लग्नाआधी आणि लग्नानंतर: नात्यात होणाऱ्या ‘या’ छोट्या बदलांची तुम्ही कल्पनाही केली नसेल!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

लग्न हे प्रत्येकाच्या जीवनात एक नवा उत्साह घेऊन येते, जीवनातील खूप महत्वाचे वळण म्हणजे लग्न. कारण ह्यानंतर अनेकश्या गोष्टी बदलून जातात. त्यामुळे लग्नाआधी अनेक जण आपले वैवाहिक जीवन कसे असावे ह्याची स्वप्न बघत असतात. पण प्रत्येक स्वप्न पूर्ण होतच असं नाही.

दुरून सुंदर आणि मजेशीर दिसणारं हे वैवाहिक जीवन एक रोलरकोस्टर राईडपेक्षा काही कमी नसतं. ज्यात रोज एक नवा ट्वीस्ट येत असतो. जसे लग्नाचे काही चांगले परिणाम आहेत तसेच त्याचे काही वाईट परिणामही आहेत.

 

life after marriage-inmarathi
rashtriyabhasha.com

लग्न झाल्यावर प्रत्येकालाच आपल्यावर आलेली ही जबाबदारी ओझं वाटू लागतं. काही काळ चाललेला रोमान्सदेखील कधी कधी ह्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबून जातो.

जर कुठल्या दाम्पत्याचं लव्ह मॅरेज झालं असेल तरी देखील काही वेळाने ते प्रेमेही कमी होतं. लग्नाआधी जे जोडपे एकमेकांची एवढी काळजी घ्यायचे तेच लग्नानंतर अगदी बेफिकीर होऊन जातात. ज्यामुळे ह्या जोडप्यांमध्ये भांडणे वाढू लागतात.

 

life after marriage-inmarathi01
blogstomakethink.com

तर इकडे अरेंज्ड मॅरेज झालेल्या लोकांना तर ह्यापेक्षा जास्त समस्यांना सामोरे जावे लागते. कारण त्यांच्यासाठी जोडीदार आणि त्याच्यासोबतच इतर गोष्टीही नवीन असतात. त्यात अॅडजस्ट होणं कुणाला जमतं कुणाला नाही. त्यामुळे अश्या जोडप्यांमध्ये देखील भांडणे होऊ लागतात.

लग्नाआधी हेच जोडपे एकमेकांना भेटण्यासाठी नानाविध प्रकारे प्रयत्न करत असतात, पण लग्नानंतर हे चित्र पूर्णपणे पालटून जातं. त्यानंतर हे सर्व तेवढ स्पेशल राहत नाही.

 

life after marriage-inmarathi03
qph.fs.quoracdn.net

लग्नाआधी प्रत्येक मुलगी ही स्वतंत्र जीवन जगत असते, पण लग्न झाल्यावर तिने जश्या आयुष्याचे स्वप्न बघितले असते तसं काहीही तिच्यासोबत होत नाही. एवढचं नाही तर जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली ती पार दबली जाते.

 

life after marriage-inmarathi02
znews-photo-td.zadn.vn

लग्नाआधी भलेही मुलं आवडत असली तरी जेव्हा खरोखर आपल्याला मुल होतात तेव्हा त्यांचा सांभाळ करणे हे काही तारेवरच्या कासरतेपेक्षा कमी नाही. त्यांचा सांभाळ करण्यात तुमचा दिवसच नाही तर रात्रही अनेकदा खराब होते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?