' ही चलनं डॉलरपेक्षा जास्त महाग आहेत !

ही चलनं डॉलरपेक्षा जास्त महाग आहेत !

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आपण नेहमी ऐकतो की रुपया आज डॉलरपेक्षा एवढ्या किंमतीने कोसळला, आज रुपयाची किंमती कमी झाली किंवा रुपयाच्या किंमतीपेक्षा डॉलर महागला…. या गोष्टींवरून एक गोष्ट तर नक्की आहे की आपला रुपया डॉलरपेक्षा महाग नाही, तर खूपच स्वस्त आहे आणि ही गोष्ट आपणा सर्वांनाच माहिती आहे.

बहुतेक जणांना असेच वाटत असेल की डॉलर हेच जगातीलासर्वात मोठे चलन आहे, इतर चलनांची किंमत डॉलर समोर काहीच नाही. पण प्रत्यक्षात सत्य या उलट आहे.

डॉलर पेक्षाही अतिशय जास्त मूल्य असलेली चलने जगात उपलब्ध आहेत. ज्यांच्या किंमती पाहून तुम्ही स्वत:च म्हणालं की इनके सामने तो डॉलर किसी भी पेड की पत्ती नही…!

आपण उलट्या क्रमाने पाहू की जगातील सर्वात महागडी चलने कोणती आहेत. 

स्विस फ्रँक = ६७.१ रुपये

 

world-biggest-currency-marathipizza01

स्रोत

अमेरिकन डॉलर = ६८.१ रुपये

 

world-biggest-currency-marathipizza02

स्रोत

युरो = ७२.८४ रुपये

 

world-biggest-currency-marathipizza03

स्रोत

ब्रिटीश पौंड = ८५.६८ रुपये

 

world-biggest-currency-marathipizza04

स्रोत

जिब्राल्टर पौंड = ८५.६५ रुपये

 

world-biggest-currency-marathipizza05

स्रोत

जॉर्डन दिनार = ९६.९३ रुपये

 

world-biggest-currency-marathipizza06

स्रोत

लात्विया लात = ११०.७९ रुपये

 

world-biggest-currency-marathipizza07

स्रोत

ओमान रियाल = १७८. ५६ रुपये

 

world-biggest-currency-marathipizza08

स्रोत

बहरीन दिनार = १८२.३४ रुपये

 

world-biggest-currency-marathipizza09

स्रोत

कुवेत दिनार = २२१. २० रुपये

 

world-biggest-currency-marathipizza10

स्रोत

परंतु असं असून देखील जागतिक बाजारपेठेमध्ये अमेरिकन डॉलरच सर्वाधिक शक्तीशाली चलन म्हणून ओळखले जाते. कारण ८५% फोरेक्स ट्रेडिंगमध्ये अमेरिकन डॉलर गुंतलेला आहे.

जगात देण्यात येणारी ३९ टक्के कर्ज ही अमेरिकन डॉलर मध्येच दिली जातात. ज्यामुळे फॉरेन बँकांना आपल्या व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी अधिक अमेरिकन डॉलरची गरज भासते.

 

world-biggest-currency-marathipizza11

स्रोत

अश्याप्रकारे जागतिक बाजारपेठेमध्ये सर्वाधिक अमेरिकन डॉलर गुंतलेला असल्याकारणाने इतर सर्व चलने केवळ आपापल्या देशातच शक्तिशाली आहेत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?