इंजिनिअर व्हायचंय? कशाला?! : इंजिनिअरिंग आणि बेरोजगारी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लेखक – रमणराज गड्डम

===

अलीकडच्या काळात इंजिनिअरिंगची व्याख्या असे सांगते की नुसतं शिका, रट्टा मारा, assignment लिहा, submission करा,

विद्यापीठाच्या पेपर असल्यावर एका दिवसात अभ्यास करून विषय काढा हाच हेतू विद्यार्थ्यांमध्ये बिनसलेले असते.

पण मूळ विषय तो राहिला placement ची म्हणजेच नोकरीची.

आताच्या युगातील विद्यार्थी उच्च शिक्षणसाठी नुसतं डॉक्टर, इंजिनीअरिंगच करण्याच्या भानगडीत असतात.

 

engineers and unemployment-inmarathi01
deccanchronicle.com

बाकीच्या डिग्रीकडे त्यांचा कल नसतो. कारण हा युग विद्यार्थ्यांना नुसतं तंत्रज्ञानाचा वाटू लागला. मुळात इंजिनीअर बेरोजगार कशाला आहेत याचा आपण सखोल अभ्यास करायला हवंय. त्याचं उत्तरही वरतीच सापडेल तुम्हाला.

सगळे विद्यार्थी नुसतं इंजिनीअरिंग च शिक्षण घेतल्यावर नोकरीची अडचण भासेलच ना.

 

engineers and unemployment-inmarathi03
dazeinfo.com

मागील वर्ष म्हणजे २०१७ चा टाईम्स ऑफ इंडियाचं अहवाल असे सांगतो की, भारतात दर वर्षाकाठी सरासरी ६०% इंजिनिअर्स बेरोजगार असतात.

ही अडचण निर्माण झाली ते फक्त बाकीचे डिग्री सोडून इंजिनीअरिंग हीच आपला क्षेत्र हीच आपली आवड हीच आपली करीअर म्हणून विद्यार्थी पसंत करतात.

जर ही बेरोजगारी संपवायची असेल तर विद्यार्थ्यांची सरकारने प्रबोधन करून दुसऱ्या डिग्रीकडे वळवणे किंवा विद्यार्थी स्वतः दुसरा क्षेत्र निवडणे गरजेचे आहे.

भारतात एकूण इंजिनीअरिंगचे जवळपास ३,३४५ खाजगी महाविद्यालये असून १४,७३,८७१ सीट्स आहेत.

यातील सगळेच सीट जर भरल्यास वर्षाकाठी जवळजवळ संपूर्ण भारतात १४ लाख इंजिनिअर्स बाहेर पडतात आणि सरकारचे म्हणजेच IIT चे १६ महाविद्यालये असून ९,७८४ सीट्स आहेत.

यात असे एकूण ९ हजार तरी विद्यार्थी हुशार इंजिनिअर्स असतील असे गृहीत धरायला काही हरकत नाही.

 

engineers and unemployment-inmarathi02
youtube.com

जर फक्त आपल्या महाराष्ट्राचं बघितल्यास एकूण ३५० खाजगी इंजिनीअरिंग महाविद्यालये आहेत. आपल्या एकट्या महाराष्ट्रातच वर्षाकाठी १,४६,११६ विद्यार्थी इंजिनीअर बनून बाहेर पडतात.

भारतात एवढ्या जर लाखो इंजिनिअर्स वर्षा-वर्षाला बाहेर पडतात तर त्या सर्वांना नोकरी मिळेल का?

 

engineers and unemployment-inmarathi
thestorypedia.com

जर मिळत असतील तर किती? नाही मिळत असतील तर किती? या सर्वांचा अभ्यास करून सरकारने योग्य तो निर्बंध आणणे आवश्यक आहे.

म्हणजे काही आशा महाविद्यालये आहेत की जिथे शिक्षणचं दिले जात नाही नुसतं तिथे विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून देतात आणि तिथे असलेले ट्रस्टी मंडळी सरकारचे पैसे लुटून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळतात आशी महाविद्यालये सरकारने बंद करणं गरजेचं आहे.

विद्यार्थी डिग्री झाल्यावर बाहेर जेव्हा नोकरीसाठी फिरतात, नेमकं त्यांना इंजिनीअरिंगची व्याख्या आठवते. कारण बाहेर मार्केटमध्ये इंजिनिअरिंगला शून्य किंमत आहे.

नोकरीसाठी विद्यार्थी नाही एजंट तयार होऊ लागलेत. जर येणाऱ्या काळात अशीच इंजिनीअरिंगची बेरोजगारी वाढली तर सरकारला आर्थिक दृष्ट्या घातक परिस्थितीला सामोरे जावं लागेल हे नक्की.

एकदा पूर्ण इंजिनीअरिंगचा ४ वर्षाच काळ बघितल्यास कळेल की, तिथे कशा प्रकारे शिक्षण दिले जाते. नुसतं विद्यार्थ्यांकडून गाढव काम करवून घेतात. लिहा, नुसतं पानं भरा, वह्या भरा, प्रवचन ऐका एवढेच विद्यार्थ्यांचं लक्ष असतं. 

व्यावहारिक ज्ञान तर पाहिजे तसे दिले जात नाही.

महत्वाचं म्हणजे सगळेच महाविद्यालये आपलंच महाविद्यालय कसं १ नंबर आहे हे दाखवण्यासाठी ऍडमिशन घेताना १००% Placement आहे, म्हणजे नोकरी फिक्स आहे, असे करून विद्यार्थ्यांची दिशाभूल करतात नेमकं तिथेच विध्यार्थी बळी पडतात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?