जाणून घ्या: भाडे करार (Rent Agreement) फक्त ११ महिन्यांचाच असण्यामागचं “चलाख” कारण..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

जेव्हा आपण कोणतीही जागा भाडेतत्त्वावर घेतो किंवा देतो तेव्हा रेंट अॅग्रीमेंट करतो जे ११ महिन्यांचे असते. कधी तुम्ही विचार केला आहे का की हे ११च महिन्यांचे का असते? जमीनमालक, रियल इस्टेट एजेंट किंवा खुद्द भाडेकरूला देखील यामागील कारण कित्येकदा माहीत नसते.

तुम्हाला कधी याबद्दल कुतूहल वाटले आहे का?

आणि मुळात रेंट अॅग्रीमेंट करणं आवश्यक आहे का?

तर हो, हे घरमालक आणि भाडेकरू या दोहोंचे हित जपण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे आणि म्हणूनच याबद्दल डोळस असणं, जागरूक असणं आवश्यक आहे.

 

rent-inmarathi
marathi.webdunia.com

रेंट अॅग्रीमेंट

भाडेकरार किंवा रेंट अॅग्रीमेंट यालाच लीज अॅग्रीमेंट असे देखील म्हटलेे जाते. हा जागेचा मालक आणि भाडेकरू यांच्यातील लिखित करार असतो आणि तो या दोन्ही पक्षांच्या हिताचा असतो. जमिनीवर हक्क सांगणारा माणूस हा एकतर जागेचा मालक असायला हवा किंवा जागेच्या मालकाने त्याला त्या जागेबद्दल निर्णय घेण्याचा हक्क power of attorney मधून त्या व्यक्तीला दिलेला असावा.

या कागदपत्रांमध्ये प्रॉपर्टीशी निगडित सर्व नियम आणि अटी लिहिलेल्या असतात. जसे की प्रॉपर्टीचा पत्ता, प्रकार आणि क्षेत्रफळ. शिवाय यात भाडे किती असेल, सिक्युरिटी डिपॉझिट किती असेल, प्रॉपर्टी कोणत्या कारणाने आणि काय उपयोगासाठी भाड्याने घेण्यात येत आहे आणि अॅग्रीमेंट किती कालावधीसाठी वैध आहे या गोष्टी लिहिलेल्या असतात.

मात्र या अॅग्रीमेंटमध्ये काही बदल करायचा असेल तर तो दोन्ही पक्षांच्या स्वाक्षरीपूर्वी केला जातो. एकदा सह्या झाल्या की यात कोणताही बदल केला जात नाही. घरमालक तसेच भाडेकरू या दोघांचे हित जपण्यासाठी हा करार केला जातो.

 

agreement-inmarathi
lh3.googleusercontent.com

रेंट अॅग्रीमेंट ११ महिन्यांचे असण्यामागील कारण:

बहुतांश रेंट अॅग्रीमेंट ११ महिन्यांच्या कालावधीसाठी केली जातात. रजिस्ट्रेशन अॅक्ट १९०८ नुसार भाडेकरार जर १२ महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठीचा असेल तर त्याचे रजिस्ट्रेशन करणे आवश्यक ठरते.

कोणताही करारनामा (अॅग्रीमेंट) रजिस्टर्ड केल्यावर स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी भरावी लागते. यातून सुटकेचा मार्ग म्हणून भाडे करार (रेंट अॅग्रीमेंट) १२ महिन्यांऐवजी ११ महिन्यांचा केला जातो.

रजिस्ट्रेशन केल्यास खर्च किती येतो?

उदाहरण देऊन समजून घ्यायचे झाले तर दिल्लीमध्ये पाच वर्षांच्या भाडेकरारासाठी स्टॅम्प पेपरची किंमत वर्षभराच्या एकूण भाड्याच्या २% इतकी असते. सिक्युरिटी डिपॉझिट सुद्धा अॅग्रीमेंटचा भाग असेल तर यात अजून १०० रुपयांची भर पडते.

 

stamp-duty-inmarathi
d3pc1xvrcw35tl.cloudfront.net

जर भाडेकरार पाच वर्षांहून अधिक आणि दहा वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी असेल तर स्टॅम्प पेपरची किंमत वर्षभराच्या एकूण भाड्याच्या ३% इतकी असते.

या चार्जेस पासून वाचण्यासाठी जागेचा मालक आणि भाडेकरू आपापसात ठरवून भाडेकराराचे रजिस्ट्रेशन करत नाहीत. जर दोघांनी मिळून भाडेकराराचे रजिस्ट्रेशन करण्याचे ठरवले तर मालक आणि भाडेकरू यांना दोघांना मिळून याचा खर्च करावा लागतो.

तर हे आहे भाडेकरार (रेंट अॅग्रीमेंट) ११ महिन्याचे करण्यामागील खरं कारण.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “जाणून घ्या: भाडे करार (Rent Agreement) फक्त ११ महिन्यांचाच असण्यामागचं “चलाख” कारण..

 • March 22, 2019 at 9:41 pm
  Permalink

  resell flat madhe registration cha kharch koni karaycha asto

  Reply
 • September 26, 2019 at 2:12 am
  Permalink

  भाडेकरार नामा मध्ये घरमालक हा भाडेकरू कडून ११महिन्यांच्या करारामध्ये घरपट्टी आणि नलपणीपट्टी घेण्याचा हक्कदार आहे का?

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?