा मदतीसाठी थांबा.

तातडीची सेवा ना मिळाल्याने खूपसे हृदयविकाराचा झटका येणारे लोक जगू शकत नाहीत. उपचारांसाठी लागणाऱ्यामध्ये ऑक्सिजन, नायट्रोग्लिसरीन आणि ऍस्पिरिन या ३ सर्वात महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या विमानाच्या तातडीच्या सेवेसाठी असणाऱ्या सुविधेत असतातच.
जर आपण स्वतः एक हृदयरोगी असाल तर अश्या विमानप्रवास दरम्यान काही काळजी तर आपणही घेतली पाहिजे…

 

cdc.govack-inmarathi03
cdc.gov

१. लांब पल्ल्याच्या प्रवासापूर्वी आपल्या डॉक्टरांकडून विशेष तपासणी करून त्यांची परवानगी मिळाल्यावरच प्रवास करावा.

२. हॅन्डबॅग मध्ये गरजेची अशी सर्व औषधे असावीत

३. प्रवासादरम्यान भरपूर पाणी प्या आणि अल्कोहोल टाळाच.

हृदयविकाराचा झटका हा अतिशय धोकादायक असू शकतो, तो कधीही दत्त म्हणून आपल्यासमोर उभा राहू शकतो. अश्या काही विकारांनी ग्रस्त असल्यास शक्यतो असे लांब पल्ल्याचे प्रवास करू नयेत आणि केल्यास आपल्या डॉक्टरांशी बोलून त्यांची परवानगी असताना योग्य ती काळजी घेऊन करावेत.

जर तुमचा कोणी सहप्रवासी अश्या परिस्थितीत सापडलाच तर कृपया त्यांना तातडीने जितकी जमेल टिकी मदत नक्की करा. अशी वेळ कोणावरही येऊ शकते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?