' पहिल्यांदाच ISRO एकाचवेळी launch करणार तब्बल ८३ satellites – InMarathi

पहिल्यांदाच ISRO एकाचवेळी launch करणार तब्बल ८३ satellites

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थात ISRO च्या नावावर अनेक विक्रम प्रस्थापित आहेत. तेथील भारतीय शास्त्रज्ञांनी आपल्याला अभिमान वाटाव्या अश्या कामगिरी करून दाखवून आपल्या देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. हीच ISRO आता आणखी एका भीमपराक्रमासह नवीन विश्वविक्रम नोंदवण्याच्या तयारीत आहे. या पराक्रमामुळे जागतिक पटलावर ISRO ची भरपूर हवा होणार हे मात्र नक्की !

isro-83-satellites-marathipizza01

ISRO एकाचवेळी ८३ satellites लॉन्च करण्याच्या प्रयत्नात आहे. यापैकी ८० satellites हे इतर देशांचे असून या ८० satellites चे वजन जवळपास ५०० किलो इतके आहे. हे satellites इस्राईल, अमेरिका, स्वित्झर्लंड कझाकस्तान आणि नेदरलँड्स या देशांचे आहेत. तर उर्वरित तीन satellites भारताचे आहेत. अवकाश संशोधनविभाग हा पंतप्रधान कार्यालयाच्या अखत्यारीत आहे आणि ISRO च्या या मोहिमेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील पाठींबा दर्शवला आहे.

isro-83-satellites-marathipizza01

ISRO ही मोहीम जानेवारी २०१७ मध्ये हाती घेणार असून ISRO च्या इतिहासातील अश्या प्रकारची ही पहिलीच कामगिरी आहे. त्यामुळे त्यांना जगभरातील शास्त्रज्ञांकडून मोहिमेच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा मिळत आहेत.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: MarathiPizza.com.

Copyright (c) 2016 मराठी pizza. All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?